Mugachi Usal (मुगाची उसळ जिरं खोबरं घालून) – Green Gram Subji
मुगाची उसळ जिरं खोबरं घालून मराठी
Usal is a subji with gravy made from pulses. In Maharashtra, we make different types of Usal. Pulses being excellent source of proteins, these Usals are very healthy. They are very tasty as well. This recipe of Moong Usal does not use onion, garlic.
Ingredients (serves 4-5) (1 cup = 250 ml)
Green Moong / Whole Green Gram 1 cup
Dried Coconut Grated ¼ cup
Cumin Powder 1 teaspoon
Mango Powder ½ teaspoon
Green Chili Paste ½ teaspoon
Fresh Scraped Coconut 1 tablespoon
Chopped Coriander Leaves 1 tablespoon
Sugar 1 teaspoon (Adjust as per taste)
Oil 1 teaspoon
Mustard Seeds ¼ teaspoon
Cumin Seeds ¼ teaspoon
Turmeric Powder ½ teaspoon
Asafoetida a pinch
Salt to taste
Instructions
1. Soak Green Gram in water for 6-8 hours
2. Drain them and wrap in thin napkin, tie tightly and keep it in covered pan for 8 hours.
3. Green Gram will be sprouted. Wash Green Gram with water.
4. Roast the grated dried coconut (khobra) till light brown. Allow it to cool.
5. Crush roasted dried coconut by hand to get a coarse powder.
6. Heat oil in a pan. Add mustard seeds, wait till splutter; add cumin seeds, wait till splutter.
7. Add turmeric powder and Asafoetida (hing). Add chili paste.
8. Add sprouted Green Gram, Saute and cook covered for 2 minutes. Remove the lid, saute and cook covered for 2 minutes.
9. Add hot water to cover half the grains; cook covered till grains are soft.
10. Add crushed dried coconut, fresh grated coconut, cumin powder, mango powder, salt, sugar and mix. Bring the mixture to boil. Add water if required.
11. Add chopped coriander and serve hot with Roti (Indian Bread), Rice.
Note
1. If you want, you can add onions to this Usal. It tastes nice. For this, finely chop 1 medium onion and add it to tempering/ tadka. Saute for 2-3 minutes and then add grains to it.
==================================================================================
मुगाची उसळ जिरं खोबरं घालून – पौष्टिक आणि चवदार
कडधान्यांमध्ये हिरवे मूग अतिशय पौष्टिक असतात. मोड काढलेली कडधान्य पचायला पण हलकी असतात. मुगाची उसळ तुम्ही करतच असाल. पण ही थोडी वेगळ्या प्रकारची उसळ आहे – जिरं खोबरं घालून केलेली. माझी आई नेहमी करायची. आणि आम्हाला अशाच प्रकारे केलेली उसळ आवडायची. खूप चवदार लागते. साहित्यही नेहमीचंच आणि कृती सोपी. ह्यात मी सहसा कांदा घालत नाही. पण कांदा घालूनही छान चव येते.
साहित्य (४–५ जणांसाठी) (१ कप = २५० मिली)
हिरवे मूग १ कप
सुकं खोबरं पाव कप
भाजलेल्या जिऱ्याची पूड १ टीस्पून
आमचूर अर्धा टीस्पून
ठेचलेली हिरवी मिरची अर्धा टीस्पून
ताजा खवलेला नारळ १ टेबलस्पून
चिरलेली कोथिंबीर १ टेबलस्पून
साखर १ टीस्पून (चवीनुसार कमी / जास्त करा)
तेल १ टीस्पून
मोहरी पाव टीस्पून
जिरं पाव टीस्पून
हळद अर्धा टीस्पून
हिंग १ चिमूट
मीठ चवीनुसार
कृती
१. हिरवे मूग ६–८ तास पाण्यात भिजवून ठेवा. नंतर पाणी निथळून पातळ कापडात ८ तास बांधून मोड काढा.
२. मोड आलेले मूग निवडून घ्या आणि पाण्याने धुवा.
३. एका कढईत सुकं खोबरं गुलाबी रंगावर भाजून घ्या. गार झाल्यावर हाताने चुरून घ्या.
४. कढईत तेल घालून मोहरी, जिरं, हळद आणि हिंगाची खमंग फोडणी करा. त्यात ठेचलेली हिरवी मिरची घाला.
५. मूग घालून परतून घ्या आणि पाणी न घालता झाकण ठेवून २ मिनिटं शिजवा. झाकण काढून ढवळून घ्या आणि पुन्हा पाणी न घालता झाकण ठेवून २ मिनिटं शिजवा.
६. मूग अर्धे बुडेपर्यंत आधण पाणी घाला. झाकण ठेवून मूग शिजवून घ्या.
७. भाजलेलं खोबरं, नारळ, जिरेपूड,आमचूर,मीठ आणि साखर घालून ढवळून घ्या. जरूर असल्यास थोडं पाणी घाला आणि मिश्रणाला एक उकळी काढा.
८. चिरलेली कोथिंबीर घालून गॅस बंद करा. मुगाची गरम गरम उसळ पोळी, भातासोबत खायला द्या.
टीप
१. ह्या उसळीत तुम्ही कांदा घालू शकता. बारीक चिरलेला कांदा फोडणीत घालून २–३ मिनिटं परतून घ्या आणि नंतर त्यात मूग घाला.
Your comments / feedback will help improve the recipes