Patole (पातोळे) – Rice Dumplings Steamed in Turmeric leaves
This is a Maharashtrian and Goan specialty – rice dumplings steamed in Turmeric leaves. This is generally made as Prasad for Ganapati and Nagpanchami as Turmeric leaves are available in this season. This is a very easy recipe. Patole tastes delicious and aroma of turmeric leaves is awesome. There are 3 methods to make the cover for Patole.
1. By making a thick paste of Rice flour and spreading it on Turmeric Leaves and
2. By making a dough of Rice flour and gently patting it on Turmeric Leaves
3. Adding Rice flour to boiling water, knead it (Like Modak cover) and and gently patting it on Turmeric Leaves
Patole made using any method taste good. But I find the second method more easy and manageable. You can choose any as per your convenience.
Ingredients (for about 20 Patole) (1 cup = 200ml)
Fresh scraped coconut 2.5 cups
Crushed Jaggery 1.5 to 2 cups (as per desired sweetness)
Home made butter / ghee 1 teaspoon
Salt 2 pinch
Cardamom (Eliachy) powder ¼ teaspoon
Rice flour 1.5 cups
Turmeric leaves 10 if bigger leaves (you can cut each leaf and use for 2 Patole); 20 if small
Instructions
For Filling
1. Mix scraped coconut and jaggery in a thick bottom pan. Cook on low flame stirring all the time till jaggery is dissolved and mixture starts getting thick
2. Add a pinch of salt and Cardamom powder. Mix. Switch off the gas and let the filling cool.
For Cover
Method 1:
1. Add a pinch of salt to Rice Flour. Add water and mix well to form a thick paste. We have to spread this paste on turmeric leaves; so it should not be too thick ; not too thin also.
Method 2:
1. Add a pinch of salt to Rice Flour. Using hot water, bind a medium consistency dough.
Method 3:
1. Boil 1+1/4 cup of water. Add half teaspoon ghee and pinch of salt. Add Rice flour, mix and switch off the gas. Quickly cover the pan. After 10 minutes knead the dough. Use water if required and knead a medium consistency dough.
To make Patole
1. Wash and Dry turmeric leaves. Remove stem if any.
2. If you have longer/bigger leaves then cut them in the centre (centre of the length) to make 2 halves. If you like, Apply some ghee on each leaf; this will give nice aroma to Patole.
Method 1:
4. Spread rice flour paste on each leaf evenly and as thin as possible
Method 2 & 3:
4. Take a small lemon size Rice Flour dough and pat it on Turmeric Leaf to form a thin uniform layer.
5. Place a thin layer of filling on half of the leaf and fold the leaf so that filling is covered by rice paste/dough on both sides. If the leaves are wide, then fold it on the stem. If the leaves are long fold it on the centre of the length.
6. Prepare all Patole as mentioned above.
7. Steam them in a steamer for about 15 minutes.
8. When cooked, Patole will not stick to the leaf.
9. You can either serve them along with leaves or separate leaves from Patole before serving. Serve with pure ghee.
10. Patole is a mild sweet dish that is extremely delicious.
Note: In case turmeric leaves are not available, you can use banana leaves. But turmeric leaves aroma is awesome.
==================================================================================
पातोळे – हळदीच्या पानात केलं जाणारं पारंपरिक पक्वान्न
पातोळे हा महाराष्ट्र, गोव्यात बनवला जाणारा पारंपारिक गोड पदार्थ आहे. नागपंचमीला आणि गौरी, गणपतीला नैवेद्य म्हणून पातोळे बनवतात. पातोळे म्हणजे वेगळ्या आकाराचे उकडीचे मोदक पण हळदीच्या पानात वाफवलेले. हळदीच्या पानांचा फार छान स्वाद येतो पातोळ्याला. हळदीची पानं नसतील तर केळीची पानं वापरू शकता.
पातोळ्याचं सारण नारळ आणि गुळाचं असतं – अगदी मोदकाच्या सारणाप्रमाणे. पातोळ्याचं आवरण ३ प्रकाराने बनवतात.
पातोळे कसे ही केले तरी छान लागतात.
