Vari Rice and Shengdana Aamti (वरी तांदूळ आणि शेंगदाण्याची आमटी) – Sawa Millet Rice with Peanuts Curry

Vari Rice with Shengdana Aamti
Vari Rice with Shengdana Aamti (वरी तांदूळ आणि शेंगदाण्याची आमटी)

Vari Rice and Shengdana Aamti (वरी तांदूळ आणि शेंगदाण्याची आमटी) – Sawa Millet Rice with Peanuts Curry

वरी तांदूळ आणि शेंगदाण्याची आमटी मराठी

This is a famous Fasting meal in Konkan (Maharashtra). Vari Rice is Bhagar / Samo / Sawa. This may be common in other regions on India. But I’m not sure if Shengdana Aamti (Peanut Curry) is popular in other regions. Both these recipes are very easy and they make a delicious fasting meal. Even though we don’t keep any fast, I cook this meal sometimes. It’s a good change from the regular meal.

Ingredients (1 cup = 250 ml) (Serves 4)

For Vari Rice

Raw Vari Rice / Sago / Sawa Millet / Bhagar 1 cup

Ghee (Clarified Butter) 2 teaspoon

Cumin Seeds ½ teaspoon

Fresh Scraped coconut 2 teaspoon

Chopped coriander 1 teaspoon

Lemon Juice 1 teaspoon

Crushed Green Chilies ½ teaspoon

Salt to taste

For Shengdana Aamti

Roasted and Peeled peanuts 1 cup

Fresh Scraped coconut 3 teaspoon

Green Chilies 3-4

Sugar 1 teaspoon (adjust as per taste)

Aamchoor (Mango Powder) ½ teaspoon

Kokum 3-4

Cumin Powder ½ teaspoon

Ghee (clarified butter) 1 teaspoon

Cumin Seeds ½ teaspoon

Chopped coriander ½ teaspoon

Salt to taste

Instructions

Vari Rice

1. Wash Vari rice and leave it for 10 minutes.

2. In a pan, heat 1 teaspoon of ghee. Add cumin seeds. Wait for crackle. Add crushed green chilies. Add Vari Rice and saute till Rice gets dried. It will take 5-6 minutes on low flame.

3. Meantime, boil 1 and ¼ cup of water.

4. Add boiling water to sauteed Vari Rice.

5. Add Lemon juice, coconut, coriander and salt.

6. Cook covered till rice is cooked. Add little water if it’s too dry. The amount of water required to cook depends on the type of Vari Rice.

7. Add 1 teaspoon ghee; mix.

8. Tasty Vari Rice is ready.

Shengdana Aamti

1. In a grinder, add roasted peanuts, coconut, chilies, Mango Powder, salt, cumin powder and sugar. Add little water and grind into a smooth paste.

2. In a pan, hear ghee. Add cumin seeds, wait for crackle. Add peanut paste.

3. Add water to adjust consistency. Add Kokum cut into pieces.

4. Bring to boil. Cook on low flame for 5 minutes.

5. Add chopped coriander. Mix.

6. Delicious Shengdana Aamti is ready.

7. Serve hot Vari Rice with steaming Shengdana Aamti and some home made ghee (Clarified butter). It tastes awesome.

Note

1. You can also add some boiled peanuts in Shengdana Aamti. For this soak ¼ cup of raw peanuts for 6 hours. Pressure cook them till soft and add to Shengdana Aamti in step 3 above.

Vari Rice with Shengdana Aamti
Vari Rice with Shengdana Aamti (वरी तांदूळ आणि शेंगदाण्याची आमटी)
Vari Rice with Shengdana Aamti
Vari Rice with Shengdana Aamti (वरी तांदूळ आणि शेंगदाण्याची आमटी)

 

 

 

 

 

 

 

 

==================================================================================

वरी तांदूळ आणि शेंगदाण्याची आमटी उपासासाठी आवडता बेत

वरी तांदूळ आणि शेंगदाण्याची आमटी हा कोकणातला उपासाचा लोकप्रिय बेत आहे. काही जण ह्याला वरीचा भात म्हणतात पण आम्ही वरी तांदूळच म्हणतो कारण आई तसं म्हणायची. मी हे वरी तांदूळ सुद्धा आई करायची तसे उपम्यासारखे करते. काही जणी फक्त वरी तांदूळ वाफवून भात करतात. आम्हाला कोणालाच तसा भात आवडत नाही. वरी तांदूळ भाजून घेऊन त्यात हिरवी मिरची, लिंबूनारळ, कोथिंबीर घालून शिजवले की मस्त लागतात

शेंगदाण्याच्या आमटीसाठी छान खरपूस भाजलेले शेंगदाणे घेतले की आमटी खूप चविष्ट होते. रेसिपी अगदी सोपी आहे. त्यात तुम्ही वाफवलेले शेंगदाणे ही घालू शकता.

