Aambyache Saandan / Dhondas (आंब्याचं सांदण / धोंडस) – Steamed Mango Cake
This is a specialty from Konkan region in Maharashtra. In North Konkan, it’s called Saandan; in South Konkan, it’s called Dhondas (धोंडस). Mango Pulp is mixed with coarse rice flour along with fresh coconut and jaggery and batter is steamed. It is served with sweet coconut milk or home made ghee (clarified butter). It’s very healthy and tasty sweet. In Konkan, this is served as a part of meal like Puran Poli and not as a sweet dish. It’s an easy recipe. Try it out.
Ingredients (Serves 4) (1 cup = 250 ml)
Coarse Rice Flour / Idli Rawa 1 cup
Mango Pulp ½ cup
Fresh scraped coconut ½ cup
Crushed Jaggery ½ to ¾ cups (adjust as per taste)
Salt ¼ teaspoon
Cardamom Powder ¼ teaspoon
Saffron 3-4 strands soaked in warm milk
Pure Ghee (Clarified Butter) ½ teaspoon + for greasing
For Serving
Pure Ghee (Clarified Butter) or Coconut milk mixed with Jaggery, salt and cardamom powder
Instructions
1. In a pan, heat ½ teaspoon of ghee. Add Idli Rawa and roast it on low flame till it starts changing colour. Do not roast further.
2. Squeeze Mango to make Mango Pulp. Do not add anything to it. Remove any strings / fibre from the pulp.
3. Grind together fresh scraped coconut and crushed Jaggery just enough to mix it together. Do not make a fine paste.
4. Mix together Idli Rawa, Mango Pulp, coconut + Jaggery mixture, salt, cardamom powder and saffron. Make a thick batter with dropping consistency. Add Coconut Milk / Milk / water if required.
5. Keep the mixture covered for 2 hours. Batter will now be thick. Add Coconut Milk / Milk / water to make it of dropping consistency again.
6. Boil water in a steamer. Grease a steaming plate with ghee. Pour the mixture in the greased plate to form about a cm thick layer; tap the plate to make a uniform layer. Steam for 15-20 minutes. Check if the batter is cooked properly by using a knife/ toothpick.
7. Leave the plate to come to room temperature. Cut into pieces of desired size.
8. Serve along with sweet coconut milk and / or pure ghee. It taste yummy.
Note
- You can make Saandan using Cucumber or Jackfruit also.
- You can add a pinch of baking soda to the batter before steaming.
==================================================================================
आंब्याचे सांदण / धोंडस (Mango Cake) – कोकणची स्पेशालिटी
हा कोकणातला खास पदार्थ आहे. आंब्याच्या मोसमात एक दोनदा तरी झालाच पाहिजे असा हा पदार्थ. कोकणी पदार्थ म्हटला की नारळ तर हवाच. गोडीसाठी गूळ किंवा साखर. मग पदार्थ स्वादिष्ट होणारच नाही का !
आंब्याचा गर, नारळ , गूळ / साखर आणि तांदुळाचा रवा एकत्र भिजवून वाफवतात. खमंग सांदण नारळाच्या गोड रसासोबत / तुपासोबत खातात. खूप चविष्ट आणि पौष्टिक पदार्थ आहे. रेसिपि पण अगदी सोपी आहे.
साहित्य (४ जणांसाठी ) (१ कप = २५० मिली)
इडली रवा १ कप
आंब्याचा गर अर्धा कप
ताजा खवलेला नारळ अर्धा कप
चिरलेला गूळ अर्धा ते पाऊण कप
केशर ३–४ काड्या दुधात भिजवून
वेलची पूड पाव टीस्पून
साजूक तूप अर्धा टीस्पून आणि थाळीला लावायला
मीठ चवीनुसार
खायला देताना
नारळाचा गूळ, वेलची घातलेला गोड रस / तूप
कृती
१. अर्धा चमचा तूप घालून घालून इडली रवा भाजून घ्या. जरा रंग बदलला की गॅस बंद करा.
२. आंब्याचा रस काढून घ्या. पाणी घालू नका. रेषा / दोरे असतील तर काढून टाका.
३. नारळ आणि गूळ मिक्सर मध्ये एकत्र करून घ्या. फार बारीक वाटू नका .
४. आता रवा, आंब्याचा गर, नारळ, गूळ, केशर, वेलची आणि मीठ एकत्र करा. इडलीच्या पिठासारखं भिजवा.जरूर पडल्यास थोडं नारळाचं दूध किंवा साधं दूध किंवा पाणी घाला.
५. २ तास झाकून ठेवा.
६. आता मिश्रण फुगेल. परत थोडं नारळाचं दूध किंवा साधं दूध किंवा पाणी घालून इडलीच्या पिठाएवढं पातळ करा.
७. इडली पात्रात पाणी गरम करा. एका थाळीला तूप लावून त्यात मिश्रणाचा १ सेमी जाडीचा थर द्या.
८. १५–२० मिनिटं वाफवून घ्या.
९. गार झाल्यावर वड्या पाडा. आंब्याचं स्वादिष्ट सांदण नारळाच्या गोड रसासोबत/ तुपासोबत खायला द्या.
टीप
१. असंच फणस, काकडी (तवसे) घालून सांदण करता येतं.
२. हवं असेल तर पीठ वाफवायच्या आधी चिमूटभर खायचा सोडा घालू शकता.
Your comments / feedback will help improve the recipes