Roasted Veggies Salad (भाजलेल्या भाज्यांचं सॅलड)
भाजलेल्या भाज्यांचं सॅलड मराठी
When you are bored of eating same old spicy food and want something different and healthy, try these Roasted Veggies. It’s one pot meal; mostly you won’t need anything else with it. But if you like, have some soup with it. It will be a perfect healthy meal.
I use veggies that my family likes. You can add/delete veggies as per your choice. I roast veggies in Oven. But if you don’t have Oven, use a Pan for roasting Veggies.
Ingredients (serves 4 – we ate only this; no soup / bread with it; it was sufficient)
Red Pumpkin/ Kadu about 150 gms
Zucchini 1 medium size
Red capsicum 1
Yellow capsicum 1
Mushrooms 10-12
Sweet Potatoes 3 medium size
Potatoes 4 medium size Or Baby Potatoes 10-12
Carrots 3 medium size
Small onions 8 (I used white onions)
French Beans about 100 gms
Garlic 5-6 medium size cloves
Oregano 1.5 teaspoon
Black salt to taste
Salt to taste
Butter 2 tablespoon
Black pepper to taste
Mango Powder/Amchoor 1 teaspoon
Lemon 1 medium size
Instructions
1. Wash all veggies.
2. Peel and dice Carrots and Red pumpkin.
3. Dice and Half cook Potatoes and Sweet Potatoes. If you use Baby Potatoes you need not dice. Chop French Beans into 3 inch pieces and boil them it water till little soft.
4. Dice both capsicums, Zucchini, Mushrooms.
5. Peel and cut onions into halves or you can just give 2 perpendicular slits to onions.
6. Grease baking tray with oil / ghee. Evenly Spread all cut veggies in the baking tray. Sprinkle black salt, white salt, crushed garlic, oregano, Mango Powder, lemon juice and crushed black pepper and mix it gently with a spatula and leave it for 15-20 minutes.
7. Put small cubes / pieces of butter on the veggies.
8. Preheat oven on 230 degrees Celsius and bake these veggies for 15 minutes.
9. Check the Veggies and then the timer accordingly. It takes 30-40 minutes to cook the veggies. Veggies should not be over cooked. Baking time depends on the tenderness and the size of veggie pieces.
10. When veggies are cooked, preparation is ready to serve. Veggies are soft and juicy.
11. If you want, you can add some butter and lemon juice while serving.
12. Enjoy these delicious and healthy roasted veggies.
Note
1. You can also add 2 tablespoons of honey or Molasses while baking the veggies. That gives a nice taste to the veggies.
==================================================================================
भाजलेल्या भाज्यांचं सॅलड
नेहमीचं जेवण जेऊन कंटाळा आला असेल आणि काहीतरी वेगळं पौष्टिक खायचं असेल तर हे भाजलेल्या भाज्यांचं सॅलड नक्की करून बघा. हे one dish meal आहे. ह्यांच्यासोबत सूप केलंत तर अगदी पोटभरीचं जेवण होईल. आम्ही कधी कधी जेवणात फक्त हे सॅलड खातो.
ह्यात तुम्ही तुमच्या आवडीच्या भाज्या घालू शकता. आता हिवाळ्यात झुकिनी, ब्रोकोली ह्या भाज्या छान मिळतात. त्या घालू शकता किंवा आपल्या नेहमीच्या भाज्या घालू शकता. ह्या सॅलड मध्ये फार मसाले घालत नाहीत.
हे सॅलड मी ओव्हनमध्ये भाजते. ओव्हन नसेल तर तुम्ही कढईत थोडं तूप / बटर घालून सॅलड भाजू शकता.
साहित्य (४ जणांसाठी जेवण म्हणून)
लाल भोपळा १५० ग्रॅम्स
झुकिनी १ मध्यम
लाल ढोबळी मिरची १
पिवळी ढोबळी मिरची १
मश्रुम १०–१२
रताळी ३ मध्यम आकाराची
बटाटे ४ मध्यम आकाराचे किंवा छोटे बटाटे १०–१२
गाजर ३ मध्यम आकाराची
छोटे कांदे ८
फरसबी १०० ग्रॅम्स
लसूण ५–६ पाकळ्या
ओरिगानो दीड टीस्पून
काळं मीठ + मीठ चवीनुसार
बटर / साजूक तूप २ टेबलस्पून
काळी मिरी चवीनुसार
आमचूर १ टीस्पून
लिंबू १ मध्यम आकाराचे
कृती
१. भाज्या धुवून घ्या.
२. गाजर आणि लाल भोपळा सोलून त्यांचे तुकडे करा.
३. बटाटे आणि रताळी अर्धवट शिजवून घ्या आणि तुकडे करा. छोटे बटाटे असतील तर तुकडे केले नाहीत तरी चालेल. फरसबीचे ३ इंच लांबीचे तुकडे करा आणि पाण्यात घालून अर्धवट शिजवून घ्या.
४. दोन्ही ढोबळी मिरची आणि झुकिनी चे तुकडे करा.
५. कांद्याची सालं काढून दोन तुकडे करा किंवा दोन चिरा द्या.
६. बेकिंग ट्रे ला तेल / तूप लावून घ्या. सगळ्या भाज्या ट्रे मध्ये नीट पसरून घ्या. वरून काळं मीठ, मीठ, ठेचलेली लसूण, ओरिगानो, आमचूर, लिंबाचा रस आणि काळी मिरी पूड घाला आणि हलकेच ढवळून १५–२० झाकून ठेवा.
७. भाज्यांवर बटरचे छोटे तुकडे घाला.
८. ओव्हन २३० डिग्री सेल्सिअस वर प्री–हिट करून ट्रे ओव्हनमध्ये ठेवून १५ मिनिटं भाजा.
९. भाज्या किती शिजल्यात ते बघा आणि त्यानुसार आणखी टायमर लावा. भाज्या भाजायला ३०-४० मिनिटं लागतात. भाज्या शिजून नरम व्हाव्यात पण अति शिजू नयेत. भाज्या शिजल्या की छान ज्युसी होतात. भाज्या किती कोवळ्या आहेत आणि किती मोठे तुकडे केलेत ह्यावर शिजण्याचा वेळ अवलंबून आहे.
१०. सर्व भाज्या शिजल्या की सॅलड खायला तयार आहे. हवं असल्यास खाताना थोडं बटर आणि लिंबाचा रस घाला.
टीप
१. सॅलड भाजताना तुम्ही २ टेबलस्पून काकवी किंवा मध घालू शकता. ती चवही छान लागते.
मॅडम, ही रेसिपी without ओव्हन करायची असेल तर काय करायचं?
फ्लॅट फ्राईंग पॅन किंवा तव्यावर करू शकता. अगदी मंद आचेवर झाकण ठेवून भाजू शकता. \nSudha