Bhendi Masala Dry Subji (भेंडी मसाला सुकी भाजी ) – Okra Dry Subji
There are different recipes of Bhendi (Okra) Subji. Some with Gravy and some dry ones. This is a dry subji of Bhendi that has Saunf (Fennel Seeds) and Methi (Fenugreek) seeds. It’s little different than the standard recipe but it has nice flavours and is very tasty.
Unlike other Subjis, I don’t add Turmeric Powder to this Subji. Hence the subji has a different colour (Green and Red) also.
Ingredients (Serves 4)
Bhendi (Okra) about 400 gms
Onion 2 medium
Tomatoes 2 medium
Fennel Seeds (Saunf) 1 teaspoon
Fenugreek (Methi) seeds ¼ teaspoon
Ginger Grated 1 teaspoon
Chili Powder ½ teaspoon
Garam Masala ½ teaspoon
Chopped Coriander 1 teaspoon
Oil 1 tablespoon
Cumin Seeds (Jeera) ½ teaspoon
Asafoetida (Hing) a pinch
Sugar ½ teaspoon
Salt to taste
Instructions
1. Wash, Dry and cut Bhendi in about 1.5 cm long pieces.
2. Finely slice Onions.
3. Finely slice tomatoes.
4. Lightly roast and crush Fennel seeds (Saunf) and Fenugreek (Methi) seeds separately.
5. In a pan, heat oil on low flame
6. Add cumin seeds, wait for splutter; add Asafoetida (hing).
7. Add sliced onions, add 1 pinch of salt, saute till light brown.
8. Add Bhendi, saute for 2 minutes; cook covered till Bhendi is half cooked; keep stirring in between to avoid burning of Bhendi.
9. Add sliced Tomatoes; saute.
10. Add grated Ginger, crushed Fennel seeds, crushed Fenugreek seeds, mix well and cook covered till Bhendi is cooked.
11. Add chili Powder, Garam Masala, sugar and salt. Mix.
12. Add chopped coriander and mix.
13. Tasty Bhendi Masala is ready. Serve with Roti / Paratha.
==================================================================================
भेंडी मसाला सुकी भाजी
भेंडीच्या भाजीचे अनेक प्रकार आहेत. काही रसभाजीचे; तर काही सुक्या भाजीचे. ही एक सुक्या भाजीची रेसिपी आहे. ह्यात बडीशेप आणि मेथीचे दाणे जरा भाजून जाडसर कुटून घातले जातात. बाकी नेहमीचंच साहित्य – कांदा, टोमॅटो, आलं आणि गरम मसाला. कांदा आणि टोमॅटो बारीक चिरण्याऐवजी पातळ उभे चिरून घालतात. बडीशेप आणि मेथीमुळे छान वेगळी चव येते.
ह्या भाजीत हळद घालत नाहीत. त्यामुळे भाजीचा रंग हिरवा (भेंडीचा) आणि लाल (टोमॅटोचा) असतो. भाजी दिसायलाही छान दिसते.
साहित्य (४ जणांसाठी)
भेंडी अंदाजे ४०० ग्राम
कांदे २ मध्यम
टोमॅटो २ मध्यम
बडीशेप १ चमचा
मेथी दाणे पाव चमचा
किसलेलं आलं १ चमचा
लाल तिखट अर्धा चमचा
गरम मसाला अर्धा चमचा
चिरलेली कोथिंबीर १ चमचा
तेल १ टेबलस्पून
जिरं अर्धा चमचा
हिंग १ चिमूट
साखर अर्धा चमचा
मीठ चवीनुसार
कृती
१. भेंडी धुवून पुसून घ्या. अंदाजे दीड सेमी लांबीचे तुकडे करा.
२. कांद्याचे पातळ उभे तुकडे करा.
३. टोमॅटोचे पातळ उभे तुकडे करा.
४. बडीशेप आणि मेथीचे दाणे जरा गरम करून वेगवेगळे कुटून घ्या.
५. एका कढईत तेल गरम करून जिरं आणि हिंगाची फोडणी करून घ्या.
६. चिरलेला कांदा आणि चिमूटभर मीठ घालून कांदा मंद आचेवर गुलाबी रंगावर परतून घ्या.
७. आता कढईत भेंडी घाला. २ मिनिटं परतून झाकण ठेवून भेंडी अर्धवट शिजवून घ्या.
८. आता चिरलेले टोमॅटो घाला. २ मिनिटं परतून घ्या.
९. आलं, बडीशेप, मेथी घाला. ढवळून झाकण ठेवून भेंडी शिजवून घ्या.
१०. लाल तिखट, गरम मसाला, मीठ, साखर घालून ढवळून घ्या.
११. चिरलेली कोथिंबीर घालून ढवळून घ्या.
१२. चविष्ट भाजी तयार आहे. गरम गरम भाजी पोळी / भाकरी बरोबर खायला द्या.
Very nice and superbly explained so that anyone can make it easily after reading your recipe. my favourite!
Thank you VHK for your feedback. Appreciate it.