Bajra / Bajri Khichada (बाजरीचा खिचडा) – Pearl Millet Kedgeree

Bajra Khichada with Kadhi and Papad (बाजरीचा खिचडा, कढी, पापड)

Bajra / Bajra Khichada (बाजरीचा खिचडा) – Pearl Millet Kedgeree – #winterrecipes

बाजरीचा खिचडा मराठी

Khichada – It’s not a spelling mistake. It is Khichada and not Khichadi. It’s a traditional dish from Rajasthan prepared in winter when different types of fresh beans are available. Also Bajra/ Bajri (Pearl Millet) is good for health in cold winters. My friend told me about this Khichada that she had first tasted in a wedding in Rajasthan. She told me that it’s made with Bajra (Pearl Millet), different types of fresh beans and Green Garlic. From the ingredients, I thought it would taste nice; so gave it a try. I could get only two types of beans – Tuvar (Pigeon Peas) and Chana (Chickpeas). But you can add Val Pavta (Field Beans), Matar (Green Peas) and Corn also. I added little Moong Daal (Split Petite Yellow Lentil) along with Bajra to get right consistency of Khichada. The amount of beans should be more than Bajra and Moong Dal (Split Petite Yellow Lentil). The important spice that is required for this recipe is Green Garlic. It’s an easy recipe that makes yummy Khichada. You can change the proportion of beans as per your choice. When served with Buttermilk Kadhi, it makes a perfect meal in winter.

Ingredients (Serves 4) (1 cup = 250 ml)

Main Ingredients – Bajra (Pearl Millet), Moong Daal, Fresh Pigeon Peas, Fresh Chickpeas, Fresh Garlic (मुख्य साहित्य – बाजरी, मूग डाळ, तुरीचे दाणे, सोलाणे, ओली लसूण )

Whole Bajra (Pearl Millet) ¾ cup

Moong Daal (Split Petite Yellow Lentil) ¼ cup

Fresh Tuvar Beans (Pigeon Peas) ½ cup

Fresh Chickpeas 1 cup

Green Garlic 20-22 sticks along with garlic buds

Coriander Powder 1 teaspoon

Cumin Powder 1 teaspoon

Lemon Juice 1 teaspoon

Chili Powder ½ teaspoon

Desi Ghee (Clarified Butter) 3 tablespoon

Cumin Seeds ½ teaspoon

Asafoetida 2 pinch

Turmeric Powder ½ teaspoon

Curry Leaves 10-12

Chopped coriander 1 tablespoon

Salt to Taste

Instructions

1. Wash and Drain Bajra and Moong Daal separately. Keep covered for 15 minutes.

2. Using a grinder coarse grind Bajra.

3. Wash and chop Green Garlic and grind into a fine paste. Add little water if required.

4. In a pan, heat 2 tablespoon of Ghee. Add cumin seeds, wait for splutter. Add turmeric powder, Asafoetida and curry leaves.

5. Add both types of beans and saute on low flame for 5 minutes.

6. Add Bajra and Moong Daal. Saute till mixture gets dry.

7. Simultaneously boil 3 cups of water is a bowl.

8. Add boiling water to the pan. Add Garlic paste, Chili Powder, coriander Powder, Cumin Powder, lemon juice and Salt. Mix well.

9. Transfer the mixture to a pressure cooker and pressure cook. Simmer for 15 minutes after two whistles. Bajra takes long to cook.

10. After the steam from pressure cooker releases, transfer the mixture to a pan.

11. Adjust the consistency of Khichada. It should be porridge consistency. Add water if required and cook on low flame.

12. Add chopped coriander and 1 tablespoon of Ghee. Mix.

13. Yummy Bajra Khichada is ready. Serve hot with Kadhi and a spoonful of Ghee.

 

Bajra Khichada with Kadhi (बाजरीचा खिचडा आणि कढी)
Bajra Khichada with Kadhi and Papad (बाजरीचा खिचडा, कढी, पापड)

==================================================================================

