Tilkut (तिळकूट (कारळे तिळाची चटणी)) – Karale Til / Khurasni Chutney / Niger Seeds Chutney
तिळकूट (कारळे तिळाची चटणी) मराठी
Karale til is not commonly used in many households. It is rich source of Calcium. You can try this tasty chutney made from Karale Til. This goes well with any Chilla, Ghavan and curd rice. Karale Til are called Khurasni in Gujrati, Ramtil in Hindi and Niger seeds in English.
In case Karale Til are not available, you can use black til (Black sesame seeds) for this chutney. The texture will be little different but the taste is very good.
Ingredients (1 cup = 250 ml)
Karale Til or Khurasni (Niger seeds) 1 cup
Dried coconut (Khopra) grated 1.5 cup
Garlic cloves ¾ cup
Red chilly powder 1.5 teaspoon
Jaggary crushed 1 teaspoon (optional)
Tamarind (chinch/Imli) dry pulp 1 teaspoon Or Amchoor (Mango Powder) 1 teaspoon
Salt to taste
Instructions
1. Dry Roast Karale Til / Khurasni / Niger Seeds evenly till they start sputtering.
2. Dry Roast the grated dried coconut till it is light brown.
3. Peel the garlic cloves.
4. Place Karale til in a grinder. Turn the grinder on pulse for three or four seconds. Avoid pulsing it for more than a few seconds, or oil will be released and it will form clump. Attempting to grind too many seeds at once may also result in clumping.
5. On cooling grind the roasted grated coconut in a grinder to get coarse powder.
6. Crush garlic cloves separately into a smooth paste.
7. Add salt, red chili powder, jaggery, tamarind and mix well.
8. Add Karale til powder, coconut powder to garlic mixture, grind to form a uniform mixture.
Note
1. This chutney lasts for 2 to 3 weeks if stored in air-tight container.
2. For best texture, grind this chutney using mortal and pastel.
==================================================================================
तिळकूट (कारळे तिळाची चटणी)
लहानपणी मे महिन्यात गावाला गेल्यावर काकू हमखास काही पदार्थ करायची त्यात हे तिळकूट असायचं. कारळे तीळ आणि खोबरं घातलेली ही सुकी चटणी मागच्या पडवीत जमिनीत पुरलेल्या वायनात कुटून केली जायची. त्याची चव मिक्सरमधल्या चटणी पेक्षा फारच छान असायची. मग गावी असेपर्यंत प्रत्येक जेवणात ही चटणी तोंडीलावणं म्हणून असायचीच.
कारळे तीळ (राम तीळ / खुरासणी / Nigger Seeds) काळे आणि लांबडे असतात. साधे काळे तीळ वापरून सुद्धा ही चटणी बनवू शकता पण कारळे तीळ वापरून चव आणि टेक्सचर छान येतं.
साहित्य (१ कप = २५० मिली )
किसलेलं सुकं खोबरं दीड कप
कारळे तीळ १ कप
लसूण पाऊण कप
लाल तिखट दीड चमचा
चिरलेला गूळ १ चमचा (आवडत असेल तर )
चिंच १ चमचा / आमचूर अर्धा चमचा
मीठ चवीनुसार
कृती
१. तीळ खमंग भाजून घ्या आणि गार करा.
२. सुकं खोबरं खमंग भाजून घ्या आणि गार करा.
३. खोबरं आणि तीळ मिक्सर मध्ये वेगवेगळे वाटून घ्या. तीळ जरा जाडसर ठेवा.
४. लसूण कुटून / मिक्सर मध्ये बारीक करून घ्या. त्यात चिंच / आमचूर, तिखट, मीठ, गूळ घालून मिक्स करा.
५. खोबरं व तिळाची पूड घालून एकत्र करा. मिक्सर मध्ये अर्धा मिनिट पल्स मोड वर फिरवा.
६. खमंग, चविष्ट तिळकूट तयार आहे. कशाही बरोबर ही छान लागते.
टीप
१. चटणीचं टेक्सचर तुम्ही कोणते तीळ घालता त्यानुसार बदलतं.
Your comments / feedback will help improve the recipes