Besan Laadoo (बेसन लाडू ) – Besan Laddu – Gram Flour Sweet Balls
Besan laadoo is an all time favorite sweet dish. There are different ways to make Laadoos. Typical Maharashtrian way is to make them with little milk. I always follow this recipe. It’s fairly easy but time consuming. But the end product is awesome. Worth all the time you spent in roasting Besan.
If you have Microwave Oven, you can roast Besan in Microwave. It is much easier process without compromising the taste.
Although it’s an easy recipe that does not require sugar syrup, there are a few things you must take care of.
1. Texture of Besan (Gram Flour) – Coarse gram flour makes delicious Besan Laddus. But if you use fine Gram flour, you need to reduce the quantity of Ghee (clarified butter).
2. Proportion of Ghee is most important for Besan Laddus. If you use too much Ghee, Laddus will lose the shape. At the same time, Ghee should not be too less to make Laddus dry. New home cooks should first try with a smaller quantity so that they can understand Ghee proportion. You can add more Ghee if you like.
3. Do not use whole stock of Gram Flour and Ghee when you make Besan Laddus. So that you don’t need to run to the shop in can you need to Repair the laddus.
4. It is best to use home made Ghee for these laddus. But in case you want to use Vanaspati Ghee (Thick vegetable oil), then check it before use. If it has little foul smell, do not use that pack. Buy a fresh pack and use it.
5. Use freshly ground sugar for Laddus. If you already have a stock of Ground sugar, grind it again in the grinder to break any lumps. Or if possible, use Bura sugar that is available in India. This is made by dehydrating sugar syrup. There are no lumps in Bura sugar.
Ingredients (Makes 30-35 Laddus) (1 cup = 250 ml)
Besan Kurkura / Jada (Coarse Bengal Gram Flour) 4 cups
Desi Ghee (Clarified Butter) 1.25 cups (at room temperature)
Powdered Sugar 2.5 to 3 cups (as per the sweetness required)
Cardamom Powder ½ teaspoon
Raisins (Khismish) 25-30 / Cashew 20-25 cut into pieces
Milk 2 tablespoon
Instructions
1. In a thick bottom pan, add Ghee and Besan. Roast it on low flame till besan turns brown and you get nice aroma of besan. Keep stirring all the time; else it will burn. Initially Besan will be thick and difficult to roast; after about 10 minutes it will be soft and will become easy to roast. It takes 35-40 minutes to roast.
2. Now remove the pan from gas. Immediately add 2 tablespoon of milk. You will see lot of bubbles. Keep stirring. Now the mixture will be thick.
3. Leave it to cool.
4. When mixture is lukewarm, add sugar and mix well. Add Cardamom powder, Raisins / Cashew and any other dry fruits of your choice.
5. Leave the mixture to cool. When completely cold, roll Laadoos.
Enjoy delicious Besan laadoos. These laadoos last for 2 weeks without refrigeration.
Note:
1. If you use fine Gram Flour for making these laddus, reduce the Ghee.
2. In spite of taking all precautions, you land up adding more ghee in the mixture and you are not able to roll laddus, then dry roast some gram flour till it’s light brown, mix it in the mixture and then roll laddus.
3. If mixture is dry and you are not able to roll laddus, heat some ghee and add to the mixture.
================================================================================
बेसन लाडू
सगळ्यांचे आवडते बेसन लाडू बनवायला तसे सोपे असतात. मुख्य म्हणजे पाक करायला लागत नाही. पण जरा वेळखाऊ पदार्थ आहे; बेसन भाजायला बराच वेळ लागतो.
लाडवांसाठी बेसन भाजणे हे एक कंटाळवाणं काम असतं. आणि ते करताना दुसरं काही करता येत नाही. यासाठी मायक्रोवेव्ह मध्ये बेसन भाजणे हा एक चांगला पर्याय आहे. मायक्रोवेव्हच्या काचेच्या भांड्यात बेसन घाला. तूप घाला. एकदा ढवळून मायक्रोवेव्ह हाय पॉवर वर ३ मिनिटं चालू करा. नंतर बेसन बाहेर काढून ढवळून परत ३ मिनिटं भाजा. पाव किलो बेसन भाजायला ७–८ मिनिटं लागतात. तुम्हाला जेवढं खमंग भाजायचं असेल तेवढं भाजून भांडं बाहेर काढून दुधाचा हबका मारून चांगलं ढवळून घ्या. आणि गार झाल्यावर पिठीसाखर मिसळून लाडू वळा. गॅसवर भाजलेल्या आणि मायक्रोवेव्ह मध्ये भाजलेल्या बेसनाच्या लाडवांच्या चवीत काही फरक नसतो. मी पहिल्यांदा मायक्रोवेव्ह मध्ये बेसन भाजून लाडू केले तेव्हा घरी सांगावं लागलं की आज वेगळ्या पद्धतीनं लाडू केलेत; तोपर्यंत कोणाला काही वेगळं जाणवलं नव्हतं.
परफेक्ट बेसन लाडू बनवण्यासाठी काही अवधानं पाळावी लागतात.
