Tikhat Shira / Tikhat Mithacha Shira / Tikhat Mithacha Sanja (तिखट शिरा / तिखटमिठाचा शिरा / तिखटमिठाचा सांजा)

Tikhatmithacha Shira (तिखटमिठाचा शिरा)

Tikhat Shira / Tikhat Mithacha Shira / Tikhat Mithacha Sanja (तिखट शिरा / तिखटमिठाचा शिरा / तिखटमिठाचा सांजा)

तिखट शिरा / तिखटमिठाचा शिरा / तिखटमिठाचा सांजा मराठी

This is a Maharashtrian snack made of Semolina. Younger generation may not know about this because this is not available in restaurants – not even those restaurants that specialize in Maharashtrian cuisine. It is different than Upma. It is not sweet like Upma. But it’s very tasty, Quick, Healthy and No onion / Garlic Snack.

While making this Shira, My mother used to add a teaspoon of Pure Ghee (Clarified Butter) in the end. It gives a nice aroma of Pure Ghee to the Shira.

What is the difference between Upma and Tikhat Shira / Sanja?

For Upma, Pure Ghee (Clarified Butter) is used for tempering. Split Black Gram (Udid Dal) is added to tempering; Turmeric Powder is not added. It has little more sugar than Tikhat Shira.

For Tikhat Shira / Sanja, Oil is used for tempering. Split Black Gram (Udid Dal) is not used. Turmeric powder is added and sugar is added just for taste.

Hence the taste of Upma and that of Tikhat Shira / Sanja are different.

Important Tips

1. Although this is an easy recipe, there are 3 important things in this.

2. Roast Semolina on low flame till you get nice aroma. If Semolina is not roasted properly, Shira will be sticky.

3. The amount of water required is very important. Generally for coarse Semolina 3 times water is required. But if Semolina is not coarse (medium coarse), you will require less water. Ensure that water is boiling when you add semolina. Reduce the flame to low before adding semolina. Else lumps will form.

4. The amount of Turmeric Powder to be added to Shira depends on how strong your turmeric powder is. Add Turmeric Powder in the water and not in the oil. This gives nice bright yellow colour to Shira. If you add more Turmeric, Shira will be dark.

Ingredients (Serves 4) (1 cup = 250 ml)

Coarse Semolina (Jada Rava) 1 cup

Green Chilly Paste ¾ teaspoon

Curry Leaves 8-10

Fresh Scraped Coconut 1 tablespoon

Chopped Coriander 1 tablespoon

Sugar ½ –1 teaspoon (adjust as per taste)

Pure Ghee (clarified butter) 1 teaspoon

Lemon Juice ½ teaspoon

Oil 1 teaspoon

Mustard Seeds ¼ teaspoon

Cumin Seeds ¼ teaspoon

Turmeric Powder ¼ teaspoon

Asafoetida a pinch

Salt to taste

Instructions

1. In a pan, dry roast coarse Semolina, on low flame, till light brown and you get nice aroma of roasted Semolina.

2. Heat oil in a pan on medium flame.

3. Add mustard seeds, wait for sputter; Add Cumin Seeds, wait for splutter; add Asafoetida.

4. Add green chilly paste and curry leaves.

5. Add 3 cups water.

6. Add Turmeric Powder, Salt, Sugar, Lemon Juice and bring water to boil.

7. Add roasted Semolina. Immediately stir to ensure there are no lumps formed.

8. Cover with a lid and cook for 4-5 minutes on low flame.

9. Add fresh scraped coconut, chopped coriander and pure Ghee. Mix.

10. Cover and cook for 1-2 minutes. Delicious Tikhat Shira is ready.

11. Garnish with some fresh scraped coconut and chopped coriander. Serve hot.

Notes

1. You can add Onions to this. Add Chopped onions in step 4 and sauté till translucent; then add water and follow rest of the steps in the recipe.

2. You can also add vegetables like Green Peas / Carrots (chopped into small pieces). Add these in step 4; cover and cook for 2-3 minutes and then add water and follow rest of the steps in the recipe.

Tikhatmithacha Shira (तिखटमिठाचा शिरा)
Tikhatmithacha Shira (तिखटमिठाचा शिरा)
Tikhatmithacha Shira (तिखटमिठाचा शिरा)
       ==================================================================================

तिखट शिरा / तिखटमिठाचा शिरा / तिखटमिठाचा सांजा

हा अतिशय चविष्ट, पौष्टिक महाराष्ट्रीयन पदार्थ हल्ली जरा विस्मृतीत गेल्यासारखा झालाय. महाराष्ट्रीयन उपाहारगृहात सुद्धा हा दिसत नाही. याची जागा उपम्यानं घेतलीय. पण मला तर हा शिरा उपम्यापेक्षा टेस्टी लागतो. आणि मुख्य म्हणजे तो उपम्यासारखा गोडसर नसतो साखर घालतात पण फक्त चवीपुरतीउपम्याऐवजी हा शिरा एकदा करून पहा. छान लागतोशिरा होत आला की माझी आई त्यात १ चमचा साजूक तूप घालून वाफ काढायची. शिऱ्याला साजूक तुपाचा छान स्वाद येतोमी हा शिरा कांदा लसूण न घालता करते

उपमा आणि तिखट शिरा / सांजा मध्ये काय फरक आहे?

