Bhendi Masala Dry Subji (भेंडी मसाला सुकी भाजी ) – Okra Dry Subji

Bhendi Masala Dry Subji (भेंडी मसाला सुकी भाजी )

Bhendi Masala Dry Subji (भेंडी मसाला सुकी भाजी ) – Okra Dry Subji

भेंडी मसाला सुकी भाजी मराठी

There are different recipes of Bhendi (Okra) Subji. Some with Gravy and some dry ones. This is a dry subji of Bhendi that has Saunf (Fennel Seeds) and Methi (Fenugreek) seeds. It’s little different than the standard recipe but it has nice flavours and is very tasty.

Unlike other Subjis, I don’t add Turmeric Powder to this Subji. Hence the subji has a different colour (Green and Red) also.

Ingredients (Serves 4)

Bhendi (Okra) about 400 gms

Onion 2 medium

Tomatoes 2 medium

Fennel Seeds (Saunf) 1 teaspoon

Fenugreek (Methi) seeds ¼ teaspoon

Ginger Grated 1 teaspoon

Chili Powder ½ teaspoon

Garam Masala ½ teaspoon

Chopped Coriander 1 teaspoon

Oil 1 tablespoon

Cumin Seeds (Jeera) ½ teaspoon

Asafoetida (Hing) a pinch

Sugar ½ teaspoon

Salt to taste

Instructions

1. Wash, Dry and cut Bhendi in about 1.5 cm long pieces.

2. Finely slice Onions.

3. Finely slice tomatoes.

4. Lightly roast and crush Fennel seeds (Saunf) and Fenugreek (Methi) seeds separately.

Spices for Bhendi Masala – Crushed Fennel seeds, crushed Fenugreek seeds, grated Ginger and chili powder (बडीशेप पूड, लाल तिखट, मेथी पूड, आणि किसलेलं आलं )

5. In a pan, heat oil on low flame

6. Add cumin seeds, wait for splutter; add Asafoetida (hing).

7. Add sliced onions, add 1 pinch of salt, saute till light brown.

 

Add thin slices on onion to heated oil (कांद्याचे पातळ उभे काप)
Saute onions till light brown (कांदा गुलाबी रंगावर परतून घ्या)

8. Add Bhendi, saute for 2 minutes; cook covered till Bhendi is half cooked; keep stirring in between to avoid burning of Bhendi.

9. Add sliced Tomatoes; saute.

Add chopped tomatoes (चिरलेले टोमॅटो घाला)

10. Add grated Ginger, crushed Fennel seeds, crushed Fenugreek seeds, mix well and cook covered till Bhendi is cooked.

11. Add chili Powder, Garam Masala, sugar and salt. Mix.

12. Add chopped coriander and mix.

13. Tasty Bhendi Masala is ready. Serve with Roti / Paratha.

 

Bhendi Masala Dry Subji (भेंडी मसाला सुकी भाजी )
Bhendi Masala Dry Subji (भेंडी मसाला सुकी भाजी )
      ==================================================================================

भेंडी मसाला सुकी भाजी

भेंडीच्या भाजीचे अनेक प्रकार आहेत. काही रसभाजीचे; तर काही सुक्या भाजीचे. ही एक सुक्या भाजीची रेसिपी आहे. ह्यात बडीशेप आणि मेथीचे दाणे जरा भाजून जाडसर कुटून घातले जातात. बाकी नेहमीचंच साहित्य कांदा, टोमॅटो, आलं  आणि गरम मसाला. कांदा आणि टोमॅटो बारीक चिरण्याऐवजी पातळ उभे चिरून घालतात. बडीशेप आणि मेथीमुळे छान वेगळी चव येते.

ह्या भाजीत हळद घालत नाहीत. त्यामुळे भाजीचा रंग हिरवा (भेंडीचा) आणि लाल (टोमॅटोचा) असतो. भाजी दिसायलाही छान दिसते.

साहित्य (४ जणांसाठी)

भेंडी अंदाजे ४०० ग्राम

कांदे २ मध्यम

टोमॅटो २ मध्यम

बडीशेप १ चमचा

मेथी दाणे पाव चमचा

किसलेलं आलं १ चमचा

लाल तिखट अर्धा चमचा

गरम मसाला अर्धा चमचा

चिरलेली कोथिंबीर १ चमचा

तेल १ टेबलस्पून

जिरं अर्धा चमचा

हिंग १ चिमूट

साखर अर्धा चमचा

मीठ चवीनुसार

कृती

. भेंडी धुवून पुसून घ्या. अंदाजे दीड सेमी लांबीचे तुकडे करा.

. कांद्याचे पातळ उभे तुकडे करा.

. टोमॅटोचे पातळ उभे तुकडे करा.

. बडीशेप आणि मेथीचे दाणे जरा गरम करून वेगवेगळे कुटून घ्या.

Spices for Bhendi Masala – Crushed Fennel seeds, crushed Fenugreek seeds, grated Ginger and chili powder (बडीशेप पूड, लाल तिखट, मेथी पूड, आणि किसलेलं आलं )

. एका कढईत तेल गरम करून जिरं आणि हिंगाची फोडणी करून घ्या.

. चिरलेला कांदा आणि चिमूटभर मीठ घालून कांदा मंद आचेवर गुलाबी रंगावर परतून घ्या.

Add thin slices on onion to heated oil (कांद्याचे पातळ उभे काप)
Saute onions till light brown (कांदा गुलाबी रंगावर परतून घ्या)

. आता कढईत भेंडी घाला. २ मिनिटं परतून झाकण ठेवून भेंडी अर्धवट शिजवून घ्या.

. आता चिरलेले टोमॅटो घाला. २ मिनिटं परतून घ्या.

Add chopped tomatoes (चिरलेले टोमॅटो घाला)

. आलं, बडीशेप, मेथी घाला. ढवळून झाकण ठेवून भेंडी शिजवून घ्या.

१०. लाल तिखट, गरम मसाला, मीठ, साखर घालून ढवळून घ्या.

११. चिरलेली कोथिंबीर घालून ढवळून घ्या.

१२. चविष्ट भाजी तयार आहे. गरम गरम भाजी पोळी / भाकरी बरोबर खायला द्या.   

Bhendi Masala Dry Subji (भेंडी मसाला सुकी भाजी )
Bhendi Masala Dry Subji (भेंडी मसाला सुकी भाजी )

2 Comments

Your comments / feedback will help improve the recipes