Kothimbir Vadi (कोथिंबीर वडी) – Maharashtrian Specialty Coriander Snack – crispy Snack without using Baking Soda – No Onion Garlic recipe

Kothimbir Vadi
Kothimbir Vadi (कोथिंबीर वडी)

Kothimbir Vadi (कोथिंबीर वडी) – Maharashtrian Specialty Coriander Snack – crispy Snack without using Baking Soda – No Onion Garlic recipe

खुसखुशीत कोथिंबीर वडी मराठी

This is a famous Maharashtrian recipe that is very easy to make. This is a no onion/garlic recipe. I don’t add baking soda as well. Still this Kothimbir Vadi is crisp. This is my Mother’s recipe.

There are 2 important ingredients in this recipe. First is Rice Flour. I mix Rice flour and Gram flour together to make the batter. This is the Rice Flour that makes Vadi crispy. Second ingredient is Oil. Oil is added to the batter. That makes Vadi moist and not dry.

You can enjoy Kothimbir Vadi 1) Steamed (most healthy) or 2) With Tempering poured on it or 3) Shallow Fried or 4) Deep Fried or 5) making a Bhaaji (subji) from Kothimbir Vadi.

Ingredients (1 cup = 250 ml)

Coriander leaves (Kothimbir) finely chopped 1 cup

Gram Flour (Besan) ½ cup

Rice Flour ½ cup

Oil ½ teaspoon

Green Chili Paste 1 teaspoon

Turmeric Powder ½ teaspoon

Asafoetida (Hing) ¼ teaspoon

Sesame Seeds 1 teaspoon

Salt to taste

Water About ¾ cup

Oil To Fry

Instructions

1. Mix all ingredients (except oil required for frying and water) in a bowl. Add water and make a batter of a consistency of Pan Cake batter.

Kothimbir Vadi
Kothimbir Vadi Batter (कोथिंबीर वडीचं मिश्रण)

2. Grease flat plates with oil. Spread the batter in plates about ¾ cm to 1 cm thick. Spread Sesame seeds on the top and gently press them.

Kothimbir Vadi
Kothimbir Vadi Batter before Steaming (कोथिंबीर वडीचं मिश्रण वाफवण्यापूर्वी )

3. Steam for 20-25 minutes. Use either idli maker or pressure cooker without whistle.

Kothimbir Vadi
Kothimbir Vadi Batter after Steaming (कोथिंबीर वडीचं मिश्रण वाफवल्यानंतर )

4. On cooling cut into bite size pieces.

5. These are ready to eat (more healthy) or

6. Make tempering using Oil, Mustard, Cumin Seeds and Pour it on Vadi. Or

7. Shallow Fry or Deep fry in oil. Or

9. Make Kothimbir Vadi Subji as given below.

Kothimbir Vadi Bhaaji (Subji)

1. Chop Kothimbir vadi prepared as above (unfried) into small pieces about ½ inch square.

2. Heat 2 teaspoon of oil in a frying pan on medium flame.

3. Add ¼ teaspoon black mustard seeds, wait for sputter; add ¼ teaspoon of cumin seeds, wait for sputter; add ¼ teaspoon of turmeric powder and a pinch of Asafoetida (hing).

4. Add chopped Kothimbir Vadi .

5. Add ½ – 1 teaspoon sugar (optional) and 2 teaspoon fresh scraped coconut.

6. Cook covered for about 3 minutes. Serve as a part of main course.

Kothimbir Vadi
Kothimbir Vadi (कोथिंबीर वडी)
Kothimbir Vadi
Kothimbir Vadi (कोथिंबीर वडी)

 

 

 

 

 

 

 

 

==================================================================================

खुसखुशीत कोथिंबीर वडी बेकिंग सोडा न घालता

कोथिंबीर वडी हा एक खास महाराष्ट्रीयन पदार्थ आहे. बाहेर कोथिंबीर वडीच्या नावाखाली काहीही विकतात. बरेचदा तेलकट, आतून ओलसर असलेल्या वड्या बघितल्या की खाण्याची इच्छाच होत नाही. घरी केलेली कोथिंबीर वडी बेकिंग सोडा न घालता खुसखुशीत होते. रेसिपीही अगदी सोपी आहे. ही माझ्या आईची रेसिपी आहे. ह्या वड्या सुक्या होत नाहीत आणि दडदडीतही होत नाहीत .

