Roasted Sweet Corn Tomato Soup (रोस्टेड स्वीट कॉर्न आणि टोमॅटो सूप)
रोस्टेड स्वीट कॉर्न आणि टोमॅटो सूप मराठी
Roasted Tomato soup and Sweet Corn Soup are very common. This is a combination of both. Roasted sweet corn and Roasted Tomatoes gives an awesome taste and texture to this soup. It it creamy without using any cream or corn flour. It uses ingredients that are generally available in kitchen. Try this out. I’m sure you will love it.
Ingredients (for 6 people) (1 cup = 250 ml)
Sweet Corn Kernels 2 cups
Medium size Tomatoes 3
Garlic Cloves 3-4
Medium size Onion 1
Oil/ghee/ Clarified Butter 1 teaspoon
Black salt / normal salt to taste
Black Pepper 10-12
Sugar if required
Instructions
1. Wash sweet corn and tomatoes and spread on an aluminum foil in a baking tray. Sprinkle some black salt / normal salt, crushed black pepper and ½ teaspoon of oil/ghee. Bake it for 20-25 minutes on 200 degrees Celsius. Stop baking when skin of tomatoes starts breaking. Leave the mixture to come to room temperature.
2. Peel tomatoes and make big pieces.
3. Peel and Chop onion. Peel garlic and chop in medium size pieces.
4. In a pan, heat ½ teaspoon of oil/ghee. Add garlic pieces. When Garlic turns light brown, add chopped onion. Sauté till onion is soft.
5. Keep ½ cup roasted corn aside for garnishing. Add remaining roasted sweet corn and tomatoes. Add the juice from baking tray as well.
6. Add Black salt/ normal salt, black pepper as per your taste. If tomatoes are sour, you may need to add some sugar.
7. Add 2 cups of water and boil the mixture on medium heat for 10 minutes.
8. Let the mixture cool.
9. Blend the mixture into thick puree. Transfer it back to the pan and add water to adjust consistency. This is a thick soup. Bring it to boil and soup is ready.
10. Garnish with roasted sweet corn that you have kept aside and serve the soup hot.
11. Sweet corn gives a creamy taste to this soup. Enjoy this creamy, healthy and delicious soup.
Note
1. If you are using big tomatoes, then cut them into 4 / 6 pieces before roasting.
2. If you like, you can add 1 Bay leaf while baking tomatoes and sweet corn. Throw it away when you blend the mixture together.
==================================================================================
रोस्टेड स्वीट कॉर्न आणि टोमॅटो सूप
सूप करताना भाज्या भाजून घेतल्या तर फारच छान चव येते. ह्या सूपमध्ये मी टोमॅटो आणि मक्याचे दाणे ओव्हन मध्ये भाजून घेते. तुमच्याकडे ओव्हन नसेल तर कढईत थोड्या तेलावर भाजू शकता. अगदी सोपी रेसिपी आहे चविष्ट आणि पोटभरीचं सूप करण्याची.
कॉर्न फ्लोअर न घालता छान दाट सूप बनतं.
साहित्य (५ जणांसाठी) (१ कप = २५० मिली )
स्वीट कॉर्न २ कप
टोमॅटो मध्यम ३
लसूण ३–४ पाकळ्या
कांदा १ मध्यम
तूप / बटर १ टीस्पून
काळे मीठ चवीनुसार
काळी मिरी १०–१२
साखर चवीनुसार
कृती
१. बेकिंग ट्रे मध्ये अल्युमिनम फॉईल पसरा. त्यावर स्वीट कॉर्न, टोमॅटो , काळे मीठ, काळी मिरी कुटून घाला. अर्धा चमचा तूप घाला. ओव्हन २०० डिग्री वर चालू करून २०–२५ मिनिटे भाजून घ्या. टोमॅटो ची साल सुटायला लागेल.
२. थंड झाल्यावर टोमॅटो सोलून मोठे तुकडे करा.
३. एका पातेल्यात अर्धा चमचा तूप गरम करून त्यात लसणीचे तुकडे घालून लालसर रंगावर परत. त्यात चिरलेला कांदा घालून कांदा नरम होईपर्यंत परतून घ्या.
४. अर्धा कप स्वीट कॉर्न सर्व्हिन्ग साठी बाजूला काढून उरलेले कॉर्न, टोमॅटोचे तुकडे पातेल्यात घाला. काळे मीठ, काळी मिरी कुटून घाला. टोमॅटो आंबट असतील तर थोडी साखर घाला.
५. २ कप पाणी घालून मिश्रण १० मिनिटे उकळवा .
६. मिश्रण थंड झाल्यावर मिक्सर मध्ये बारीक करून घ्या.
७. परत पातेल्यात घालून जरुरीप्रमाणे पाणी घालून एक उकळी काढा. हे सूप दाट असतं .
८. सर्व्ह करताना थोडे स्वीट कॉर्न आणि मिरी पावडर सूपात घालून गरम सूप सर्व्ह करा.
टीप
१. तुमच्याकडे ओव्हन नसेल तर एका कढईत थोडे तेल घालून टोमॅटो आणि स्वीट कॉर्न भाजून घेऊ शकता.
२. तुम्हाला आवडत असेल तर भाज्या भाजताना १ तमालपत्र घाला आणि मिश्रण मिक्सरमध्ये वाटण्याआधी ते काढून टाका.
Your comments / feedback will help improve the recipes