Corn Omlet ( मक्याचे ऑम्लेट) – Sweet Corn Savory Pan Cake
Corn Omlet is inspired by Tomato Omlet – a popular Indian Snack. It’s a vegetarian snack. This is my original recipe. As the name suggests, Sweet corn is the Hero ingredient in this Omlet. I also add some Maize Flour (Cornmeal) to make it more corny. It is very delicious, healthy and filling. It can be a quick and easy breakfast item, good way to start the day. I add some Garlic and carom (Ajwain) seeds for the flavor.
Ingredients (Makes 8-9 Omlets) (1 cup = 250 ml)
Sweet Corn Kernels 2 cups
Maize Flour (Cornmeal) ½ cup (Flour that is used for Makai Roti)
Tomatoes 1 medium size
Onions 2 medium size
Garlic cloves 6-7 finely chopped
Bengal Gram flour (Besan) ½ cup
Rice Flour 2 tablespoon
Fine Semolina 2 tablespoon
Green Chilies 2-3
Carom Seeds (Ajwain) 1 teaspoon
Turmeric Powder ½ teaspoon
Chopped Coriander 2 teaspoon
Salt to taste
Oil / Butter / Ghee (Clarified Butter) for pan frying
Instructions
1. Finely chop Tomatoes and Onions.
2. Grind Sweet Corn Kernels along with Green Chilies into a little coarse paste. Add little water if required.
3. In a bowl, Mix all ingredients except Oil / Ghee / Butter. Add water to make a medium consistency spreadable batter. Rest the batter for 10 minutes.
4. Heat a non-stick / iron Griddle. Grease Iron griddle with some oil. Turn the gas to medium flame. Pour ¼ cup of batter on the griddle and spread it evenly.
5. Cover the griddle and cook for about 2 minutes. This Omlet cooks faster than tomato Omlet because of the sweet corn.
6. Remove the cover. If you see wet batter on the top on Omlet. Cook for a few more minutes. Pour a few drops of oil / ghee/ butter along the edges of Corn Omlet.
7. Flip the Omlet and cook the other side without cover.
8. When both sides are cooked, Corn Omlet is ready.
9. Serve hot with coriander chutney and /or tomato sauce. It tastes awesome with home made butter.
===================================================================================
मक्याचे ऑम्लेट
हे ऑम्लेट टोमॅटो ऑम्लेट वरून स्फूर्ती घेऊन बनवलं आहे. ही माझी स्वतःची रेसिपी आहे. मक्याचे दाणे (स्वीट कॉर्न ) आणि मक्याचं पीठ (जे भाकरी करायला वापरतो) वापरून हे ऑम्लेट बनवलं आहे. बाकी साहित्य घरात नेहमी असणारंच आहे. पटकन बनवता येणार हेल्दी, पोटभरीचा असतो. ह्यात मी चवीसाठी हिरवी मिरची, लसूण आणि ओवा घातलाय.
साहित्य (८–९ ऑम्लेट साठी) (१ कप = २५० मिली )
मक्याचे दाणे (स्वीट कॉर्न) २ कप
मक्याचं पीठ अर्धा कप
टोमॅटो १ मध्यम
कांदे २ मध्यम
लसूण ६–७ बारीक चिरून
हिरव्या मिरच्या २–३
ओवा १ चमचा
बेसन अर्धा कप
तांदुळाचं पीठ २ टेबलस्पून
बारीक रवा २ टेबलस्पून
हळद अर्धा चमचा (हळद जास्त झाली तर रंग काळपट येतो)
चिरलेली कोथिंबीर २ चमचे
मीठ चवीनुसार
तेल/ तूप / बटर ऑम्लेट भाजायला
कृती
१. टोमॅटो आणि कांदे बारीक चिरून घ्या.
२. मक्याचे दाणे आणि हिरव्या मिरच्या मिक्सर मध्ये किंचित जाडसर वाटून घ्या. जरूर पडल्यास थोडं पाणी घाला.
३. एका वाडग्यामध्ये वरील सर्व साहित्य (तेल / तूप / बटर वगळून ) मिक्स करा.
४. थोडं थोडं पाणी घालून मध्यम पातळ पीठ भिजवा (भज्यांच्या पिठासारखं ). पीठ १० मिनिटं झाकून ठेवा.
५. नॉन स्टिक / लोखंडी तवा गरम करून घ्या. लोखंडी तव्यावर थोडं तेल घालून पसरा.
६. गॅस मध्यम करून पाव कप पीठ तव्यावर ओता. ओतताना कप गोल फिरवा आणि हाताने पीठ सारखं करा.
७. झाकण ठेवून २ मिनिटं भाजा. झाकण काढून बघा. ओलं पीठ ऑम्लेट वर दिसत असेल तर परत मिनिट भाजा. हे ऑम्लेट टोमॅटो ऑम्लेट पेक्षा लवकर भाजलं जातं.
८. कडेनी थोडं तूप / तेल / बटर सोडा.
९. ऑम्लेट परतून दुसरी बाजू झाकण न ठेवता भाजून घ्या.
१०.मक्याचे गरमगरम ऑम्लेट चटणी / सॉस बरोबर खायला द्या. लोण्याबरोबर हे ऑम्लेट अप्रतिम लागते.
Your comments / feedback will help improve the recipes