Piri Piri Flavoured Raw Papaya Salad ( कच्च्या पपईचं सॅलड – पिरी पिरी मसाला घालून )
I created this recipe that primarily uses Raw Papaya. Till a few years back, I was not using Raw Papaya. My son likes the Raw Papaya chutney that is generally given as accompaniment with Farsan (Dhokla / Kachori etc). I first bought Raw Papaya to make that Chutney. When I read about the nutritional values of Raw Papaya, I created a few recipes using Raw Papaya. This salad is one of them.
To give the salad a different flavor, I used Piri Piri Spice Powder. This is the same powder that is given along with French Fries in McDonalds. This is available in India under the brand name of Keya Foods. It’s a South African Spice Powder is hot with a tinge of sweet taste. It’s very tasty. That makes this Salad Super tasty.
But if you don’t want to use Piri Piri Powder, you can used crushed Green Chilies or Red Chili Powder.
Ingredients (Serves 3) (1 cup = 250ml)
Grated Raw Papaya 1 cup (Grate after peeling)
Roasted peanuts 2 teaspoon
Roasted black sesame seeds ½ teaspoon
Piri Piri Powder 1 teaspoon (adjust as per taste)
Grated Raw Mango 1 teaspoon or lemon juice ½ teaspoon
Chopped coriander 1 teaspoon
Black Salt ¼ teaspoon
Sugar ½ teaspoon
Salt to taste
Instructions
1. Mix all ingredients except black sesame seeds. Keep in refrigerator to chill.
2. Just before serving add sesame seeds and mix.
3. Serve chilled.
Note
1. You can replace Piri Piri Powder with Crushed Green Chili or Red Chili Powder.
===================================================================================
कच्च्या पपईचं सॅलड – पिरी पिरी मसाला घालून
ही माझी स्वतःची रेसिपी आहे. सॅलड बनवायला अगदी सोपं आहे. काही वर्षांपूर्वी पर्यंत मी कच्ची पपई वापरत नव्हते. माझ्या मुलाला फरसाण सोबत देतात ती पपईची चटणी खूप आवडते. म्हणून मी पपई वापरायला लागले. माहिती वाचली तेव्हा समजलं की कच्ची पपई खूप पौष्टिक असते. मग मी आणखी काही रेसिपीज बनवल्या. हे सॅलड त्यातलंच एक.
ह्यात मी पिरी पिरी मसाला घालते. मॅकडॉनल्ड्स मध्ये फ्रेंच फ्राईज सोबत मिळते तीच ही पिरी पिरी मसाला पावडर. पिरी पिरी मसाला हा साऊथ आफ्रिकन मसाला आहे. तिखट आणि किंचित गोड अशी चव असते. भारतात केया फूड्स ब्रँड चा मसाला कुठल्याही किराणा दुकानात, सुपर मार्केट मध्ये मिळतो. हा मसाला नसेल तर ठेचलेली हिरवी मिरची किंवा लाल तिखट वापरू शकता.
आपण मराठी माणसं सहसा काळे तीळ खात नाही. पण भारताच्या इतर राज्यात काळे तीळ खाल्ले जातात. सॅलड वर भाजलेले काळे तीळ घातले तर छान लागतात. तुम्हाला पाहिजे तर तुम्ही पांढरे तीळ वापरू शकता.
साहित्य (३ जणांसाठी) (१ कप = २५० मिली)
सोलून किसलेल्या कच्च्या पपईचा कीस १ कप
भाजलेले शेंगदाणे २ टीस्पून
भाजलेले काळे तीळ अर्धा टीस्पून
पिरी पिरी मसाला १ टीस्पून (चवीनुसार कमी / जास्त करा)
कैरीचा कीस १ टीस्पून किंवा लिंबाचा रस अर्धा टीस्पून
चिरलेली कोथिंबीर १ टीस्पून
काळं मीठ पाव टीस्पून
साखर अर्धा टीस्पून
मीठ चवीनुसार
कृती
१. एका वाडग्यात काळे तीळ वगळून सर्व साहित्य घ्या. मिक्स करून फ्रिजमध्ये ठेवा.
२. हे सॅलड गारच छान लागतं. सर्व्ह करताना भाजलेले काळे तीळ सॅलड मध्ये घालून मिक्स करा.
३. हे चविष्ट आणि पौष्टिक सॅलड पोळी बरोबर खाऊ शकता किंवा असंच खाऊ शकता.
Your comments / feedback will help improve the recipes