Bharali Vangi (भरली वांगी) – Stuffed Brinjal – No Onion Garlic Recipe
This is one of the famous preparation from Maharashtra. It is made in different ways in different parts of Maharashtra. This one is Brahmin style recipe from Konkan region. It does not use onion and garlic. There are 2-3 types of small brinjals available in the market. 1) Dark purple brinjals 2) Light purple brinjals with thin white lines 3) Light green Brinjals. You can use either of these varieties for this subji. But the second one (light purple with thin white lines) tastes better when cooked this way.
Ingredients (1 cup = 250 ml) (serves 4)
Brinjals small 12-13 Nos.
White Sesame Seeds ½ cup
Dried Coconut Grated ½ cup
Tamarind pulp 2 tablespoons
Crushed Jaggery 2-3 tablespoons (adjust as per taste)
Red Chili Powder 1 teaspoon
Goda Masala 2 teaspoons
Fresh Scraped Coconut 3 tablespoons
Chopped Coriander Leaves 3 tablespoons
Oil 1 teaspoon
Mustard Seeds ¼ teaspoon
Turmeric Powder ½ teaspoon
Asafoetida (Hing) ¼ teaspoon
salt to taste
Instructions
1. Wash brinjals. Remove the green part of the stem attached to brinjal fruit, but leave ½ inch of stem along with the fruit. Make two perpendicular slits about ¾ th length deep on the other side of the stem. Retaining some part of stem prevents brinjals from breaking to pieces while cooking.
2. Roast white sesame seeds till light brown.
3. Roast grated dried coconut till light brown.
4. Grind roasted dried coconut and sesame seeds separately into a coarse powder using a grinder.
5. Add Jaggery, Red chili powder, Goda masala, fresh scraped coconut, chopped coriander and salt to tamarind pulp.
6. Add dried coconut and sesame seeds powder to form a uniform coarse mixture, add some water if required. Consistency of this mixture should be like a thick gravy.
7. Stuff about a teaspoon of solid part of the mixture into each slit of Brinjals. Brinjals are ready for cooking now.
8. Heat oil in a pan on medium flame.
9. Add mustard seeds, wait for sputter.
10. Add turmeric powder and Asafoetida.
11. Add stuffed brinjals into the pan and cover the pan. Cook on low flame for 2-3 minutes.
12. Flip each brinjal, cover the pan again and cook for 3-4 minutes.
13. Brinjals will change colour to dark purple. Add the remaining mixture (prepared in step 6).
14. Add water just enough to cover the brinjals.
15. Cook covered till brinjals are soft and gravy is thick. Add water if required.
16. Serve this delicious subji hot with Roti / Bhakari (Indian Bread) or Rice.
Note:
1. If you want, you can add 4-5 small onions in this subji. Peel onions, make 2 perpendicular slits on each onion. Stuff some spice mixture in each onion and add them along with brinjals in step 11 above.
2. Colour of the subji will depend on the colour of Tamarind pulp. If Tamarind pulp is brown, the subji will be dark brown. If Tamarind Pulp is dark, subji will be blackish brown.
==================================================================================
भरली वांगी – चविष्ट भाजी – कांदा लसूण न घालता
भरली वांगी ही महाराष्ट्रातली लोकप्रिय भाजी आहे. ही वेगवेगळ्या प्रकारे करतात. ही रेसिपी कोकणातली ब्राह्मणी पद्धतीच्या भाजीची आहे. कांदा लसूण न घालता चिंच, गूळ आणि गोडा मसाला घालून केलेली ही भाजी अतिशय चविष्ट लागते. बाजारात ३ प्रकारची छोटी वांगी मिळतात – १. गडद जांभळ्या रंगाची २. हलक्या जांभळ्या रंगाची काटेरी वांगी आणि ३. हलक्या हिरव्या रंगाची . ही भाजी कोणतीही वांगी वापरून करू शकता. पण काटेरी वांग्याची भाजी जास्त चविष्ट लागते.
साहित्य (४ जणांसाठी) (१ कप = २५० मिली )
छोटी वांगी १२–१३
पांढरे तीळ अर्धा कप
किसलेलं सुकं खोबरं अर्धा कप
चिंचेचा कोळ २ टेबलस्पून
चिरलेला गूळ २–३ टेबलस्पून (चवीप्रमाणे कमी / जास्त करा)
लाल तिखट १ टीस्पून
गोडा मसाला २ टीस्पून
ताजा खवलेला नारळ ३ टेबलस्पून
चिरलेली कोथिंबीर ३ टेबलस्पून
मीठ चवीनुसार
फोडणीसाठी
तेल १ टीस्पून
मोहरी पाव टीस्पून
हळद अर्धा टीस्पून
हिंग पाव टीस्पून
कृती
१. वांगी धुवून देठालगतचा हिरवा भाग काढून टाका, अर्धा इंच देठ ठेवून बाकीचं देठ काढून टाका. वांग्याचं थोडं देठ ठेवलं की शिजताना वांग्याचे तुकडे होत नाहीत. प्रत्येक वांग्याला देठाच्या उलट्या बाजूने उभ्या आडव्या (क्रॉस मध्ये) २ चिरा द्या.
२. तीळ आणि सुकं खोबरं मंद आचेवर वेगवेगळं खमंग भाजून घ्या. ताटलीत काढून गार करा.
३. तीळ आणि सुकं खोबरं मिक्सर मध्ये वेगवेगळं जाडसर वाटून घ्या.
४. चिंचेच्या कोळात गूळ विरघळून घ्या. त्यात वाटलेलं तीळ, खोबरं. लाल तिखट, नारळ, कोथिंबीर, गोडा मसाला, मीठ घालून मिश्रण एकजीव करा. थोडं पाणी घालून दाट मिश्रण बनवा.
५. वांग्यांच्या चिरेत मिश्रणातला मसाला भरा.
६. एका कढईत तेल गरम करून मोहरी, हळद, हिंगाची फोडणी करा.
७. भरलेली वांगी फोडणीत घाला. पाणी न घालता झाकण ठेवून २–३ मिनिटं वाफ काढा.
८. वांगी परतून घ्या आणि परत ३–४ मिनिटं वाफ काढा. आता वांग्यांचा रंग बदलेल.
९. आता कढईत उरलेला मसाला घाला. वांगी बुडेपर्यंत गरम पाणी घाला. एकदा ढवळून झाकण ठेवून वांगी शिजवा. मधे मध्ये ढवळा. पाणी कमी असेल तर थोडं पाणी घाला. दाटसर रस्सा होईल इतपत पाणी घालून उकळी काढा.
१०. चविष्ट भरली वांगी तयार आहेत. पोळी / भाकरी / भातासोबत गरम गरम वांगी खायला द्या.
टीप
१. आवडत असेल तर ह्या भाजीत तुम्ही कांदे घालू शकता. ४–५ छोटे कांदे सोलून उभ्या आडव्या २ चिरा पाडा. प्रत्येक कांद्याच्या चिरेत मसाल्याचं मिश्रण भरून वांग्यासोबत फोडणीत घालून शिजवा.
२. ह्या भाजीचा रंग चिंचेच्या आणि गोड्या मसाल्याच्या रंगानुसार बदलतो.
Your comments / feedback will help improve the recipes