Suralichya Vadya / Khandvi (सुरळीच्या वड्या / खांडवी ) – Indian Gram Flour Pasta – Popular Indian Snack
सुरळीच्या वड्या / खांडवी मराठी
Suralichya Vadya is a popular Indian snack. In Gujarat, it’s called Khandvi. In one of the Australian Master Chef episodes, this was called ‘Pasta Not Pasta’!!. An Indian Chef based in Australia had given the recipe to the contestants and they were asked to make this dish!! In Maharashtra and Gujarat it is a traditional dish. However, in shops that sell this, they don’t call it by the name ‘Suralichya Vadya’; It is sold as Gujarati Khandvi!!
This recipe requires very few ingredients but the process needs some practice. After a few tries, you will be able to make uniform, thin Suralichya Vadya.
Ingredients (makes 20-25 pieces) (1 cup = 250ml)
Fine Gram Flour / Besan ½ cup
Curd ½ cup
Water 1.5 cups
Ginger Chili Paste ½ teaspoon
Turmeric Powder 1-2 pinch
Salt to taste
Oil to grease the plates / Platform
Chopped Coriander 1-2 teaspoon
Fresh Scraped Coconut 1- 2 teaspoon (optional)
For Tempering
Oil 1 teaspoon
Mustard Seeds ¼ teaspoon
Cumin Seeds ¼ teaspoon
Asafoetida a pinch
Instructions
1. In a bowl, beat curd. Add gram flour to the curd and mix well.
2. Add water and mix well. Make sure there are no lumps.
3. Add Turmeric Powder, Ginger Chili Paste, Salt and Mix well.
4. Grease flat plates for spreading the mixture.
5. Transfer the mixture to a heavy bottom pan. Keep cooking on low to medium flame. Stir continuously. After 7-8 minutes, Mixture will start thickening.
6. Keep cooking till the mixture becomes glossy. Turn the flame to low. Spread ¼ teaspoon of the mixture on a greased plate and spread it. Leave it to cool for 1 minute. Check if you are able to roll the mixture or it sticks to the plate. If it sticks to the plate, keep cooking further.
7. If you are able to roll the mixture, transfer a ladle full of mixture to a greased plate and quickly spread it evenly as thin as possible. You need to spread the mixture before it get cold. This way spread all the mixture.
8. Upon cooling, make one inch wide marks with a knife and roll the pieces.
9. For Tempering, heat Oil in a ladle. Add Mustard seeds, wait for splutter. Add cumin seeds, wait for splutter. Add Asafoetida. Switch off the gas. Pour this Tempering onto the prepared rolls. Garnish with scrapped coconut and coriander and enjoy yummy Suralichya Vadya / Khandvi.
Note
1. I Use kitchen platform to spread the mixture; I find it easier than using multiple plates for the same. Also I use silicon spatula for spreading the mixture. It is much easier to spread the mixture than using metal spatula.
2. I don’t spread all the mixture together. I keep the pan on low flame and spread a ladle-full of mixture at a time on the kitchen platform. Once the mixture is spread, I take another ladle-full. This way you get enough time to spread the entire mixture before it gets cold.
==================================================================================
सुरळीच्या वड्या / खांडवी – पारंपरिक महाराष्ट्रीयन / गुजराती पदार्थ
सुरळीच्या वड्या हा सगळ्यांचा आवडता लोकप्रिय पदार्थ आहे. गुजरातमध्ये ह्याला खांडवी म्हणतात. ऑस्ट्रेलियन मास्टर शेफ च्या एका भागात हा पदार्थ ‘पास्ता नॉट पास्ता‘ ह्या नावाने तिथे राहणाऱ्या एका भारतीय शेफने स्पर्धकांना करायला सांगितला होता!!
महाराष्ट्र आणि गुजरातची ही पारंपरिक रेसिपी आहे. पण मुंबईत सगळ्या फरसाणच्या दुकानात हा पदार्थ खांडवी म्हणूनच विकला जातो. त्यांना ‘सुरळीची वडी‘ हे नावही माहित नसतं!!!
