Sabudana Thalipeeth (साबुदाण्याचे थालीपीठ) – Tapioca / Sago Savory Pan Cake

Sabudana Thalipeeth (साबुदाण्याचे थालीपीठ)

Sabudana Thalipeeth (साबुदाण्याचे थालीपीठ) – Tapioca / Sago Pan Cake

साबुदाण्याचे थालीपीठ मराठी 

Sabudana Thalipeeth is generally made for fasting. But if you like Sabudana, this could be a good breakfast or snack on any day. It requires few ingredients and is very easy to make. Just that you need to remember to soak Sabudana on previous night if you want to make it for breakfast. I do no add any flour to this Thalipeeth. But if Sabudana is not sticky, you may need to mix some flour (Rajgira – Amaranth flour or Shingada – Water Chest Nut flour or Varai – Samo flour).

Ingredients (Makes 8-9 Thalipeeth) (1 cup = 250ml)

Sabudana (Tapioca Pearls) 2 cups

Medium size potatoes 3

Roasted Peanut Powder 2 tablespoons

Chili Paste ½ teaspoon

Sugar ½ – 1 teaspoon (optional)

Amchoor (Mango Powder ) ½ teaspoon

Cumin Seeds ½ teaspoon

Chopped Coriander 1 tablespoon

Salt to taste

Ghee (Clarified butter) for roasting Thalipeeth

Instructions

1. Wash and soak Sabudana in water for 4-6 hours. Add water in the bowl just enough to cover Sabudana. If you add more, it will be soggy; if you add less, it won’t soak properly.

2. Boil, peel and grate potatoes.

3. In a bowl, mix all ingredients except ghee.

4. Add little water to bind the mixture together. It should be stiff consistency dough.

Sabudana Thalipeeth Dough (थालीपीठाच्या पिठाचा गोळा)

5. Take a plastic sheet and apply water to it.

6. Take a tennis ball size dough and pat it on the plastic sheet into a round Thalipeeth. Dip your fingers in water before patting the mixture. It is easier to make Thalipeeth this way.

7. Thickness of Thalipeeth should be that of a Paratha (pan cake).

Pat the dough into a round shaped thalipeeth (हाताने थापून गोल थालीपीठ बनवा)

8. Heat a non stick griddle. Transfer Thalipeeth to hot griddle. Apply a few drops of ghee on top and cook covered for 2-3 minutes.

9. Flip the Thalipeeth and cook other side without covering.

Thalipeeth being roasted (थालीपीठ दोन्ही बाजूंनी भाजा)

10. When both sides are light brown, Thalipeeth is done.

11. Serve hot with home made butter or chutney of your choice.

Note

If Sabudana is not sticky enough, Thalipeeth will break while it is getting roasted. In such a case, mix 2 tablespoons of flour (Either Rajgira – Amaranth flour or Shingada – Water Chest Nut flour or Varai – Samo flour) in step 4. If you don’t have any of these, you can use rice flour.

Sabudana Thalipeeth (साबुदाण्याचे थालीपीठ)

===================================================================================

साबुदाण्याचे थालीपीठ

उपासाच्या दिवशी साबुदाणा नाही खाल्ला तर उपास केला असं वाटत नाही. साबुदाणा खिचडी, साबुदाणा वडे हे पदार्थ खूप लोकप्रिय आहेत. पण साबुदाण्याचं थालीपीठ (माझी आजी ह्याला साबुदाण्याचा तुकडा म्हणायची) तेवढं लोकप्रिय नाही. माझ्या मते याचं कारण असं की हॉटेल हा पदार्थ मिळत नाही. खरं तर साबुदाणा वड्यापेक्षा हेल्दी असतं हे थालीपीठ कारण तव्यावर भाजलेलं असतं. करायला सोपं आहे. साबुदाणा वड्याचेच जिन्नस लागतात याला. आम्ही कोणताच उपास करत नाही पण हे थालीपीठ मात्र मी सकाळच्या नाश्त्याला बरेचदा करते. सगळ्यांना आवडते. मी यात कुठलंच पीठ घालत नाही. पण तुमच्या थालीपीठाचे जर तुकडे पडायला लागले (साबुदाणा तुकडा नाव सार्थ करायला) तर मात्र तुम्हाला थोडं वरीचं / शिंगाडा / राजगिरा पीठ घालावं लागेल. साबुदाणा चिकट नसेल तर असं होऊ शकतं.

साहित्य (९ थालिपीठांसाठी) (१ कप = २५०मिली)

साबुदाणे २ कप

बटाटे ३ मध्यम

भाजलेल्या शेंगदाण्याचे कूट २३ टेबलस्पून 

ठेचलेली मिरची  अर्धा टीस्पून

आमचूर अर्धा टीस्पून

जिरे  अर्धा टीस्पून

चिरलेली कोथिंबीर १ टेबलस्पून

साखर अर्धा – १ टीस्पून (ऐच्छिक)

मीठ चवीनुसार

तूप भाजण्यासाठी

कृती

. साबुदाणे धुवून ६ तास भिजत ठेवा. पातेल्यात साबुदाणे बुडतील एवढंच पाणी घाला

. बटाटे शिजवून घ्या.

. भिजलेले साबुदाणे मोकळे करून त्यात बटाटे सोलून, किसून घाला

. दाण्याचे कूट, मिरची, आमचूर, मीठ, साखर, जिरे, कोथिंबीर घालून मिक्स करा.

. लागलं तरच थोडं पाणी घाला. पिठाचा घट्टसर गोळा बनवा

Sabudana Thalipeeth Dough (थालीपीठाच्या पिठाचा गोळा)

. एका प्लास्टिक कागदाला तूप लावून पिठाचा लहान गोळा त्यावर हाताने थापून थालीपीठ बनवा

. गरम तव्यावर थोडे तूप घालून दोन्ही बाजूनी भाजून घ्या. पहिली बाजू भाजताना झाकण ठेवा

Pat the dough into a round shaped thalipeeth (हाताने थापून गोल थालीपीठ बनवा)
Thalipeeth being roasted (थालीपीठ दोन्ही बाजूंनी भाजा)

. लोणी / तूप / चटणी बरोबर सर्व्ह करा

टीप

. तव्यावर परतताना  जर थालीपीठाचे तुकडे झाले तर पिठात २ टेबलस्पून राजगिरा / शिंगाडा / वरी पीठ मिक्स करा आणि थालीपीठ थापा. साबुदाणे चिकट नसतील तर असं होऊ शकतं

Sabudana Thalipeeth (साबुदाण्याचे थालीपीठ)

Be the first to comment

Your comments / feedback will help improve the recipes