Tomato Omlet Without Tomato ( टोमॅटोशिवाय टोमॅटो ऑम्लेट) – Savory Veggie Pan Cake without Tomato

Tomato Omlet Without Tomato ( टोमॅटोशिवाय टोमॅटो ऑम्लेट)
Tomato Omlet Without Tomato ( टोमॅटोशिवाय टोमॅटो ऑम्लेट)

Tomato Omlet Without Tomato ( टोमॅटोशिवाय टोमॅटो ऑम्लेट) – Savory Veggie Pan Cake without Tomato

टोमॅटोशिवाय टोमॅटो ऑम्लेट मराठी

Tomato Omlet is a popular Indian Snack. When Tomatoes are very costly – as they are now- you can still make Tomato Omlet without using Tomato!! Sounds funny, isn’t it? When I first made this for breakfast, I told my Son, it’s ‘Tomato Omlet without Tomato’. He happily had it and liked it very much. So what do you add in place of Tomato? I added Red Amaranth Leaves / Lal Math Bhaji!! If I would have told my son, this Omlet has Red Amaranth, he would not have had it for sure!! He does not like Red Amaranth at all!! But with an interesting name, he relished the dish. Recipe is very easy and uses all standard ingredients from Indian Kitchen. It can be a quick and healthy Breakfast / Snack.

Ingredients (Makes 7-8 Omlets) (1 cup = 250 ml)

Finely chopped Red Amaranth Leaves (Lal Math) 2 cups

Onions 2 medium size

Bengal Gram flour (Besan) 1 cup

Rice Flour ½ cup

Fine Semolina ½ cup

Curd 2 tablespoon

Chili Powder ½ teaspoon

Carom Seeds (Ajwain) 1 teaspoon

Turmeric Powder ½ teaspoon

Salt to taste

Oil / Butter / Ghee (Clarified Butter) for pan frying

Instructions

1. Cook chopped Amaranth leaves. I cook it in Microwave with little water; cook it on high power for 4 minutes. You can cook it in a pan with little oil. After the cooked leaves come to room temperature, coarse grind them in a grinder.

2. In a bowl, Mix ground leaves along with other ingredients except Oil / Ghee / Butter. Add water to make a medium consistency batter.

3. Rest the batter for 10 minutes.

4. Heat an Iron / a non-stick Griddle. Turn the gas to medium flame. Pour ¼ cup of batter on the griddle and spread it evenly.

5. Cover the griddle and cook for 2-3 minutes.

6. Remove the cover. If you see wet batter on the top on Omlet. Cook for a few more minutes. Pour a few drops of oil / ghee/ butter along the edges of Tomato Omlet.

7. Flip the Omlet and cook the other side without cover.

8. When both sides are cooked, Tomato Omlet without Tomato is ready.

9. Serve hot with coriander chutney and /or tomato sauce. It tastes awesome with home made butter.

Tomato Omlet Without Tomato ( टोमॅटोशिवाय टोमॅटो ऑम्लेट)
Tomato Omlet Without Tomato ( टोमॅटोशिवाय टोमॅटो ऑम्लेट)
Tomato Omlet Without Tomato ( टोमॅटोशिवाय टोमॅटो ऑम्लेट)
Tomato Omlet Without Tomato ( टोमॅटोशिवाय टोमॅटो ऑम्लेट)

==================================================================================

टोमॅटोशिवाय टोमॅटो ऑम्लेट – Tomato Omlet Without Tomato

जेव्हा टोमॅटो महाग असतात जसे आता आहेत तेव्हा केलेला हा नवीन पदार्थ ज्याला मी टोमॅटोशिवाय टोमॅटो ऑम्लेटअसं नाव दिलंय. हा प्रकार मी पहिल्यांदा केला तेव्हा मुलाला सांगितलं आज टोमॅटोशिवाय टोमॅटो ऑम्लेटकेलंय. पदार्थ दिसायला छान होता त्यामुळे मुलाने काही न बोलता खाल्ला आणि त्याला आवडला सुद्धा. नंतर मी त्याला सांगितलं की ह्यात लाल माठ / राजगिरा भाजी घातलीय. त्याला ही भाजी अजिबात आवडत नाही. पण हे टोमॅटोशिवाय टोमॅटो ऑम्लेटमात्र त्यानं आवडीनं खाल्लं. न आवडणारी भाजी घरच्यांना खाऊ घालायचा एक चविष्ट आणि पौष्टिक पदार्थ तयार झाला. नक्की करून बघा.

टीप

. कोणतीही धिरडी जाड झाली तर चांगली लागत नाहीत. पातळ धिरड्यांसाठी भिजवलेलं पीठ फार दाट असू नये. आणि पीठ तव्यावर घातल्यावर पातळ पसरलं तर धिरडं पातळ होतं.

मी लोखंडी तवा वापरते. त्यामुळे धिरडी करताना तेल घालावं लागतं. नॉनस्टिक तवा वापरला तर अजिबात तेल घालता धिरडी करता येतात.

साहित्य ( ऑम्लेट साठी) (१ कप = २५० मिली )

बारीक चिरलेला लाल माठ / राजगिरा भाजी २ कप

कांदे मध्यम

लाल तिखट अर्धा टीस्पून

ओवा टीस्पून

बेसन १ कप

तांदुळाचं पीठ अर्धा कप

बारीक रवा अर्धा कप

हळद अर्धा टीस्पून

दही २ टेबलस्पून

मीठ चवीनुसार

तेल/ तूप / बटर ऑम्लेट भाजायला

कृती

. बारीक चिरलेला लाल माठ वाफवून घ्या. मी मायक्रोवेव्ह मध्ये थोडं पाणी आणि भाजी घालून हाय पॉवर वर ४ मिनिटं शिजवते. तुम्ही कढईत थोडं तेल घालून झाकण ठेवून वाफवू शकता. वाफवलेला माठ गार झाला की मिक्सरमध्ये जाडसर वाटून घ्या.

. एका वाडग्यात वाटलेला माठ आणि बाकी सर्वसाहित्य (तेल / तूप / बटर वगळून ) घाला. थोडं थोडं पाणी घालून मध्यम पातळ पीठ भिजवा (भज्यांच्या पिठासारखं ).

. पीठ १० मिनिटं झाकून ठेवा.

. नॉन स्टिक/ लोखंडी तवा गरम करून घ्या.

. गॅस मध्यम करून पाव कप पीठ तव्यावर ओता. ओतताना कप गोल फिरवा आणि हाताने पीठ सारखं करा.

. झाकण ठेवून मिनिटं भाजा. झाकण काढून बघा. ओलं पीठ ऑम्लेट वर दिसत असेल तर आणखी मिनिटं भाजा.

. कडेनी थोडं तूप / तेल / बटर सोडा.

. ऑम्लेट परतून दुसरी बाजू झाकण ठेवता भाजून घ्या.

. गरमगरम टोमॅटोशिवाय टोमॅटो ऑम्लेट चटणी / सॉससोबत खायला द्या. लोण्यासोबत हे ऑम्लेट अप्रतिम लागते.

Tomato Omlet Without Tomato ( टोमॅटोशिवाय टोमॅटो ऑम्लेट)
Tomato Omlet Without Tomato ( टोमॅटोशिवाय टोमॅटो ऑम्लेट)
Tomato Omlet Without Tomato ( टोमॅटोशिवाय टोमॅटो ऑम्लेट)
Tomato Omlet Without Tomato ( टोमॅटोशिवाय टोमॅटो ऑम्लेट)

Be the first to comment

Your comments / feedback will help improve the recipes