Misalanacha Dabaa (मिसळणाचा डबा) – Spice Box

Misalanacha Dabaa (मिसळणाचा डबा) - Spice Box
Misalanacha Dabaa (मिसळणाचा डबा) - Spice Box

Misalanacha Dabaa (मिसळणाचा डबा) – Spice Box

मिसळणाचा डबा मराठी

In the kitchen of ladies of my generation (age 50+) and earlier generations, you will definitely find this Spice Box (Misalanacha Dabaa – मिसळणाचा डबा). We don’t call it Masala Box / Spice Box but we call it Misalanacha Dabaa (मिसळणाचा डबा). It has all the necessary ingredients required for every day cooking. My Grandmother had a Brass Dabaa; My mother and I have a Stainless Steel Dabaa. This Dabaa has seven bowls, small spoons and a double lid. With Double Lid, the bowls don’t leave their place when you handle the Dabaa. What do we store in these seven bowls? All the ingredients that you require for every day cooking. These ingredients vary from kitchen to kitchen. Mostly I cook Brahmani cuisines; So I store Misalan (Mustard Seeds ++), Cumin Seeds, Turmeric Powder, Asafoetida, Fenugreek Seeds, Chili Powder and Goda Masala. The ingredients have not changed from my Grand mother’s time. So with this Dabaa, Salt and Sugar/Jaggery, I can cook most of my dishes.

Misalanacha Dabaa (मिसळणाचा डबा) - Spice Box
Misalanacha Dabaa (मिसळणाचा डबा) – Spice Box

Few years back, they started selling a set of Glass / Plastic Jars as a replacement of this Dabaa. But when you use that, you have to open / close 7 Jars. This becomes difficult to handle. Whereas with this Dabaa, when you open a lid, everything is available. Our ancestors have really thought through while designing this Dabaa.

Tips for handling this Dabaa:

1. Ensure you don’t use wet spoons while taking out ingredients. Keep the Dabaa away from moisture.

2. Wipe the Dabaa every 3-4 weeks so that there are no stains.

3. Handle the Dabaa carefully so that the ingredients don’t mix together.

From my Grand Mother’s time (maybe earlier generations also), In tempering (Fodni – फोडणी) we don’t use only Mustard Seeds. Instead we use Misalan which is Mustard Seeds + Coriander Seeds + Karale Til (Niger Seeds / Khurasni). This makes the Tempering taste better (खमंग). Recipe of Misalan is very easy. Use one cup Mustard Seeds, ½ cup Coriander Seeds and ¼ cup Niger Seeds (Karale Til). Roughly pound Coriander Seeds. Mix all these 3 together and store this Misalan in a Glass Jar.

Misalan (मिसळण) - Mustard Seeds Mixture
Misalan (मिसळण) – Mustard Seeds Mixture

At least in my Kitchen, there is no substitute for Misalanacha Dabaa (मिसळणाचा डबा).

Misalanacha Dabaa (मिसळणाचा डबा) - Spice Box
Misalanacha Dabaa (मिसळणाचा डबा) – Spice Box
Misalan (मिसळण) - Mustard Seeds Mixture
Misalan (मिसळण) – Mustard Seeds Mixture

 

 

 

 

 

 

 

 

 

==================================================================================

मिसळणाचा डबा एक अत्यंत उपयोगी वस्तू – #मिसळणाचाडबा

आता पन्नाशीत असलेल्या आणि त्याआधीच्या पिढीच्या स्वयंपाकघरात हमखास वापरला जाणारा हा मिसळणाचा डबा. आम्ही ह्याला मसाल्याचा डबा म्हणत नाही. मिसळणाचा डबा म्हणतो. सर्वसाधारणपणे स्वयंपाक करताना लागणारे सर्व जिन्नस एकत्र ठेवण्यासाठी हा डबा अत्यंत उपयोगी पडतो. माझ्या आजीच्या स्वयंपाकघरात हा पितळेचा डबा होता. माझ्या माहेरी आणि माझ्याकडे हा स्टीलचा डबा. चपट्या दुहेरी झाकणाच्या डब्यात व्यवस्थित बसणाऱ्या सात वाट्या आणि त्यात बसणारे छोटे चमचे असं याचं स्वरूप. दुहेरी झाकण कातर डबा काढताना / ठेवताना त्या वाट्या इकडे तिकडे सरकून जिन्नस एकत्र होऊ नयेत.

सात वाट्यांमध्ये काय ठेवायचं? तर तुमच्या नेहमीच्या स्वयंपाकात लागणारे जिन्नस. प्रत्येक गृहिणीच्या जरुरीनुसार ह्यातले जिन्नस बदलतात. माझ्या ब्राह्मणी डब्यात मिसळण, जिरं, हळद, हिंग, मेथी, लाल तिखट आणि गोडा मसाला हे जिन्नस दिसतील. मिसळण म्हणजे काय ते पुढे लिहिलेलं आहे. माझ्या आजीच्या काळापासून हेच जिन्नस डब्यात असतात. हा डबा आणि मीठ, गूळ / साखर असली की आमचे बहुतेक सगळे पदार्थ करता येतात.

१५१६ वर्षांपूर्वी एकाच आकाराच्या १०१२ प्लास्टिक / काचेच्या बाटल्यांचा सेट बाजारात आला होता ह्या डब्याला पर्याय म्हणून. पण त्या बाटल्या उघडून परत बंद करणे यात वेळ जातो. त्यापेक्षा ह्या एका डब्याचं झाकण उघडलं की सगळे जिन्नस एकत्र मिळतात. आपल्या पूर्वजांनी फार विचार करून ही अतिशय उपयोगी वस्तू बनवली होती.

हा डबा वापरताना पाण्याचा हात लावायचा नाही. दर ३४ आठवडयांनी डबा पुसून ठेवायचा म्हणजे डब्याला कसलेही डाग दिसणार नाहीत. डबा काढताना / ठेवताना धसमुसळेपणा करायचा नाही म्हणजे आतले जिन्नस त्यांची जागा सोडणार नाहीत.

माझ्या आजीच्या काळापासून मी बघतेय आम्ही फोडणीत नुसती मोहरी घालत नाही तर मिसळण घालतो. मिसळण म्हणजे मोहरी, अर्धवट कुटलेले धने आणि कारळे तीळ यांचं मिश्रण. फोडणीत हे मिसळण घातलं की फोडणी मस्त खमंग होते. मिसळण करणं हे अगदी सोपं आहे. मोहरीच्या अर्धे धने आणि धन्याच्या अर्धे कारळे तीळ. धने अर्धवट कुटून घेऊन त्यात मोहरी आणि कारळे तीळ घालून एकत्र करून बाटलीत भरून ठेवायचं आणि नेहमीच्या वापरासाठी ह्या मिसळणाच्या डब्यात काढून घ्यायचं.

Misalan (मिसळण) - Mustard Seeds Mixture
Misalan (मिसळण) – Mustard Seeds Mixture

माझ्या स्वयंपाकघरात तरी ह्या मिसळणाच्या डब्याला दुसरा पर्याय नाही.

Misalan (मिसळण) - Mustard Seeds Mixture
Misalan (मिसळण) – Mustard Seeds Mixture
Misalanacha Dabaa (मिसळणाचा डबा) - Spice Box
Misalanacha Dabaa (मिसळणाचा डबा) – Spice Box

Be the first to comment

Your comments / feedback will help improve the recipes