बाजरीचा खिचडा राजस्थानी स्पेशालिटी

खिचडा नाव लिहिताना चूक झाली नाहीये. ह्याला खिचडा असंच नाव आहे. राजस्थानात थंडीच्या दिवसात करतात. बाजरी थंडीत खाल्ली जाते. आणि ह्या खिचड्यात वेगवेगळ्या प्रकारचे ताजे दाणे (वाल, तुरीचे दाणे, हरभरे, मटार आणि मक्याचे दाणे) घालतात. माझ्या एका मैत्रिणीने बोलता बोलता सांगितलं ह्या खिचड्याबद्दल आणि काय काय घालतात हे सांगितलं. मला वाटलं की छान पदार्थ होईल म्हणून करून बघितला. मला वालाचे दाणे मिळाले नाहीत म्हणून तुरीचे दाणे आणि सोलाणे (ओले हरभरे) घातले. मटार आणि मक्याचे दाणे मुद्दाम नाही घातले कारण हे नेहमी पुलावात / मसालेभातात घालतोच. बाजरीबरोबर थोडी मुगाची डाळ घातली म्हणजे खिचडा मिळून येतो. हा खिचडा मऊ भातासारखा पातळ असतो. यात सर्वात महत्त्वाचा जिन्नस म्हणजे ओली पातीची लसूण. बाकी नेहमीचे जिन्नस लाल तिखट, धने, जिरे पूड. हा खिचडा साजूक तुपात करतात. खूप चविष्ट झाला हा प्रकार. सोबत ताकाची कढी केली. गरम गरम खिचडा, वर साजूक तूप, कढी आणि पापड अगदी मेजवानीच झालीआता हिवाळ्यात २३ दा होतोच हा खिचडा.

एक टीप उपलब्ध असलेले सगळे दाणे घाला वालाचे दाणे, तुरीचे दाणे, सोलाणे (ओले हरभरे), मटार आणि मक्याचे दाणे. पण सगळे दाणे मिळून बाजरी+ मुगाच्या डाळीपेक्षा जास्त असू द्या.

साहित्य (४ जणांसाठी) (१ कप = २५० मिली )

Main Ingredients – Bajra (Pearl Millet), Moong Daal, Fresh Pigeon Peas, Fresh Chickpeas, Fresh Garlic (मुख्य साहित्य – बाजरी, मूग डाळ, तुरीचे दाणे, सोलाणे, ओली लसूण )

बाजरी पाऊण कप

मूग डाळ पाव कप

तुरीचे दाणे अर्धा कप

ओले हरभरे (सोलाणे) १ कप

ओली लसूण २०२२ काड्या लसणीसकट

धने पूड १ टीस्पून

जिरे पूड १ टीस्पून

लिंबाचा रस १ टीस्पून

लाल तिखट अर्धा टीस्पून

साजूक तूप ३ टेबलस्पून

जिरं अर्धा टीस्पून

हिंग २ चिमूट

हळद अर्धा टीस्पून

कढीपत्ता १०१२ पानं

चिरलेली कोथिंबीर १ टेबलस्पून

मीठ चवीनुसार


कृती

. बाजरी आणि मूग डाळ वेगवेगळी धुवून पाणी निथळून घ्या. १५ मिनिटं झाकून ठेवा.

. बाजरी मिक्सरमध्ये जाडसर वाटून घ्या.

. ओली लसूण धुवून मिक्सर मध्ये बारीक वाटून घ्या. जरूर पडल्यास वाटताना थोडं पाणी घाला

. एका पातेल्यात २ टेबलस्पून साजूक तूप घालून जिरं, हिंग, हळद आणि कढीपत्ता घालून फोडणी करा.

सर्व प्रकारचे दाणे फोडणीत घालून ५ मिनिटं मंद आचेवर परता.

. बाजरी आणि मुगाची डाळ पातेल्यात घालून मंद आचेवर मिश्रण सुकं होईपर्यंत परतून घ्या.

. ३ कप उकळतं पाणी पातेल्यात घाला.

. वाटलेली लसूण, धने जिरे पूड, लाल तिखट, लिंबाचा रस, मीठ घालून ढवळून घ्या.

. मिश्रण प्रेशर कुकर मध्ये शिजत ठेवा. कुकर च्या २ शिट्या झाल्या की १५ मिनिटं कुकर मंद आचेवर ठेवा.

१०. कुकरची वाफ गेली की मिश्रण परत पातेल्यात काढा. हा खिचडा मऊ भातासारखा पातळ असतो. हवे असल्यास पाणी घालून वाफ काढा.

११. चिरलेली कोथिंबीर आणि १ टेबलस्पून साजूक तूप घालून ढवळून घ्या.

१२. गरमागरम खिचडा वर साजूक तूप घालून कढी आणि पापडासोबत सर्व्ह करा

 

Bajra Khichada with Kadhi (बाजरीचा खिचडा आणि कढी)
Bajra Khichada with Kadhi and Papad (बाजरीचा खिचडा, कढी, पापड)

 

2 Comments

Your comments / feedback will help improve the recipes