Instant Malwani Vade – Kombadi Vade (इन्स्टंट मालवणी वडे – कोंबडी वडे)

Malwani Vade – Kombadi Vade (मालवणी वडे - कोंबडी वडे)

Instant Malwani Vade – Kombadi Vade (इन्स्टंट मालवणी वडे कोंबडी वडे) – My Innovation

इन्स्टंट मालवणी वडे – कोंबडी वडे मराठी

Malwani Vade are delicious deep fried fritters using mixed grains and rice. It’s also called Kombadi Vade. It’s a popular accompaniment generally served with Chicken Gravy. Vegetarians have it with Black Peas Curry or Chutney and Home made butter. Some make these Vade with a hole in the centre and some others make it without a hole – like a Puri. I always make it with a hole. It may not be always possible to get the dry flour for this Vade. So this is my recipe to make Instant Vade flour and make Vade. These Instant Vade are as tasty and crispy as the one made with ready flour. Try it out.

Ingredients (For Malwani Vade – Serves 4) (1 cup = 250 ml)

Rice Flour 2.5 cups

Udid Dal (Split Black Gram) Flour ½ cup

Chana Daal (Split Chickpeas) Flour (Besan) 2 tablespoon

Fenugreek Powder ½ teaspoon

Coriander Powder 2 tablespoon

Red chili Powder 1 teaspoon (adjust as per taste)

Turmeric Powder ½ teaspoon

Salt to taste

Oil to deep fry Vade

Instructions

1. In a bowl, Mix all the ingredients. Gradually add warm water and bind the dough of medium consistency. Keep the dough covered for 30 minutes.

2. Knead the dough for 3-4 minutes. Make small lemon size balls of the dough.

3. Apply little oil on a plastic sheet or butter paper. Pat the dough ball in a circular shape of medium thickness. If you want, using a finger make a hole in the centre.

4. Heat oil for deep frying. Gently slide in the Vada in the oil.

5. Deep fry on medium heat. While frying, gently press the Vada with the spatula so that Vada puffs up. Flip it over and fry other side. Fry till both sides are golden brown.

6. Serve hot Vade with chutney and home made butter Or Black Peas Gravy. If you have chicken – serve it with chicken gravy.

Malwani Vade – Kombadi Vade (मालवणी वडे – कोंबडी वडे)
Malwani Vade – Kombadi Vade (मालवणी वडे – कोंबडी वडे)

 

 

 

 

 

 

 

 

==================================================================================

इन्स्टंट मालवणी वडे कोंबडी वडे शुद्ध शाकाहारी वडे – माझं इनोव्हेशन

मालवणी वडे हा कोकणातला लोकप्रिय पदार्थ आहे. ह्या वडयांना कोंबडी वडे असंही म्हणतात. कोंबडीच्या रश्श्यासोबत हे खायला देतात. शाकाहारी लोक हे वडे चटणी आणि लोण्यासोबत किंवा काळ्या वाटाण्याच्या रस्श्यासोबत खातात. ह्या वड्यांचे पीठ नेहमी घरात असतंच असं नाही. अशा वेळी वडे करायचे असतील तर ही माझी इन्स्टंट वड्यांची रेसिपी वापरून वडे करू शकता. हल्ली मी वड्यांचे पीठ न आणता / करता असेच इन्स्टंट वडे करते. वडे छान खमंग आणि खुसखुशीत होतात.

काही जणी हे वडे भोक न पाडता पुरीसारखे करतात. पण मी नेहमी भोकवाले वडेच खाल्ले आहेत त्यामुळे मी तसेच करते.

साहित्य (मालवणी वड्यांसाठी जणांसाठी) (१ कप = २५० मिली )

तांदुळाचं पीठ अडीच कप

उडीद डाळ पीठ अर्धा कप

बेसन २ टेबलस्पून

मेथी पावडर अर्धा टीस्पून

धने पावडर २ टेबलस्पून

लाल तिखट टीस्पून (चवीप्रमाणे कमी / जास्त करा )

हळद अर्धा टीस्पून

मीठ चवीनुसार

तेल वडे तळण्यासाठी

कृती

. एका परातीत सर्व साहित्य एकत्र करा. थोडं थोडं कोमट पाणी घालून पीठ भिजवा. फार सैल नको आणि फार घट्ट नको. पीठ अर्धा तास झाकून ठेवा.

. पीठ मिनिटं मळून घ्या. लिंबाच्या आकाराचे गोळे करून घ्या.

. एका प्लास्टिक च्या कागदाला / बटर पेपर ला थोडं तेल लावून घ्या. त्याच्यावर पिठाचा गोळा ठेवून हलक्या हाताने गोल वडा थापा. फार जाड नको आणि फार पातळ नको. बोटानी वड्याच्या मधोमध एक भोक पाडा.

. तळण्यासाठी तेल गरम करून घ्या. थापलेला वडा अलगद तेलात सोडा आणि मध्यम आचेवर तळून घ्या. तळताना वडा झाऱ्याने थोडा दाबा म्हणजे वडा छान फुगेल. वडा परतून दोन्ही बाजूनी सोनेरी रंगावर तळून घ्या.

. गरमागरम वडे चटणी आणि लोण्यासोबत खायला द्या. मांसाहारी मंडळी हे वडे कोंबडीच्या रश्श्यासोबत खाऊ शकतात.

Malwani Vade – Kombadi Vade (मालवणी वडे – कोंबडी वडे)
Malwani Vade – Kombadi Vade (मालवणी वडे – कोंबडी वडे)

 

Be the first to comment

Your comments / feedback will help improve the recipes