Dhapate (धपाटे) – Multi Grain Pan Cake – A Maharashtrian Specialty

Dhapate (धपाटे)
Dhapate (धपाटे)

Dhapate (धपाटे) – Multi Grain Pan Cake – A Maharashtrian Specialty

धपाटे मराठी

This is traditional Maharashtrian snack / Breakfast dish from Vidarbha / Marathwada region. You can call it Multi grain Thalipeeth. But in this different types of flour are mixed together unlike in Thalipeeth where the grains are roasted and ground together. It is an easy, quick and healthy recipe. The ingredients differ from family to family. Traditional Dhapate are not rolled but the dough is patted to make a flatbread. But we like Dhapate little thin, so I roll them.

I add Puffed Amaranth Grain / Puffed Sorgham (राजगिरा लाह्या किंवा ज्वारीच्या लाह्या) while making Dhapate. This keeps Dhapate soft for a long time.

Ingredients (1 cup = 250 ml) (Makes 7-8 Dhapate)

Sorghum Flour (Jowar flour) 1 cup
Wheat flour ½ cup
Rice flour 1 tablespoon
Puffed Amaranth / Puffed Sorgham 1 cup
Carom Seeds (Ajwain) ½ teaspoon
White Sesame seeds (Til) 2 tablespoon
Chili powder /chili paste ¼ teaspoon
Sugar ½ teaspoon
Crushed garlic 3-4 cloves (Do not make a paste of garlic; crush it coarse) Optional
Turmeric Powder ¼ teaspoon
Chopped Coriander 1 teaspoon
Curd 2 tablespoon
Salt to taste
Oil / Butter / Ghee (Clarified Butter) for roasting

Instructions

1. If you are using Puffed Sorgham, grind it coarse. You don’t need to grind Puffed Amaranth, use it as it is.

Ingredients of Dhapate (धपाट्याचं साहित्य)

2. Mix all ingredients and bind dough with warm water. Dough should not be too soft. We have to roll the dough. Knead the dough well. Let the dough rest for 10 minutes.

Dhapate dough (धपाट्याचं पीठ )

3. Take a big lemon size dough ball, place it in between 2 plastic sheets and roll it little thinner than Paratha. Sprinkle some Jowar/wheat flour while rolling if mixture is sticky.

Dhapata rolled on plastic sheet (लाटलेला धपाटा )

4. Roast it on a hot griddle (preferably Iron Griddle) with a few drops of oil or butter. Serve hot with curd or butter or chutney. It’s very tasty and filling.

Note

1. You can omit Garlic if you don’t like it.

2. You can onions (finely chopped).

3. You can add spring onions or Carrot or any other veggie of you choice.

 

Dhapate

 

 

 

 

 

 

 

==================================================================================

धपाटे सोपा आणि पौष्टिक नाश्त्याचा प्रकार

धपाटे ही महाराष्ट्राची (विदर्भ / मराठवाड्या कडची) स्पेशालिटी आहे. हा थोडा थालीपिठासारखा प्रकार आहे. पण ह्यात कच्ची पिठं घालतात. धपाटे वेगवेगळ्या प्रकारे केले जातात. मी ज्वारीचं पीठ, गव्हाचं पीठ, तांदुळाचं पीठ आणि राजगिऱ्याच्या / ज्वारीच्या लाह्या एकत्र करून धपाटे करते. लाह्यांमुळे धपाटे गार झाल्यावर सुद्धा नरम राहतात. मुलांना डब्यात देण्यासाठी सुद्धा छान पदार्थ आहे.

पारंपरिक धपाट्यांमध्ये लाह्या घालत नाहीत. आणि ते लाटून न करता थापून करतात. पण प्लॅस्टिकच्या कागदामध्ये पिठाचा गोळा ठेवला तर धपाटे लाटून करणं सोपं पडतं.

साहित्य (८ धपाट्यांसाठी) (१ कप = २५० मिली)

ज्वारीचं पीठ १ कप

कणिक अर्धा कप

तांदुळाचं पीठ १ टेबलस्पून

राजगिऱ्याच्या लाह्या / ज्वारीच्या लाह्या१ कप

दही २ टेबलस्पून

ठेचलेली हिरवी मिरची / लाल तिखट पाव टीस्पून

लसूण ३४ पाकळ्या ठेचून (ऐच्छिक)

तीळ दोन टेबलस्पून

ओवा अर्धा टीस्पून

हळद पाव टीस्पून

साखर अर्धा चमचा

चिरलेली कोथिंबीर १ टीस्पून

तेल १ चमचा आणि धपाटे भाजताना लावण्यासाठी

मीठ चवीनुसार

कृती

. ज्वारीच्या लाह्या घालणार असाल तर मिक्सरमध्ये बारीक करून घ्या. राजगिऱ्याच्या लाह्या तशाच घालू शकता.

. एका परातीत सर्व साहित्य घेऊन एकत्र करा. थोडं थोडं कोमट पाणी घालून मध्यम सैल पीठ भिजवून घ्या. पीठ चांगलं मळून घ्या आणि १० मिनिटं झाकून ठेवा.

Ingredients of Dhapate (धपाट्याचं साहित्य)
Dhapate dough (धपाट्याचं पीठ )

. पिठाचा मोठ्या लिंबाच्या आकाराचा गोळा घेऊन २ प्लास्टिक कागदाच्या मध्ये ठेवून जाडसर लाटून घ्या. लाटताना जरूर असेल तर ज्वारीचं किंवा गव्हाचं पीठ लावा.

Dhapata rolled on plastic sheet (लाटलेला धपाटा )

. गरम तव्यावर (शक्यतो लोखंडाच्या) थोडं तेल सोडून धपाटे खरपूस भाजून घ्या.

. गरमागरम धपाटे लोणी / साजूक तूप /लोणचं / चटणी सोबत खायला द्या.

टीप

. लसूण आवडत नसेल तर घालू नका.

. ह्यात तुम्ही बारीक चिरलेला कांदा घालू शकता.

. ह्यात पातीचा कांदा, गाजर किंवा तुमच्या आवडीची भाजी घालू शकता.

Dhapate (धपाटे)
Dhapate (धपाटे)

Be the first to comment

Your comments / feedback will help improve the recipes