ह्या रेसिपीमध्ये दोन जिन्नस महत्त्वाचे आहेत. पहिला म्हणजे तांदुळाचं पीठ. बेसनाच्या बरोबरीने तांदुळाचं पीठ घातलं की वड्या छान खुसखुशीत होतात दडदडीत होत नाहीत. दुसरा जिन्नस म्हणजे तेल. वड्यांच्या मिश्रणात तेल घातलं की वड्या सुक्या होत नाहीत.

ह्या कोथिंबीर वड्या तुम्ही वेगवेगळ्या खायला देऊ शकता. . वाफवलेल्या वड्या (सर्वात पौष्टिक डाएट करणाऱ्या लोकांसाठी उत्तम) . वरून फोडणी देऊन ३. तव्यावर तेलात भाजून (shallow fry) . तेलात तळून आणि ५. वड्यांचे तुकडे फोडणीला टाकून आणि त्यात चवीपुरती साखर आणि खवलेला नारळ घालून भाजी करून.

मला पहिला आणि शेवटचा प्रकार फार आवडतो.

साहित्य (१ कप = २५० मिली)

बारीक चिरलेली कोथिंबीर १ कप

बेसन अर्धा कप

तांदुळाचं पीठ अर्धा कप

तेल अर्धा टीस्पून

ठेचलेली हिरवी मिरची १ टीस्पून

हळद अर्धा टीस्पून

हिंग पाव टीस्पून

तीळ १ टीस्पून

मीठ चवीनुसार

पाणी अंदाजे पाऊण कप

तेल वड्या तळायला

कृती

. एका वाडग्यात वर लिहिलेले सर्व जिन्नस घेऊन (तळण्यासाठीचं तेल, तीळ आणि पाणी वगळून) एकत्र करा. आता थोडं थोडं पाणी घालून इडलीच्या पिठाएवढं पातळ मिश्रण बनवून घ्या.

Kothimbir Vadi
Kothimbir Vadi Batter (कोथिंबीर वडीचं मिश्रण)

. वड्या वाफवण्यासाठी इडली पात्रात किंवा मोठ्या पातेल्यात पाणी गरम करा.

. सपाट ताटल्यांना तेल लावून घ्या. तयार मिश्रण ताटल्यांमध्ये घालून साधारण पाऊण ते एक सेमी. जाडीचा थर द्या. ताटली हलकेच आपटून मिश्रण समतल करा.

. मिश्रणावर थोडे तीळ पसरून हलकेच दाबून घ्या.

Kothimbir Vadi
Kothimbir Vadi Batter before Steaming (कोथिंबीर वडीचं मिश्रण वाफवण्यापूर्वी )

. गरम करायला ठेवलेल्या पाण्याला उकळी आली की त्यात ताटली ठेवून झाकणलावून २०२५ मिनिटं वाफवून घ्या.

Kothimbir Vadi
Kothimbir Vadi Batter after Steaming (कोथिंबीर वडीचं मिश्रण वाफवल्यानंतर )

. गार झाल्यावर चौकोनी वड्या कापा.

. ह्या वड्या अशाच खाऊ शकता खूप चविष्ट आणि पौष्टिक असतात.

. तेल, मोहरी, जिऱ्याची  खमंग फोडणी करून वड्यांवर घाला आणि वड्या खायला द्या

. तव्यावर तेल घालून वड्या भाजून घ्या किंवा वड्या गरम तेलात खमंग तळून घ्या. आणि गरमागरम खायला द्या.

. वड्यांचे जरा बारीक तुकडे करून घ्या. तेल, मोहरी, जिऱ्याची खमंग फोडणी करून त्यात हे तुकडे घाला. चवीपुरती साखर आणि थोडा खवलेला नारळ घालून ढवळून घ्या आणि झाकण ठेवून एक वाफ काढा‘. ही कोथिंबीर वड्यांची भाजी पोळी / भातासोबत खायला द्या.

Kothimbir Vadi
Kothimbir Vadi (कोथिंबीर वडी)
Kothimbir Vadi
Kothimbir Vadi (कोथिंबीर वडी)

 

 

2 Comments

  1. वाचून आणि फोटो पाहून तोंडाला पाणी सुटले सुधा

Your comments / feedback will help improve the recipes