Alivachi Kheer (अळिवाची खीर) – Halim / Haliv / Garden Cress Seeds Porridge
This is a Maharashtrian recipe of delicious Kheer. Aliv is an excellent source of iron. 100gms of Aliv provides 100mg of iron. Nutritionists recommend spoon of Aliv to be included in your daily diet. Celebrity nutritionist Rujuta Divekar calls Aliv as one of the Indian Superfoods. This Kheer can be a good substitute for a glass of plain milk in your breakfast. This Kheer can be eaten for fasting as well. This is a traditional recipe. My Grandmother, Mother used to make Kheer like this.
Ingredients (for about 4 cups)
Aliv / Halim seeds 1 tablespoon
Milk ½ ltr
Sugar 4 teaspoons (adjust as per your taste)
Cardamom Powder a pinch
Instructions
1. Soak Aliv seeds in ½ cup water for 30 minutes. Aliv expands when soaked; so use a bigger bowl for soaking and add water if water gets soaked. Soaked Aliv looks like soaked Subja.
2. Boil milk and keep boiling for 7-8 minutes on low flame.
3. Add soaked Aliv. Mix well and keep cooking for 5 minutes. Kheer will start getting thicker.
4. Add Sugar and cook for another 5 minutes. Add Cardamon Powder. Kheer should not be thick. Consistency should be little thicker than Masala Milk.
5. Delicious Aliv Kheer is ready. Serve hot.
Tip
1. You can add dry fruits to this Kheer. But it tastes awesome without dry fruits also.
===================================================================================
अळिवाची खीर
अळीव म्हणजे हलिम , हलिव, Garden Cress Seeds. हा सब्जा नाही आणि जवस / अळशी ही नाही. पोस्टमध्ये अळिवाचा फोटो दिलाय.
अळिवाचे लाडू, अळिवाची खीर फक्त बाळंतिणीनंच खावे असं नाही. अळीव खूप पौष्टिक असतात. प्रत्येकाने रोज एक चमचा अळीव खावे असं nutritionists सांगतात. ही पौष्टिक आणि स्वादिष्ट खीर तुम्ही दुधाऐवजी घेऊ शकता. ही उपासालाही चालते. रेसिपी अगदी सोपी आहे. ही पारंपारिक रेसिपी आहे. माझी आजी, आई अशी खीर बनवायची. थंडीच्या दिवसात गरमागरम खीर प्यायला खूपच छान लागते.
साहित्य (अंदाजे ४ कपांसाठी)
अळीव १ टेबलस्पून
दूध अर्धा लिटर (फुल क्रिम घेतलं तर चांगले )
साखर ४–५ चमचे (चवीप्रमाणे कमी / जास्त करा)
वेलची पूड पाव चमचा
कृती
१. अळीव अर्धा कप पाण्यात अर्धा तास भिजवा. अळीव भिजवल्यावर फुगतात. म्हणून जरा मोठ्या बाउल मध्ये भिजवा. भिजवलेलं अळीव भिजवलेल्या सब्जा सारखं दिसतं.
२. दुधाला उकळी आणून ७–८ मिनिटं मंद आचेवर आटवा.
३. त्यात भिजलेले अळीव घालून ढवळा. ५ मिनिटं उकळा.
४. साखर घालून परत ५ मिनिटं उकळा. वेलची पूड घाला. ही खीर फार दाट नसते. मसाला दुधापेक्षा जराशी दाट असते.
५. अळिवाची स्वादिष्ट खीर तयार आहे. गरमागरम खीर सर्व्ह करा.
टीप
१. ह्यात तुम्ही सुके मेवे पण घालू शकता. पण सुक्या मेव्याशिवाय सुद्धा खूप छान लागते.
Very good…
Thank you.