Chirote (चिरोटे) – Sweet Crispy Maharashtrian Delicacy
Chirote is a Maharashtrian delicacy – that is generally prepared as a part of Diwali sweets. The process of making Chirote is a bit lengthy. But for such a delicious sweet, it’s worth all those efforts.
Ingredients (Makes 22-25 Chirote) (1 cup = 250 ml)
Maida (All Purpose Flour) 1 cup
Pure Ghee (Clarified Butter) 1 tablespoon
Vanaspati Ghee (Thick Vegetable Oil) 2 tablespoon / Pure Ghee (Clarified Butter)1 tablespoon
Corn Starch (Corn Flour) 2 – 3 tablespoons
Powdered Sugar 1 cup
Milk about ½ cup
Salt a pinch
Vanaspati Ghee (Thick Vegetable Oil) / Pure Ghee / Refined Oil for frying
Instructions
Prepare Dough
1. Add 1 tablespoon of pure ghee, salt to Maida,
2. Bind it with milk to a stiff consistency dough. Add small quantity of milk each time to get required consistency
3. Let it rest for 8 hours.
Prepare Paste
1. Beat 2 tablespoon of Vanaspati Ghee / 1 tablespoon of pure ghee in a bowl till it is fluffy
2. Add corn starch and beat till fluffy.
Preparing Chirote
1. Make dough balls smaller than tennis ball
2. Roll three balls into a set of three 7 to 8 inches round (rotis). Roti should be very thin.
3. Apply evenly ¾ spoonful of “Paste” on one of the rotis.
4. Place the second roti on the above roti.
5. Apply evenly “Paste” on the top roti.
6. Place the third roti on the above rotis.
7. Apply “Paste” on the top roti.
8. Roll this tightly in a roll.
9. Cut into 1 cm pieces.
10. Repeat steps 2 to 9.
11. Place each piece on a plastic sheet such that the sides with circular layers are on the top and bottom.
12. Place another plastic sheet on the top.
13. Roll it gently in a 2 – 3 inch circular shape. (this is unfried “chirote”). Do not roll it with pressure; else the layers will be flattened.
Frying Chirote
1. Heat Vanaspati Ghee in a wok on low flame.
2. Gently slip the above “chirote’ into the heated Ghee. The side that was on the top while rolling the Chirote should be on the top in Wok also
3. Do not turn the “chirote” in oil while frying, while frying keep splashing some heated ghee on the top for it to fry.
4. Fry till light brown.
5. Remove from oil and place it on tissue (this helps to soak the excess oil).
6. While hot sprinkle powdered sugar on the top. Be generous with sugar as this is the only sweetness in Chirote.
7. Leave Chirote to cool completely. Upon cooling store in air tight container. It will last for 2-3 weeks.
Note
1. Applying right amount of Corn Starch / Flour paste is very important to get correct texture of Chirote. If you apple too much paste, Chirote will spread / open while frying; if you apply less, Chirote will not cook properly. Best way to handle this is to make chirote of first roll, check the texture and make modifications to quantity of paste for the remaining rolls. If you make all the rolls together, there is no chance for course correction.
2. Don’t put too much Ghee in the Wok at a time. While frying Corn Starch / Flour mixes with Ghee and Ghee becomes thick and brown in colour. If Ghee becomes too brown, filter it using muslin or thin cloth before you continue frying.
3. Use Refined Oil or Pure Ghee or Vanaspati Ghee for Frying Chirote. Do not use Filtered Oil. Chirote will smell of Oil if fried in Filtered Oil.
4. Colour of Chirote will depend on the oil / Ghee used for frying.
5. Of all the fried snacks that you make for Diwali (like Karanji, Shankarpale etc), make Chirote after making everything else. Because while frying Chirote, the Oil / Ghee becomes brown and it can’t be used for frying anything else.
6. If you like you can make chirote with coloured layers. For this divide the dough in 3 equal parts and mix edible colour of your choice in each part. Use one dough ball of each colour for making one roll.
==============================================================================
चिरोटे
खुसखुशीत चिरोटे सगळ्यांनाच आवडतात. आणि माझ्यामते हा पदार्थ घरीच केला पाहिजे. बाहेर कुठेही मी चांगले चिरोटे बघितलेले नाहीत. कृती जरा कठीण आहे पण जेव्हा तुम्ही जिभेवर विरघळणारे चिरोटे खाता तेव्हा सगळ्या मेहनतीचं चीज झाल्यासारखं वाटतं. चिरोटे दोन प्रकारचे असतात – १. पुरीसारखे आणि २. लोडाचे चिरोटे. लोडाच्या चिरोट्यात पिठाची गुंडाळी तुकडे करून लाटत नाहीत. तसेच तळतात. पहिल्या प्रकारात ते तुकडे लाटून तळतात. गोडीसाठी चिरोटे साखरेच्या पाकात घालतात किंवा तळल्यावर वरून पिठीसाखर घालतात. माझी रेसिपी पुरीसारखे पिठीसाखर घातलेल्या चिरोट्यांची आहे. ही पण माझ्या आईची रेसिपी आहे. परफेक्ट आणि टेस्टेड.
