Dal Khichadi

Dal Khichadi (दाल खिचडी)

Dal Khichadi (दाल खिचडी) – Rice Lentil Kedgeree

दाल खिचडी मराठी

We are so funny. At home we look for Restaurant style food and in Restaurants we look for Homely food!!! I guess we are generally not happy with whatever we get!!! So this is an easy recipe that makes Restaurant Style Dal Khichadi at home…

This is one dish simple meal when you want to skip full meal. Or this can also be a substitute for Rice and Dal (Split Pigeon Peas) in full meal. There are different recipes for Dal Khichadi but I use this easy recipe that makes very tasty Restaurant style khichadi.

Ingredients (Serves 5) (1 cup = 250 ml)

Rice ¾ cup

Split Pigeon Peas (Toovar Dal) ¾ cup

Cloves 2-3

Cinnamon 1 inch stick

Black Pepper 7-8

Red Chilies 2-3

Green Chilies 2

Finely Chopped Onion ½ cup

Finely Chopped Tomato ½ cup

Finely Chopped Garlic 1 tablespoon

Chilly Powder ½ teaspoon

Chopped coriander 1.5 teaspoon

Ghee / Clarified Butter 1 tablespoon

Cumin Seeds ½ teaspoon

Turmeric Powder ½ teaspoon

Asafoetida ¼ teaspoon

Oil 2 drops to cook Dal

Curry leaves 7-8

Salt to taste

Instructions

1. Wash and drain Rice.

2. Wash and drain Split Pigeon Peas (Toovar Dal).

3. Add a pinch of Asafoetida, 2 drops of oil and a pinch of Turmeric Powder and 2.5 cups of water to Split Pigeon Peas (Toovar Dal). Add 2 cups of water to rice and Pressure cook Dal and rice separately.

4. In a heavy bottom pan heat ½ tablespoon of Ghee.

5. Add Cumin Seeds, Asafoetida, Turmeric Powder, Cloves, Cinnamon, Black Pepper, Curry Leaves, slit Green chilies, ½ teaspoon of Garlic and chopped Onion. Saute on low flame for 2-3 minutes.

6. Add chopped tomatoes. Saute on low flame for 2-3 minutes. Cooked covered on low flame till Onions are soft.

7. Add cooked Rice and Dal. Add Salt, Chili powder and mix well. Add water to adjust consistency.

8. Cook on medium flame for 4-5 minutes. Add coriander and mix.

9. In a ladle, heat ½ tablespoon of ghee. Add remaining Garlic and slit red chilies. When garlic is light brown, pour this tempering on Khichadi.

10. Serve this yummy Dal Khichadi hot with pure Ghee and Papad.

Dal Khichadi (दाल खिचडी)
Dal Khichadi (दाल खिचडी)
       ==================================================================================

दाल खिचडी रेस्टॉरंट स्टाईल

आपण किती विचित्र असतो ना!! घरी आपल्याला रेस्टॉरंट सारखं जेवण हवं असतं आणि रेस्टॉरंट मध्ये घरगुती जेवण हवं असतं!! मला वाटतं जे मिळतं त्यात आपण कधीच समाधानी नसतो. तर आज एक रेस्टॉरंट स्टाईल डिश जी तुम्ही सहज घरी करू शकता.

कधी साधं जेवण हवं असेल किंवा कधी भात, आमटी चा कंटाळा आला असेल  तर दाल खिचडी हा उत्तम पर्याय आहे. दाल खिचडी वेगवेगळ्या प्रकारे बनवली जाते. मी ही रेसिपी वापरून खिचडी बनवते. आणि माझ्या सुनेच्या भाषेत ती खिचडी awesome होते!!!

साहित्य नेहमीचंच आहे – घरी असणारं. फक्त एकच टीप – ही खिचडी साजूक तुपातच करायची; तेलात करून चव बदलेल.

साहित्य ( जणांसाठी) ( कप = २५० मिली)

तांदूळ पाऊण कप

तूर डाळ पाऊण कप

लवंग २

दालचिनी १ इंचाचा तुकडा

काळी मिरी ७

लाल मिरच्या २

हिरव्या मिरच्या २

बारीक चिरलेला कांदा अर्धा कप

बारीक चिरलेला टोमॅटो अर्धा कप

बारीक चिरलेली लसूण १ टेबलस्पून

लाल तिखट अर्धा टीस्पून

चिरलेली कोथिंबीर दीड टेबलस्पून

साजूक तूप १ टेबलस्पून

तेल २ थेम्ब

जिरं अर्धा टीस्पून

हळद अर्धा टीस्पून

हिंग पाव  टीस्पून

कढीपत्ता ७८ पानं

मीठ चवीनुसार

कृती

. डाळ आणि तांदूळ धुवून घ्या.

. डाळीत अडीच कप पाणी, पाव चमचा हळद, चिमूटभर हिंग आणि तेलाचे २ थेम्ब घालून प्रेशर कुकर मध्ये शिजवून घ्या.

. तांदुळात २ कप पाणी घालून प्रेशर कुकर मध्ये शिजवून घ्या.

. एका कढईत अर्धा टेबलस्पून साजूक तूप घालून जिरं , हिंगाची फोडणी करा. त्यात अर्धा टेबलस्पून चिरलेली लसूण घालून गुलाबी रंगावर परतून घ्या. त्यात लवंग, मिरी, दालचिनी, कढीपत्ता, हळद, हिरवी मिरची (उभी मधे चिरून) आणि चिरलेला कांदा घाला. मंद आचेवर २३ मिनिटं परतून घ्या.

. चिरलेला टोमॅटो घाला. मंद आचेवर २३ मिनिटं परतून घ्या. झाकण ठेवून मंद आचेवर कांदा नरम होईपर्यंत शिजवून घ्या.

. शिजलेली डाळ आणि तांदूळ घाला. एकजीव करा. मीठ आणि लाल तिखट घाला. जरुरीप्रमाणे पाणी घाला. खिचडी गार झाल्यावर दाट होते. त्या अंदाजाने पाणी घाला

. मिश्रण एकजीव करून ५६ मिनिटं शिजवा.

. चिरलेली कोथिंबीर घाला.

. एका लहान कढल्यात अर्धा टेबलस्पून साजूक तूप घालून गरम करा. त्यात उरलेली लसूण घाला. गुलाबी रंगावर परतून घ्या. लाल मिरच्या घाला आणि ही फोडणी खिचडीवर घाला.

१०. गरम गरम दाल खिचडी कढी आणि पापडासोबत खायला द्या

Dal Khichadi (दाल खिचडी)
Dal Khichadi (दाल खिचडी)

Be the first to comment

Your comments / feedback will help improve the recipes