आम्ही कोणताच उपास करत नाही. पण वरी तांदूळ आणि शेंगदाणे आमटीचा बेत मी असंच कधी कधी जेवायला करते. घरी सगळ्यांना आवडतो

साहित्य (१ कप = २५० मिली) (४ जणांसाठी)

वरी तांदळासाठी

वरी तांदूळ / भगर १ कप

साजूक तूप २ टीस्पून

जिरं अर्धा टीस्पून

ताजा खवलेला नारळ २ टीस्पून

चिरलेली कोथिंबीर १ टीस्पून

लिंबाचा रस १ टीस्पून

ठेचलेली हिरवी मिरची अर्धा टीस्पून

मीठ चवीनुसार

शेंगदाण्याच्या आमटीसाठी

भाजून सोललेले शेंगदाणे १ कप

ताजा खवलेला नारळ ३ टीस्पून

हिरव्या मिरच्या ३

साखर १ टीस्पून (चवीनुसार कमी / जास्त करा)

आमचूर अर्धा टीस्पून

आमसूल / कोकम ३

जिरं पूड अर्धा टीस्पून

साजूक तूप १ टीस्पून

जिरं अर्धा टीस्पून

चिरलेली कोथींबीर अर्धा टीस्पून

मीठ चवीनुसार

कृती

वरी तांदूळ

. वरी तांदूळ धुवून १० मिनिटं झाकून ठेवा.

. एका कढईत १ टीस्पून साजूक तूप गरम करून त्यात जिऱ्याची फोडणी करा. ठेचलेली हिरवी मिरची घाला. वरी तांदूळ घालून मंद आचेवर परता. तांदूळ सुके झाले पाहिजेत

. दुसऱ्या गॅसवर सव्वा कप पाणी उकळून घ्या. उकळतं पाणी वरी तांदुळात घाला.

. लिंबाचा रस, नारळ, कोथिंबीर आणि मीठ घाला

. झाकण ठेवून तांदूळ शिजवा. हे तांदूळ पटकन शिजतातफार सुके वाटले तर थोडं पाणी घाला. वरी तांदूळ जाड / बारीक असतील त्यानुसार शिजायला पाणी लागतं.

. एक टीस्पून साजूक तूप घालून ढवळा आणि गॅस बंद करा.

. चविष्ट वरी तांदूळ तयार आहेत

शेंगदाणा आमटी

. मिक्सरमध्ये भाजलेले शेंगदाणे, नारळ, मिरच्या, आमचूर, मीठ, जिरेपूड आणि साखर घालून थोडं पाणी घालून बारीक वाटून घ्या.

. एका कढईत साजूक तूप घालून जिऱ्याची फोडणी करा. त्यात शेंगदाण्याचं वाटलेलं मिश्रण घाला.   

. आमटी पातळ हवी असेल तर आणखी पाणी घाला. आमसूल घाला. मिश्रण उकळून घ्या आणि मंद आचेवर ५ मिनिटं शिजवा

. चिरलेली कोथिंबीर घालून गॅस बंद करा.

. गरम गरम वरी तांदूळ थोडं साजूक तूप घालून वाफाळलेल्या शेंगदाणा आमटीसोबत खायला द्या. फारच चविष्ट लागतं

टीप

. शेंगदाणा आमटीत तुम्ही शिजवलेले शेंगदाणे ही घालू शकता. त्यासाठी पाव कप कच्चे शेंगदाणे ६ तास पाण्यात भिजवून ठेवा. प्रेशर कुकर मध्ये नरम होईपर्यंत शिजवा. आणि वर लिहिल्याप्रमाणे मिश्रण उकळताना त्यात घाला

Vari Rice with Shengdana Aamti
Vari Rice with Shengdana Aamti (वरी तांदूळ आणि शेंगदाण्याची आमटी)
Vari Rice with Shengdana Aamti
Vari Rice with Shengdana Aamti (वरी तांदूळ आणि शेंगदाण्याची आमटी)

 

Be the first to comment

Your comments / feedback will help improve the recipes