Dalia Shira / Lapsi Rava Shira (दलिया शिरा/ लापशी रव्याचा शिरा) – Broken Wheat Porridge
दलिया शिरा – लापशी रव्याचा शिरा मराठी
Dalia / Lapsi Rava is broken wheat or cracked wheat. This is easily available in market. It’s very nutritious. There are different ways to make Dalia Shira. I use Jaggery in this recipe since it is a better option that Sugar. I add Dink (edible gum / gond) to make it more nutritious and tasty. It’s fairly easy recipe and the outcome is super delicious.
Ingredients (Serves 8) (1 cup = 250 ml)
Dalia 1 cup
Jaggery Crushed ¾ cup to 1 cup (as per the sweetness required)
Ghee (Clarified Butter) 3 tablespoons
Dink / Edible gum / Gond 2 tablespoon
Milk ¼ cup
Cashew nuts 10-12
Almonds 8-10
Saffron a pinch
Cardamom powder ¼ teaspoon
Salt a pinch (optional)
Instructions
1. Soak almonds in hot water for 30 minutes; peel and slice them; soak Saffron in warm water
2. In a thick bottom pan, add 2 teaspoon of ghee.
3. Add Edible Gum and fry it on low flame stirring continuously till it turns light brown.
4. Take it out in a plate. Leave it to cool.
5. In the same ghee, fry cashew nuts till light brown and take them out in another plate.
6. In the same pan, add 2 tablespoon of ghee; add Dalia and roast it on low flame till it becomes light brown. Keep stirring all the time. Roasting is an important step in this recipe.
7. Simultaneously boil 3.5 cups of water and milk separately.
8. Add water and milk to Dalia and stir well. Cook covered till Dalia is soft. Add water as required. If Dalia is coarse, you will need more water. Dalia should be properly cooked and soft; else Shira will not have right texture.
9. When Dalia is cooked, add Jaggery and mix well.
10. When Jaggery is completely mixed with Dalia, keep cooking till you get required consistency of Shira.
11. Add Fried Edible Gum, Cashew, Almond, Saffron, Cardamom powder and salt (optional) and mix
12. Finally add 1 teaspoon of Ghee and mix.
13. Delicious Dalia Shira is ready. Enjoy.
===================================================================================
दलिया शिरा / लापशी रव्याचा शिरा
दलिया / लापशी रवा म्हणजे गव्हाचा रवा. हा किराणा दुकानात मिळतो. खूप पौष्टिक असतो हा रवा. मी ह्या शिऱ्यामध्ये गूळ घालते (साखरेपेक्षा चांगला) आणि डिंक तळून घालते. मस्त खमंग आणि स्वादिष्ट बनतो हा शिरा. नेहमीच्या शिऱ्यापेक्षा चवीला छान लागतो. टेक्सचर पण रवाळ असतं. रेसिपी सोपी आहे.
साहित्य (८ जणांसाठी) (१ कप = २५० मिली )
दलिया १ कप
चिरलेला गूळ पाऊण ते १ कप (शिरा जसा गोड हवा असेल त्याप्रमाणे घाला)
साजूक तूप ३ टेबलस्पून
डिंक २ टेबलस्पून
दूध पाव कप
काजू १०–१२
बदाम ८–१०
केशर ४–५ काड्या
वेलची पूड पाव चमचा
मीठ चिमूटभर (ऐच्छिक)
कृती
१. बदाम गरम पाण्यात अर्धा तास भिजवून सोलून बारीक काप करा. केशर चमचाभर पाण्यात भिजवा.
२. एका कढईत २ चमचे तूप घालून त्यात डिंक मंद आचेवर तळून घ्या. ताटलीत काढून घ्या.
३. त्याच तुपात काजूचे तुकडे तळून वेगळे काढून ठेवा.
४. त्याच कढईत २ टेबलस्पून तूप घालून दलिया मंद आचेवर गुलाबी रंगावर भाजून घ्या.
५. साडेतीन कप पाणी गरम करा. दूध ही वेगळे गरम करा.
६. पाणी आणि दूध उकळलं की दलियात घाला. ढवळा. झाकण ठेवून दलिया नरम होईपर्यंत शिजवा. हवं असेल तर आणखी पाणी घाला. दलिया जाड असेल तर पाणी जास्त लागते.
७. दलिया शिजला की गूळ घालून ढवळा. शिरा जेवढा घट्ट हवा असेल तेवढा शिजवा.
८. गूळ वितळला की तळलेला डिंक घाला. केशर, बदाम, काजू,वेलची पूड आणि मीठ घालून ढवळा.
९. १ चमचा तूप चालून ढवळा.
१०. स्वादिष्ट दलिया शिरा तयार आहे. गरमागरम शिऱ्याचा आनंद घ्या.
Your comments / feedback will help improve the recipes