Delicious Salad with Home Made Thousand Island Dressing (अमेरीकन स्टाईल सॅलड आणि होम मेड थाउजंड आयलंड ड्रेसिंग)
अमेरीकन स्टाईल सॅलड आणि होम मेड थाउजंड आयलंड ड्रेसिंग मराठी
Sometimes we don’t want to eat regular food; need some change. In such cases, I make Salad instead of normal Dinner. Salad and Soup (or some healthy drink) is a good option for dinner. Salad has all raw / steamed veggies of one’s choice and some salad dressing. I tried to make Thousand Island Dressing at home. It came out very well. I did not want to buy it, as in most cases after using it once the remaining pack goes waste, Since we don’t use it often. And I hate wasting anything. I made some changes to the Salad Dressing Recipe – basically skipped onions and garlic as I thought it would taste better without them. And yes, it was indeed yummy.
Ingredients (1 cup = 250 ml)
Carrots 3 medium
Radish 2 medium
Tomatoes 2 medium
Beet Root 3 medium
Cabbage ¼ medium size stuck
Sweet Corn about 1 cup
Dried Cranberries 3 tablespoon (or any other dry fruits)
Black Sesame seeds 2 tablespoon
Salt 2 pinch
Sugar ½ teaspoon
For Thousand Island Dressing
Mayonnaise ½ cup
Tomato Ketchup 2 tablespoon
White Vinegar 1 teaspoon
Sugar 2 teaspoon
Salt / Rock Salt to taste
Instructions
1. Wash, Peel and Grate Carrots and Radish. Keep them separate.
2. Wash and finely chop cabbage.
3. Wash and Chop tomatoes in medium size pieces.
4. Wash and cook beet root in microwave till they are soft. Allow them to cool. Peel and chop in medium size pieces. Add 2 pinch salt and ½ teaspoon sugar and mix it.
5. Steam Sweet corn
6. Keep all ingredients in separate bowls
7. Roast black sesame seeds on low flame and keep it separate
8. For Salad Dressing, in a bowl, mix Mayonnaise, tomato ketch, vinegar, sugar and salt. Keep it in refrigerator for 30 minutes so sugar dissolves.
9. While serving, add carrots, cabbage, radish, sweet corn, Beet root, tomatoes in a soup bowl. Add some cranberries and sesame seeds on top. Add some Salad Dressing and serve.
10. While eating, one has to mix the salad with salad dressing and have it.
Note:
1. You can add / delete any vegetables of your choice. You can also add steamed sprouts.
=================================================================================
अमेरीकन स्टाईल सॅलड आणि होम मेड थाउजंड आयलंड ड्रेसिंग
१९८०–९० च्या दशकात शाकाहारी लोकांना परदेशात खाण्याचा खूप त्रास व्हायचा. त्या लोकांना शाकाहारी जेवण काय असतं हे कळलं नव्हतं तेव्हा. मग व्हेज फ्राईड राईस वर कोळंबी घालून समोर यायची. शाकाहारी म्हणजे अंडी आणि मासे सुद्धा नाही हे त्यांना समजायचे नाही. अशा वेळी माझ्यासारख्या शाकाहारी लोकांना सॅलड हा एकच पर्याय उपलब्ध होता. तिथे रेस्टॉरंट मध्ये सॅलड बार असतो जिथे सगळ्या भाज्या,सुका मेवा आणि सॅलड ड्रेसिंग ठेवलेलं असतं. चिकन आणि मासे पण तिथे असतात पण आपण त्या बाजूला जायचं नाही. आपल्याला हवे ते सगळे प्लेट मध्ये घेऊन हवं ते सॅलड ड्रेसिंग घ्यायचं आणि पोट भरायचं. सॅलड ड्रेसिंग वेगवेगळ्या प्रकारचं आणि चवीचं मिळतं. मला त्यातलं थाउजंड आयलंड ड्रेसिंग फार आवडतं. छान आंबट गोड चव असते.
कधी काहीतरी वेगळे करायचं असेल जेवायला तर असं अमेरीकन स्टाईल सॅलड करते. तयारीला जरा वेळ लागतो कारण बरंच काही चिरावे, किसावे लागते. पण ड्रेसिंग बरोबर मस्त लागते. रोजच्या पोळी भाजी ला चांगला पर्याय. तुम्ही विचाराल ड्रेसिंग का घरी करायचं ? कारण बाटली आणली की एक दोन वेळाच वापरलं जातं आणि बाकी सारं फ्रीज मध्ये पडून राहतं आणि फुकट जातं . कोणतीही वस्तू फुकट गेलेली आवडत नाही न मला !! म्हणून घरी करायचं – जेवढे पाहिजे तेव्हढंच.
तुम्ही ही करून पहा.
साहित्य (४ जणांसाठी) (१ कप = २५० मिली )
गाजर ३ मध्यम किसून
मुळा २ मध्यम किसून
बीट ३ मध्यम शिजवून, सोलून आणि किसून / तुकडे करून
टोमॅटो २ मध्यम तुकडे करून
कोबी मध्यम आकाराचा पाव गड्डा चिरून
स्वीट कॉर्न १ कप शिजवून
सुका मेवा / मनुका / बेदाणे / खजूर २ टेबलस्पून (खजूर तुकडे करून घ्या )
काळे तीळ २ टेबलस्पून भाजून
मीठ २ चिमूट (ऐच्छिक)
साखर अर्धा टीस्पून (ऐच्छिक)
थाउजंड आयलंड ड्रेसिंग साठी
मेयोनीज अर्धा कप
टोमॅटो केचअप २ टेबलस्पून
व्हिनेगर १ टीस्पून
साखर २ टीस्पून
मीठ / काळं मीठ चवीनुसार
कृती
१. सगळ्या भाज्या चिरून / किसून वेगवेगळ्या ठेवा.
२. शिजलेल्या बीट मध्ये हवे असल्यास चिमूटभर मीठ आणि अर्धा चमचा साखर घालून मिक्स करा. नाही घातली तरी चालते. बीट चिरून किंवा किसून घ्या.
३. थाउजंड आयलंड ड्रेसिंग साठी मेयोनीज, टोमॅटो केचअप, व्हिनेगर, साखर आणि मीठ एकत्र करा. अर्धा तास फ्रिज मध्ये ठेवा म्हणजे साखर विरघळेल. किंवा पिठीसाखर घातली तरी चालेल.
४. खायला देताना सगळ्या भाज्या एका वाडग्यात घाला. वरून सुका मेवा आणि काळे तीळ घाला. वर २ टेबलस्पून सॅलड ड्रेसिंग घाला. खाणाऱ्याने सॅलड मिक्स करून खावे.
Your comments / feedback will help improve the recipes