Mulyachya Palyache Theple (मुळ्याच्या पाल्याचे ठेपले) – Radish Greens Thepla / Spicy Roti
मुळ्याच्या पाल्याचे ठेपले मराठी
Methi Thepla is very common and popular. I also make Thepla using Radish Greens. It does not have any spice other than Carom Seeds (Ajwain) and Chilly Powder. But these Theplas are very tasty. It would be a good change from standard Methi Thepla.
Ingredients (For 15-18 Theplas)
Finely Chopped Radish Greens 2 cup (In addition you can also add some grated radish if you like)
Wheat Flour 1-2 cups as required
Curd 1 tablespoon
Fresh Cream (Malai) 1 tablespoon
Chilly paste ½ teaspoon
Carom Seeds (Ajwain) 1 teaspoon
Chilly Powder ½ teaspoon
Turmeric Powder ½ teaspoon
Sesame Seeds 1 tablespoon
Oil 2 tablespoon + as required for roasting Theplas
Salt to taste
Sugar 1 teaspoon
Instructions
1. Mix All ingredients except wheat flour. Mix together and rest it for 30 minutes. Mixture will release water.
2. Add Wheat flour and bind medium consistency dough. As far as possible do not add water.
3. Rest the dough for 10 minutes.
4. Knead the dough for 3-4 minutes.
5. Take big lemon size balls of dough and roll round Theplas little thicker than Chapati. Use Wheat flour for dusting.
6. Roast Theplas on hot tava on medium flame. Put a few drops of oil while roasting.
7. Serve Theplas with Chutney of your choice and curd / home made butter.
==================================================================================
मुळ्याच्या पाल्याचे ठेपले मराठी
मेथीचे ठेपले तुम्ही नेहमीच बनवत असाल. मी मुळ्याच्या पाल्याचे ठेपले ही बनवते . ओवा, हिरवी मिरची आणि लाल मिरची एवढाच मसाला घातलेले हे ठेपले खूप छान लागतात. ठेपले नरम होण्यासाठी त्यात थोडी दुधाची साय आणि दही घालतात. भाजीत सगळे मसाले आणि साय, दही घालून चांगलं मिक्स करून अर्धा तास झाकून ठेवा. मिश्रणाला पाणी सुटेल. त्या पाण्यात मावेल तेवढी कणिक घालून पीठ भिजवून, चांगलं मळून ठेपले करायचे. मस्त मऊ आणि चविष्ट होतात.
साहित्य (१५–१८ ठेपल्यांसाठी)
बारीक चिरलेला मुळ्याचा पाला २ कप (थोडा किसलेला मुळा ही घालू शकता)
कणिक १ – २ कप (आवश्यकतेनुसार)
दही १ टेबलस्पून
दुधाची साय १ टेबलस्पून
ठेचलेली हिरवी मिरची अर्धा चमचा
ओवा १ चमचा
लाल तिखट अर्धा चमचा
हळद अर्धा चमचा
तीळ १ टेबलस्पून
तेल २ टेबलस्पून + ठेपले भाजायला
मीठ चवीनुसार
साखर १ चमचा
कृती
१. कणिक वगळून सगळे पदार्थ एकत्र करून छान मिक्स करून घ्या. झाकण ठेवून अर्धा तास ठेवून द्या.
२. मिश्रणाला पाणी सुटेल. त्यात मावेल तेवढी कणिक घालून मध्यम घट्ट पीठ भिजवा.
३. १० मिनिटानंतर पीठ ३–४ मिनिटं मळून घ्या.
४. पिठाचे मोठ्या लिंबाच्या आकाराचे गोळे करून ठेपले लाटून घ्या. पोळीपेक्षा जरा जाड लाटा. गरम तव्यावर थोडं तेल घालून मध्यम आचेवर ठेपले दोन्ही बाजूनी भाजून घ्या.
५. गरमागरम ठेपले चटणी, दही / लोण्याबरोबर खायला द्या.