Sakharparyachya Vadya (साखरपाऱ्याच्या वड्या) – Oven Roasted Wheat Flour Burfi – Indian Sweet
This is a Maharashtrian recipe of delicious Wheat Flour Burfi. This Burfi literally that melts in your mouth. Recipe is very easy – No roasting, No sugar syrup. This burfi is roasted in Oven. You can also roast it in a Wok like a cake. Recipe is similar to that of Nankhatai cookies; but it tastes different than cookies. I remember, in my childhood, I had made this burfi as an inauguration dish when we had bought an electric oven.
Ingredients (Makes 40-45 pieces) (1 cup = 250 ml)
Wheat Flour 2 cup
Ghee (Clarified Butter) ¾ cup
Powdered sugar 1 + ¼ cup
Baking soda 2 pinch
Cardamom Powder ¼ teaspoon
Salt a pinch (optional)
Dry Fruits as Required
Instructions
1. Beat Ghee either with hand or using a beater till it’s light
2. Add powdered sugar and beat again till fluffy
3. Add Wheat Flour, baking soda, salt, cardamom powder and mix well. Bind the dough together. It will look like Nankhatai / Cookie dough.
4. Let the dough rest for 4-5 hours
5. Preheat oven on 200 degrees Celsius.
6. Spread the dough evenly on a greased plate to form about ½ inch thick layer.
7. Using a knife make rectangular or diamond shape marks. You have to do this before you roast the dough.
8. Garnish with dry fruits of your choice.
9. Roast in preheated oven on 200 degrees Celsius for 20-25 minutes.
10. While burfi is hot, loosen the pieces using a knife.
11. Serve when cool. Enjoy this delicious burfi.
12. Store in air tight container. It lasts for about 2 weeks without refrigeration.
Note
1. Set the timer as per setting of your Oven as temperature setting is different for each oven.
2. If you don’t have Oven, you can bake these in a Wok. Use Sand / Salt to make a layer in the Wok. Do not add water. Place the dough plate on this layer. Bake for 20-25 minutes with a lid. Check after 15-18 minutes.
==================================================================================
साखरपाऱ्याच्या वड्या (विस्मृतीत गेलेली महाराष्ट्रीयन रेसिपी)
ही महाराष्ट्रीयन कणकेच्या वड्यांची रेसिपी हल्ली फारशी कोणाला माहित नसते. खूप सोपी रेसिपी आहे. ह्यात पीठ भाजावं लागत नाही. साखरेचा पाक करावा लागत नाही. ह्या वड्या ओव्हन मध्ये (किंवा कढई मध्ये ) खमंग भाजतात. नानखटाई सारखी रेसिपी पण कणिक वापरून केलेल्या ह्या वड्या नानखटाई पेक्षा वेगळ्या लागतात. दिवाळीत एक वेगळा पदार्थ म्हणून करायला हरकत नाही.
साहित्य (४०–४५ वड्यांसाठी) (१ कप = २५० मिली )
कणिक २ कप
साजूक तूप पाऊण कप (वनस्पती घेतलं तरी चालेल पण कसला वास येत नाही ते बघा)
पिठीसाखर सव्वा कप
बेकिंग सोडा २ चिमूट
वेलची पूड पाव टीस्पून
मीठ चिमूटभर (ऐच्छिक)
सुका मेवा आवडीप्रमाणे
कृती
१. तूप हलकं होईपर्यंत फेटून घ्या.
२. त्यात पिठीसाखर मिक्स करून परत फेटून घ्या. मिश्रण क्रिम सारखं होईपर्यंत फेटून घ्या.
३. त्यात कणिक, सोडा, वेलची पूड आणि मीठ मिक्स करा. पीठ मळून घ्या. पीठ नानखटाई च्या पिठासारखं होईल.
४. पीठ ४–५ तास झाकून ठेवा.
५. ओव्हन २०० डिग्री वर प्री –हीट करून घ्या.
६. बेकिंग डिश ला तूप लावून त्यावर पिठाचा अर्धा इंच जाडीचा थर पसरा.
७. सुरीने हव्या त्या आकाराच्या वड्या पाडून घ्या. हवी असल्यास वरून बदाम / काजू लावा.
८. ओव्हन मध्ये २०० डिग्री वर २०–२५ मिनिटं बेक करा. वडी भाजली की नाही ते टूथ पिक घालून चेक करा. वड्या गुलाबी रंगावर भाजून घ्या.
९. डिश ओव्हन मधून काढून सुरीने वड्या परत कापून घ्या. आधी कापलेल्या शिरांवरून परत सूरी फिरवा.
१०. गार झाल्यावर वड्या हवाबंद डब्यात भरून ठेवा. ह्या वड्या २ आठवडे टिकतात. फ्रिजमध्ये ठेवू नका.
टीप
१. ओव्हनचा टायमर तुमच्या ओव्हनच्या सेटिंग प्रमाणे लावा. प्रत्येक ओव्हनचं तापमान वेगवेगळं असतं.
२. ओव्हन नसेल तर तुम्ही कढई मध्ये ही बेक करू शकता. त्यासाठी कढई मध्ये पाणी न घालता वाळू / मिठाचा थर द्या. त्यावर वड्यांची ताटली ठेवा आणि झाकण लावून मंद आचेवर भाजा. भाजायला २०–२५ मिनिटं लागतील. मधे मधे चेक करा.
मी ह्या वड्या करुन बघितल्या आणि त्या खूपच छान झाल्या. मस्त रेसिपी. धन्यवाद.
Most Welcome Jai.
Sudha
हॅलो, या वड्यांसाठी 52 ली मॉर्फी चा ओव्हन किती डिग्री वर प्रिहिट करावा आणि किती वेळ बेकिंग करावे?
ज्या टेम्परेचर वर बेक करतात त्याच टेम्परेचर वर १० मिनिटं प्रीहीट करायचं. ओव्हन ची कॅपॅसिटी जास्त आहे त्यामुळे बेकिंग चा वेळ १० मिनिटं कमी करून बेक कर. मग अजून पाहिजे असेल तर थोडा वेळ आणखी बेक करता येईल.
Sudha