Panchamrut (पंचामृत) – Maharashtrian Specialty Sweet and Sour Chutney

Panchamrut (पंचामृत)

Panchamrut (पंचामृत) – Maharashtrian Specialty Sweet and Sour Chutney

पंचामृत मराठी

This chutney is generally made on Auspicious occasions as a part of Prasad (Offering to God) Platter. This is one of the forgotten specialties from Maharashtra. It is not to be mistaken for Panchamrut / Charanamrut which is Teerth (Auspicious Mixture) that is made for any Pooja. That contains Milk, Curd, Ghee, Honey and Sugar. This Panchamrut has five basic ingredients – Tamarind, Jaggery, Peanuts, Dry Coconut and White Sesame Seeds. It’s a very easy recipe and makes yummy Chutney. We have it with Thepla/ Roti / Bhakari.

I don’t add Goda Masala to Panchamrut. If you want, you can add it.

Ingredients

Raw Peanuts ¼ cup

Dry coconut thin slices ¼ cup

White sesame seeds (Til) ½ cup

Tamarind Pulp ¾ cup

Crushed Jaggery about 1 cup (Adjust as per taste)

Salt 2 pinch

For Tempering / Tadka

Oil 1.5 tablespoon

Mustard Seeds ¼ teaspoon

Turmeric Powder ¼ teaspoon

Asafoetida (Hing) 2 pinch

Instructions

1. Dry roast white sesame seeds. After cooling grind into a coarse powder.

2. In a pan, heat oil on medium flame.

3. Add Mustard seeds; wait for splutter. Add Turmeric Powder and Asafoetida (Hing).

4. Add Raw Peanuts. Sauté for 2-3 minutes.

5. Add Dry coconut slices. Sauté for 2 minutes.

6. Add Tamarind pulp. Bring the mixture to boil.

7. Add Jaggery. Cook for 3-4 minutes. Add water if mixture is dry.

8. Add Sesame powder, Salt. Mix. Bring to boil.

9. Panchamrut will thicken as it cools. So don’t make the mixture very thick.

10. Panchamrut is ready. It’s very tasty. Serve as Chutney with Roti / Thepla (Indian Breads).

Panchamrut

 

 

 

 

 

 

Note

1. You can add 2 table spoons of chopped cashew nuts also. Add those after you sauté dry coconut pieces and saute for 2 minutes.

====================================================================================

पंचामृत विस्मृतीत गेलेली महाराष्ट्रीयन स्पेशालिटी

जेव्हा लग्नाच्या जेवणाच्या पंगती असायच्या तेव्हा हे पंचामृत नेहमी असायचं. चटणी च्या बाजूला वाढलेलं किंचित पंचामृत फारच चविष्ट असायचं पण ते कधीच परत वाढायला आणायचे नाहीत. घरी कधी कार्य असलं तर प्रसादाच्या ताटात पंचामृत असायचं पण तेव्हाची अगदी ते अगदी थोडंसच बनवलं जायचं. कारण माहित नाही. पण मला नेहमी हा पदार्थ आणखी हवा असायचा. म्हणून आता मी पंचामृत चटणी म्हणून बनवते आणि आम्ही हे ठेपले, पोळी, भाकरी बरोबर खातो. मस्त चविष्ट लागतं. पंचामृत वेगवेगळ्या प्रकारे बनवलं जातं. मी ह्या रेसिपी प्रमाणे बनवते. मी ह्यात गोडा मसाला घालत नाही. तुम्हाला पाहिजे तर १ चमचा गोडा मसाला घालू शकता

साहित्य

कच्चे शेंगदाणे पाव कप

सुक्या खोबऱ्याचे पातळ काप पाव कप

पांढरे तीळ अर्धा कप

चिंचेचा कोळ पाऊण कप

चिरलेला गूळ अंदाजे १ कप (चवीनुसार कमी / जास्त करा)

मीठ २ चिमूट

फोडणीसाठी

तेल दीड टेबलस्पून

मोहरी पाव चमचा

हळद पाव चमचा

हिंग २ चिमूट

कृती

. तीळ खमंग भाजून घ्या. गार करून मिक्सर मध्ये जाडसर वाटून घ्या.

. एका कढईत तेल गरम करून मोहरी, हळद आणि हिंगाची खमंग फोडणी करा.

. फोडणीत शेंगदाणे घालून २३ मिनिटं परता.

. खोबऱ्याचे काप घालून २ मिनिटं परता.

. चिंचेचा कोळ घाला. मिश्रणाला उकळी काढा.

. गूळ घालून मिश्रण ३४ मिनिटं शिजवा. जरूर पडल्यास थोडं पाणी घाला

. तिळाची पूड आणि मीठ घाला. मिश्रणाला उकळी काढा

. पंचामृत गार झाल्यावर दाट होतं म्हणून शिजवताना फार दाट करू नका. हवं तेवढं दाट झाल्यावर गॅस बंद करा.

. चविष्ट पंचामृत तयार आहे. ठेपले, पोळी, भाकरी बरोबर चटणी म्हणून खायला द्या.

१०. पंचामृत फ्रिजमध्ये २३ दिवस चांगले राहते

टीप

. तुम्ही ह्यात २ टेबलस्पून काजूचे तुकडे ही घालू शकता. खोबऱ्याचे काप परतून घेतल्यावर काजूचे तुकडे घालून २ मिनिटं परतून घ्या.

Panchamrut (पंचामृत)
Panchamrut (पंचामृत)

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*