ह्या रेसिपीत अगदी कमी जिन्नस लागतात पण कृती परफेक्ट व्हायला थोडा सराव लागतो. २–४ वेळा प्रयत्न केल्यावर तुम्ही छान पातळ सुरळीच्या वड्या नक्की करू शकाल. रेसिपी सोपी आहे.
साहित्य (१ कप = २५० मिली) (२०–२५ वड्यांसाठी)
बारीक बेसन अर्धा कप
दही अर्धा कप
पाणी दीड कप
आलं मिरची पेस्ट अर्धा टीस्पून
हळद १–२ चिमूट
मीठ चवीनुसार
तेल ताटलीला लावायला
चिरलेली कोथिंबीर १–२ टीस्पून
ताजा खवलेला नारळ १–२ टीस्पून (ऐच्छिक)
फोडणीसाठी
तेल १ टीस्पून
मोहरी पाव टीस्पून
जिरं पाव टीस्पून
हिंग १ चिमूट
कृती
१. एका वाडग्यात दही फेटून घ्या. त्यात बेसन घालून मिश्रण एकजीव करा.
२. आता त्यात पाणी घालून मिश्रण एकजीव करा. गुठळी राहू देऊ नका.
३. मिश्रणात हळद, आलं मिरची पेस्ट आणि मीठ घालून ढवळून घ्या.
४. ताटलीला / थाळ्याला तेल लावून ठेवा.
५. बेसनाचं मिश्रण एका जाड बुडाच्या कढईत घाला आणि मंद/मध्यम आचेवर ढवळत शिजवा. मिश्रण सतत ढवळावं लागतं. ७–८ मिनिटांनंतर मिश्रण घट्ट व्हायला लागेल.
६. मिश्रण तुकतुकीत (glossy) होईपर्यंत शिजवत राहा. गॅसची आच मंद करा. पाव टीस्पून ताटलीत पसरून १ मिनिट थांबा. मिश्रणाची गुंडाळी होते का ते बघा. मिश्रण व्यवस्थित ताटलीपासून सुटलं तर ते हवं तेवढं शिजलं आहे. पण जर ताटलीला चिकटून राहिलं किंवा गोळा झाला तर मिश्रण आणखी शिजवा.
७. मिश्रण शिजलं की मोठा डाव भरून मिश्रण ताटलीत घाला आणि कायलाथ्याने पातळ पसरून घ्या. मिश्रण गार व्हायच्या आत ते पसरावं लागतं. एका ताटलीत मिश्रण पसरून झालं की लगेच दुसऱ्या ताटलीत मिश्रण घालून पसरा. अशा तऱ्हेने सर्व मिश्रण ताटल्यांमध्ये पसरून घ्या.
८. मिश्रण गार झाल्यावर सुरीने १ इंच रुंदीच्या चिरा पाडा आणि पिठाची गुंडाळी (वडी) करून घ्या.
९. फोडणीसाठी तेल गरम करून मोहरी, जिरं आणि हिंगाची खमंग फोडणी करून घ्या. तयार फोडणी सुरळीच्या वड्यांवर घालून नारळ, कोथिंबीर भुरभुरवा. खमंग, चविष्ट सुरळीच्या वड्यांचा / खांडवीचा आस्वाद घ्या.
टीप
१. मी ताटलीऐवजी स्वयंपाकघराच्या ओट्यावर पीठ पसरून वड्या करते. आणि पीठ पसरायला सिलिकॉनचा कायलाथा वापरते. त्यानं पीठ व्यवस्थित पातळ पसरलं जातं.
२. मी सगळं पीठ एकदम पसरायला घेत नाही. पीठ ओट्यावर पसरताना मी एका वेळी एक डाव पीठ घेते आणि तेव्हा उरलेलं पीठ कढईतच ठेवून गॅस बारीक ठेवते. त्यामुळे पीठ पसरताना घाई होत नाही.
Your comments / feedback will help improve the recipes