१. बेसन किती बारीक आहे ? थोड्या जाडसर बेसनाचे लाडू खूप छान होतात. पण हल्ली बाजारात बेसन मिळतं ते अगदी बारीक असतं. ते लाडवांसाठी वापरलं तर तूप जाडसर बेसनापेक्षा जरा कमी घालावं लागते. बेसन बारीक असेल तर काही जणी थोडा रवा घालतात. पण त्याने लाडवांची चव बदलते असं मला वाटतं. म्हणून मी घालत नाही.
२. तुपाचं प्रमाण बेसनाच्या लाडवांसाठी अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे. बेसन लाडू फार तुपकट नसावा म्हणजे डब्यात ठेवला तर तो गोलच रहावा ; बसू नये. पण त्याचबरोबर लाडू सुकाही नसावा. म्हणून पहिल्यांदाच लाडू करून बघणाऱ्या मित्र / मैत्रिणींनी एक वाटी मापाचे लाडू बनवून बघावे म्हणजे तुपाच्या प्रमाणाचा अंदाज येईल. तुम्हाला तुपाने थबथबलेले लाडू आवडत असतील तर तूप दिलेल्या मापापेक्षा जास्त घाला.
३. नेहमी लाडू करताना घरातलं सगळं बेसन / सगळं तूप संपवू नये. म्हणजे जर लाडू दुरुस्त करायची वेळ आली तर दुकानात धावावं लागणार नाही.
४. तूप – साजूक तुपातले बेसन लाडू अप्रतिम लागतात. ते शक्य नसेल तर वनस्पती तूप वापरू शकता. पण वनस्पती तूप वापरण्याआधी त्याचा वास घेऊन बघा. कधी कधी जरा विचित्र खवट असा वास येतो. तसा आला तर ते तूप वापरू नका. वापरलं तर लाडवांना पण वास येतो. नवीन वनस्पती आणून वापरा.
५. पिठी साखर ताजी मिक्सर मध्ये दळून घ्या. किंवा आधी आणलेली / केलेली पिठीसाखर परत एकदा मिक्सर मध्ये फिरवून घ्या / किंवा चाळून घ्या. नाहीतर पिठीसाखरेच्या गुठळ्या मोडता मोडता हात दुखून येतात. ‘बुरा साखर‘ मिळत असेल तर ती वापरा ; त्याच्या गुठळ्या होत नाहीत. ‘बुरा साखऱ‘ म्हणजे साखर पाण्यातवितळवून परत त्याचे क्रिस्टल होईपर्यंत उकळवतात. हे क्रिस्टल्स म्हणजे ‘बुरा साखऱ‘. दुकानात मिळते.
साहित्य (३०–३५ लाडू होतात) (१ कप = २५० मिली )
जाडसर बेसन ४ कप
साजूक तूप सव्वा कप / नसेल तर वनस्पती तूप वापरू शकता (room temperature चं)
दळलेली / पिठी साखर अडीच ते ३ कप
वेलची पूड अर्धा टीस्पून
काजू / बेदाणे (किसमिस) आवडीनुसार
दूध २ टेबलस्पून
कृती
१. एका जाड बुडाच्या पातेल्यात तूप आणि बेसन घालून मंद आचेवर खमंग भाजून घ्या. भाजायला २०–२५ मिनिटं लागतात. सुरुवातीला मिश्रण भाजायला कठीण पडतं. पण नंतर मिश्रण थोडं पातळ होतं आणि सहज भाजलं जातं.
२. बेसनाचा रंग बदलला आणि छान खमंग सुगंध आला की गॅस बंद करून लगेच दूध घाला. आणि मिश्रण ढवळत राहा. बेसन फुलेल. खूप बुडबुडे येतील आणि थोडा वेळ ढवळल्यावर बुडबुडे येणं बंद होईल. असे केल्यानं लाडवाचा ढास बसत नाही ( लाडू घशाला चिकटत नाही).
३. मिश्रण दुसऱ्या पातेल्यात काढून गार करत ठेवा.
४. मिश्रण कोमट झालं की त्यात साखर मिसळा आणि एकजीव करा. वेलची पूड घालून एकजीव करा.
५. थोडा वेळाने लाडू वळा. बेदाणे / काजू मिश्रणात घालू शकता किंवा प्रत्येक लाडू वळताना लावू शकता.
६. बेसन लाडू २–३ आठवडे टिकतात. फ्रिजमध्ये ठेवू नका.
टीप
१. बेसन बारीक असेल तर ह्या मापापेक्षा कमी तूप घाला.
२. एवढी काळजी घेऊनही जर लाडवात तूप जास्त झाले तर थोडं सुकं बेसन खमंग घालून मिश्रणात मिक्स करा आणि लाडू वळा.
३. तूप जर कमी झालं तर थोडं तूप गरम करून मिश्रणात घालून एकजीव करा आणि लाडू वळा.
सहज सोप्या भाषेत अतिशय उपयुक्त टिप्स.
Thank you
Sudha