साहित्य (२० पातोळे बनवण्यासाठी) (१ कप = २५० मिली )
सारणासाठी
ताजा खवलेला नारळ अडीच कप
चिरलेला गूळ दीड ते दोन कप (जसं गोड हवं असेल तसं )
वेलची पूड पाव चमचा
मीठ चिमूटभर (ऐच्छिक)
आवरणासाठी
तांदुळाचे पीठ दीड कप (सुगंधी तांदुळाचं / मोदकाचं पीठ असेल तर उत्तम)
मीठ चिमूटभर
साजूक तूप १ चमचा
हळदीची पानं १० मोठी / २० छोटी
कृती
१. सारणासाठी खवलेला नारळ आणि गूळ मंद आचेवर शिजवून घ्या. मिश्रण घट्ट होत आलं की मीठ आणि वेलची पूड घालून मिक्स करा आणि ताटलीत काढून मिश्रण गार करा.
२. आवरणासाठी
पद्धत १. तांदुळाच्या पिठात चिमूटभर मीठ घाला. पाणी घालून सरसरीत पेस्ट बनवा. फार पातळ नको आणि फार घट्ट ही नको. पानावर व्यवस्थित पणे सारवता आली पाहिजे.
पद्धत २. तांदुळाच्या पिठात चिमूटभर मीठ घाला. गरम पाणी घालून पीठ भिजवा. पोळ्यांच्या कणकेसारखा गोळा झाला पाहिजे. फार घट्ट नको आणि फार सैल नको. पीठ छान मळून घ्या.
पद्धत ३. सव्वा कप पाणी उकळा. त्यात अर्धा चमचा तूप आणि मीठ घाला. पाणी उकळल्यावर तांदुळाचं पीठ घालून ढवळा आणि गॅस बंद करून झाकून ठेवा. १० मिनिटांनी पीठ छान मळून घ्या. हवं असल्यास थोडे पाणी लावा आणि भाकरीच्या पिठासारखा गोळा बनवा. .
३. पातोळे करण्यासाठी
१. हळदीची पानं धुवून पुसून घ्या. मोठी पानं असतील तर एका पानाचे दोन तुकडे करा (लांब बाजू कापा). हवं असेल तर प्रत्येक पानाला थोडं तूप लावून घ्या. त्याने पातोळ्यांना साजूक तुपाचा सुगंध येतो.
२.
पद्धत १. थोडी तांदुळाची पेस्ट हळदीच्या पानावर एकसारखी पसरा. पानाची शीर मधे आली पाहिजे. दोन्ही बाजूला एक सारखं पीठ लागलं पाहिजे.
पद्धत २ आणि ३. पिठाची छोटी गोळी घेऊन हळदीच्या पानावर पातळ थापा. पानाची शीर मधे आली पाहिजे. दोन्ही बाजूला एक सारखं पीठ लागलं पाहिजे.
३. आता थापलेल्या / सारवलेल्या पिठावर शीरेच्या एका बाजूला सारण पसरवा. अगदी कडेपर्यंत पसरू नका.
४. पानाच्या शीरेवर पानाची घडी घाला म्हणजे सारणाच्या दोन्ही बाजूला पिठाचं आवरण येईल . कडा हलक्या हातानं दाबून बंद करा.
५. सगळी पाने अशी तयार करून घ्या.
६. इडली / मोदक पात्रात पाणी गरम करून त्यातल्या जाळीवर ही पाने लावा. झाकण बंद करून १५ मिनिटं वाफवून घ्या. शिजलेले पातोळे पानाला चिकटत नाहीत.
७. गरमागरम पातोळे साजूक तुपाबरोबर खायला द्या.
टीप
हळदीची पानं अरुंद असतील तर लांब बाजूची घडी घाला नाहीतर पातोळे फार छोटे होतील.
Mam I tried receipe but the jaggery and coconut mixture was melting even after it was cooled ..was this because of quality of jaggery
Maybe the filling was undercooked.Did you cook the filling till it starts getting dry? If yes, then the filling will not melt further. Filling consistency should be similar to Modak filling.