उपम्यात तुपाची फोडणी असते; फोडणीत उडीद डाळ घालतात. उपम्यात हळद घालत नाहीत आणि साखर जरा जास्त असते.

तिखट शिरा / सांजा करताना तेलाची फोडणी देतात. उडीद डाळ घालत नाहीत. आणि हळद घालतात. साखर फक्त चवीपुरती असते.

त्यामुळे उपमा आणि तिखट शिरा / सांजा चवीला वेगळे लागतात

महत्त्वाच्या टिप्स

. ही रेसिपि जरी अगदी सोपी असली तरी ३ गोष्टी महत्त्वाच्या आहेत.

. रवा मंद आचेवर खमंग भाजला पाहिजे. रवा कमी भाजला तर रवा  फुलत नाही आणि शिरा चिकट होतो.

. रव्यात हवं तेवढंच पाणी घालावं. साधारणपणे जाड्या रव्याला ३ पट पाणी लागतं. पण रवा तेवढा जाड नसेल तर पाणी कमी लागेल. पाणी चांगलं उकळल्यावर गॅस बारीक करून रवा घाला म्हणजे गुठळ्या होणार नाहीत.

. शिऱ्यात हळद किती घालावी हे तुमची हळद किती चांगली आहे ह्यावर अवलंबून आहे. शिऱ्यासाठी हळद फोडणीत न घालता पाण्यात घालावी म्हणजे शिऱ्याला रंग छान येतो. हळद जास्त झाली तर शिरा काळपट होतो

साहित्य (४ जणांसाठी) (१ कप = २५० मिली )

जाडा रवा १ कप

ठेचलेली हिरवी मिरची पाऊण चमचा

कढीपत्ता ८१०

ताजा खवलेला नारळ १ टेबलस्पून

चिरलेली कोथिंबीर १ टेबलस्पून

साखर अर्धा एक चमचा (चवीनुसार कमी/जास्त करा)

साजूक तूप १ चमचा

लिंबाचा रस अर्धा चमचा

तेल १ चमचा

मोहरी पाव चमचा

जिरं पाव चमचा

हिंग चिमूटभर

हळद पाव चमचा

मीठ चवीनुसार

कृती

. रवा मंद आचेवर खमंग भाजून घ्या.

. एका कढईत तेल गरम करून मोहरी, जिरं, हिंगाची फोडणी करा.

. त्यात ठेचलेली हिरवी मिरची आणि कढीपत्ता घाला.

. त्यात ३ कप पाणी घाला

. पाण्यात हळद, मीठ, साखर आणि लिंबाचा रस घालून पाण्याला उकळी आणा.

. गॅस बारीक करून भाजलेला रवा घाला. लगेच ढवळून घ्या; गुठळ्या होऊ देऊ नका.

. झाकण ठेवून मंद गॅसवर ४५ मिनिटं शिजवा.

. खवलेला नारळ, कोथींबीर आणि साजूक तूप घालून मिक्स करा आणि झाकण ठेवून २ मिनिटं वाफ काढा.

. चविष्ट आणि पौष्टिक तिखट शिरा तयार आहे.

१०. वरून नारळ, कोथिंबीर घालून गरमागरम शिरा सर्व्ह करा

टीप

. ह्या शिऱ्यात तुम्ही कांदा घालू शकता. बारीक चिरलेला कांदा स्टेप ३ मध्ये घाला. मऊ होईपर्यंत शिजवा आणि नंतर पाणी घालून पुढची कृती करा.

. ह्या शिऱ्यात तुम्ही मटारचे दाणे / बारीक चिरलेलं गाजर घालू शकता. स्टेप ३ मध्ये ह्या गोष्टी घालून पाणी न घालता एक वाफ काढा आणि नंतर पाणी घालून पुढची कृती करा.    

Tikhatmithacha Shira (तिखटमिठाचा शिरा)
Tikhatmithacha Shira (तिखटमिठाचा शिरा)
Tikhatmithacha Shira (तिखटमिठाचा शिरा)

2 Comments

  1. ह्यामध्ये लाल तिखट घालून चालते का? असल्यास फोडणीत घालावे की पाण्यात घालावे?

Your comments / feedback will help improve the recipes