ज्या पदार्थांना मोहन घातलेलं असतं त्या पदार्थासाठी अचूक मापाचे कप, चमचे खूप महत्त्वाचे असतात. ह्या रेसिपीत २५० मिली चा कप वापरलाय. मापाच्या कपांचा सेट मिळतो त्यातला. नेहमीचा चहाचा कप वापरू नका कारण चहाचे कप वेगवेगळ्या मापाचे असतात. त्याने मोहन चे प्रमाण चुकेल. मापाच्या चमच्यांचा ही सेट मिळतो तो वापरा. कारण तेच – पोहे खायचे चमचे वेगवेगळ्या मापाचे असतात.
साहित्य (२०–२२ चिरोट्यांसाठी) (१ कप = २५० मिली )
मैदा १ कप
साजूक तूप १ टेबलस्पून
वनस्पती तूप २ टेबलस्पून किंवा साजूक तूप १ टेबलस्पून
दूध अंदाजे अर्धा कप
कॉर्न फ्लोअर २–३ टेबलस्पून
पिठीसाखर १ कप
मीठ चिमूटभर
वनस्पती तूप / साजूक तूप / रिफाईंड तेल तळण्यासाठी
कृती
चिरोट्याचं पीठ
१. मैद्यात १ टेबलस्पून साजूक तूप (गरम न करता) आणि चिमूटभर मीठ घाला.
२. थोडं थोडं दूध घालून घट्ट पीठ भिजवा.
३. पीठ ८ तास झाकून ठेवा.
चिरोट्याचा साटा
१. २ टेबलस्पून वनस्पती किंवा १ टेबलस्पून साजूक तूप हलकं होईपर्यंत फेटून घ्या.
२. थोडं थोडं कॉर्न फ्लोअर घालून फेटा. साटा क्रिम सारखा व्हायला हवा.
चिरोटे करण्यासाठी
१. पीठ चांगलं मळून घ्या. टेनिस बॉल च्या आकाराचे गोळे करून घ्या.
२. पिठाच्या ३ गोळ्यांच्या ३ पातळ पोळ्या लाटून घ्या. पोळी जेव्हढी पातळ तेवढे चिरोटे हलके आणि खुसखुशीत.
३. एका पोळीवर पाऊण चमचा साटा पसरून घ्या. त्याच्यावर दुसरी पोळी ठेवा. साटा पसरून घ्या. तिसरी पोळी ठेवा. साटा पसरा.
४. पोळ्या गुंडाळून घट्ट गुंडाळी (रोल) करा.
५. रोल चे १ सेमी रुंदीचे तुकडे करा.
६. आता प्लास्टिक च्या कागदामध्ये / बटर पपेरमध्ये ठेवून हे तुकडे लाटा. लाटताना कापलेली बाजू वरती घ्या आणि हलक्या हाताने पुरी लाटा. मधे फुलासारखे डिसाईन दिसेल.
७. गरम तेलामध्ये चिरोटे सोडून मंद गॅसवर चिरोटे तळून घ्या. तळताना झाऱ्याने चिरोट्यावर तूप उडवा म्हणजे चिरोटे वरच्या बाजूने तळले जातील. चिरोटे तळताना उलटायचे नाहीत.
८. छान खमंग तळल्यावर पेपर टिश्यू वर काढा आणि लगेच थोडी पिठीसाखर भुरभुरवा. चिरोट्याला गोडी फक्त ह्या साखरेचीच असते. त्यामुळे जरा सढळ हाताने साखर घाला.
९. चिरोटे गार झाल्यावर हवाबंद डब्यात भरून ठेवा. २–३ आठवडे छान राहतात.
टीप
१. पोळीला किती साटा लावायचा हा खूप महत्त्वाचा मुद्दा आहे. कमी साटा लावला तर चिरोटे कडक होतील. जास्त साटा लावला तर चिरोटे तळताना विरघळतील. त्यासाठी चिरोट्याचा एक छोटा रोल करून चिरोटे करून बघा. सगळे रोल आधीच एकदम करून ठेवले तर काही बदल करता येणार नाही. एका छोट्या रोल चे चिरोटे तळून ठरवा साटा किती लावायचा ते.
२. चिरोटे तळताना एका वेळी जास्त तेल/ तूप घालू नका. चिरोट्याचा साटा तुपात मिक्स होतो आणि तूप काळं होतं. म्हणून मधे मधे तूप मलमल च्या कापडाने गाळून घ्या आणि परत तळायला वापरा.
३. चिरोटे तळताना रिफाईंड तेल किंवा साजूक तूप किंवा वनस्पती तूप वापरा. फिल्टर्ड तेल वापरू नका. चिरोटे तळल्यावर त्याला तेलाचा वास येतील.
४. चिरोटे तळायला काय वापरता त्यानुसार चिरोट्यांचा रंग बदलतो.
५. तळपाच्या पदार्थात चिरोटे सगळ्यात शेवटी करा. करंज्या, शंकरपाळे आधी तळून घ्या. कारण चिरोटे तळताना साटा तेलात / तुपात उतरून तेल/तूप खराब होतं. बाकी काही तळायला ते वापरता येत नाही.
६. तुम्हाला आवडत असेल तर चिरोट्याच्या तीन पोळ्या तीन वेगवेगळ्या रंगाच्या करून रंगीत चिरोटे करू शकता. त्यासाठी पिठाचे तीन भाग करून प्रत्येक भागात वेगळा खायचा रंग मिसळून घ्या.
करंज्या पण काकांना तळायला द्या पुढल्यावेळी म्हणजे\r\nमऊ पडणार नाहीत.
हो नक्की ..\nSudha