Lasaniche Tikhat (लसणीचं तिखट – लसूण चटणी) – Garlic Chutney – Famous Batata Vada Chutney
This is famous Maharashtrian Chutney that you generally relish with Batata Vada. There are a few dry Chutneys that are generally there in Maharashtrian households – this is one of them. This tasty dry Chutney is easy to make and lasts for 2-3 weeks at room temperature. This chutney requires very few ingredients; the main ingredients being Dry coconut and Garlic. For best texture and taste, pound this Chutney using Mortar – Pestle. If you grind the chutney using grinder, it becomes little dry.
Ingredients (1 cup = 250 ml)
Dried coconut (Khopra) Grated 2 cups
Garlic Cloves ½ cups
Red chili Powder 1.5 teaspoon
Jaggery Crushed 1 teaspoon (optional)
Tamarind dry pulp 1 teaspoon or Amchoor (Mango Powder) 1 teaspoon
Salt to taste
Instructions
1. Dry roast the grated dried coconut till it is light brown. Spread it in a plate for it to cool. Upon cooling grind it into a coarse powder.
2. Peel the garlic cloves.
3. Crush Garlic Cloves separately into a smooth paste. I normally use Khal – Batta / Mortar – Pestle / Khandni – Dasto for this as small quantity does not grind properly in Grinder.
4. Add salt, Red Chili Powder, Jaggery and Tamarind into Mortar and pound it further to make a coarse paste.
4. Now mix this garlic mixture with ground coconut; you can either mix it by hand or in grinder.
5. Relish this Chutney with Batata vada, Bhajiya, Roti, Rice or actually with anything. I like it most with Rice and Curd.
6. This chutney lasts for 2 to 3 weeks at room temperature if stored in air-tight container.
Note
1. If you use Kashmiri chili powder – you will get vibrant red colour chutney.
2. We like the taste of Jaggery and Tamarind (Sweet n Sour). If you don’t like this taste; do not add Jaggery.
3. For best texture and taste, pound this Chutney using Mortar – Pestle. Follow the same steps as mentioned above.
==================================================================================
लसणीचं तिखट – लसूण चटणी
लसणीचं तिखट (हा कोकणातला शब्द आहे) हे बहुतेक सर्वांचं आवडतं तोंडीलावणं आहे. काही जण ह्याला लसूण चटणी म्हणतात. बाहेर विकत मिळणाऱ्या तिखटाला तेवढी चव नसते. म्हणून शक्यतो हे घरीच कुटावं. खलबत्त्यात कुटलेल्या तिखटाची चव आणि टेक्सचर अप्रतिम असते. मिक्सरमध्ये वाटलेलं तिखट जरा सुकं होतं. मी ह्यात थोडा गूळ घालते. त्यामुळे लसणीचं तिखट अगदी चविष्ट होतं. तुम्हाला आवडत नसेल तर गूळ घालू नका.
लहानपणी पहिली वाढलेली नावडती भाजी कशीबशी संपवून उरलेली पोळी खूपशा लसणीच्या तिखटासोबत खायला मजा यायची. तेव्हा आमच्या घरी केलेलं लसणीचं तिखट ३–४ दिवसात फस्त व्हायचं.
साहित्य (१ कप = २५० मिली)
सुक्या खोबऱ्याचा कीस २ कप
सोललेली लसूण १/२ कप
लाल तिखट दीड टीस्पून
चिरलेला गूळ १ टीस्पून (ऐच्छिक)
सुकी चिंच १ टीस्पून / आमचूर १ टीस्पून
मीठ चवीनुसार
कृती
१. खोबऱ्याचा कीस सुकाच मंद आचेवर गुलाबी रंगावर भाजून घ्या. एका ताटलीत काढून गार करा. गार झाल्यावर मिक्सरमध्ये जाडसर वाटून घ्या.
२. खलबत्ता वापरून लसूण बारीक कुटून घ्या. मी खोबरं जरी मिक्सरमध्ये वाटलं तरी लसूण खलबत्त्यात कुटते.
३. लसणीत लाल तिखट, चिंच, गूळ, मीठ घालून कुटून घ्या.
४. लसणीचे मिश्रण खोबऱ्याच्या किसात घालून मिश्रण चमच्याने / हाताने एकजीव करा.
५. चविष्ट लसणीचं तिखट तयार आहे. बटाटा वडा, भजी, घावन, धिरडं, पोळी, दही भात कशासोबतही खाऊ शकता.
६. लसणीचं तिखट हवाबंद डब्यात २–३ आठवडे चांगलं राहतं.
टीप
१. काश्मिरी लाल तिखट घातलं तर लसणीच्या तिखटाला छान लाल रंग येतो.
२. आम्हाला चिंच, गुळाची चव आवडते. तुम्हाला आवडत नसेल तर गूळ घालू नका.
३. परफेक्ट टेक्सचर आणि चवीसाठी लसणीचं तिखट खलबत्त्यात कुटायला हवं. वर दिलेली कृतीच वापरा.
Your comments / feedback will help improve the recipes