Godache Fov (गोडाचे फोव / गोड पोहे) – Sweet Poha / Sweet Flattened Rice (Requires NO Cooking)
This is a quick and easy Goan recipe using Poha / Flattened Rice, Jaggery and fresh coconut. This does not require any cooking. It takes 10 minutes to prepare this dish. This is a healthy and delicious snack or breakfast dish. Sometimes I improve this traditional recipe with tempering of Sesame seeds. This makes Poha more delicious.
Ingredients (Serves 3) (1 cup = 250 ml)
Thick Poha (Jada or Basmati or Red) 1 cup
Finely Crushed Jaggery ½ cup or as per taste
Crushed Green Chilies ½ teaspoon
Fresh scraped coconut ½ cup
Lemon juice ½ teaspoon
Chopped coriander 1 teaspoon
Salt to taste
Instructions
1. Wash Poha and drain water. Wait for 5 minutes.
2. Add crushed Jaggery, Scraped coconut, Crushed chillies, Lemon juice, chopped coriander and Salt.
3. Mix well such that Jaggery mixes well with Poha.
4. Delicious Sweet Poha is ready.
My Improvisation to this traditional recipe
Heat 1 teaspoon Pure Ghee (Clarified Butter) in a ladle; add ¼ teaspoon cumin seeds, wait for splutter; add a pinch of Asafoetida; add 1 teaspoon of White Sesame Seeds; immediately cover the ladle to prevent sesame seeds spluttering everywhere. After ½ a minute switch off the gas and pour this ghee onto Poha Prepared above. Mix and serve.
Note
1. Do not use dessicated coconut for this dish. It will not taste good.
===================================================================================
गोडाचे फोव / गोड पोहे
ही गोव्याकडची पारंपारिक रेसिपी आहे. काहीही कूकिंग न करता पटकन होणारा हा स्वादिष्ट पदार्थ ब्रेकफास्ट / नाश्त्यासाठी उत्तम पर्याय आहे. ह्यात पोहे, गूळ आणि नारळ वापरला जातो.
मी कधी कधी पारंपारिक रेसिपीत थोडा बदल करून पोह्यांवर तिळाची फोडणी घालते. त्यामुळे पोहे आणखी स्वादिष्ट लागतात.
साहित्य (३ जणांसाठी) (१ कप = २५० मिली )
जाड पोहे / बासमती पोहे / लाल गावठी पोहे १ कप
बारीक चिरलेला गूळ अर्धा कप (चवीप्रमाणे कमी / जास्त करा)
ताजा खवलेला नारळ अर्धा कप
ठेचलेली मिरची अर्धा टीस्पून
लिंबाचा रस अर्धा टीस्पून
चिरलेली कोथिंबीर १ टीस्पून
मीठ चविनुसार
कृती
१. पोहे धुवून पाणी निथळून टाका.
२. ५ मिनिटांनंतर पोह्यात गूळ, नारळ, कोथिंबीर, मिरची, मीठ आणि लिंबाचा रस घालून चांगलं मिक्स करा.
३. स्वादिष्ट गोडाचे पोहे तयार आहेत.
पारंपारिक रेसिपी त माझा बदल
एका पळीत एक चमचा साजूक तूप घेऊन जिरं, हिंगाची फोडणी करा. त्यात एक चमचा पांढरे तीळ घाला. लगेच झाकण ठेवा नाहीतर तीळ सगळीकडे उडतात. अर्ध्या मिनिटांनी गॅस बंद करा आणि ही फोडणी तयार पोह्यांवर ओतून मिक्स करा. पोहे आणखी स्वादिष्ट लागतात.
टीप
१. ह्या रेसिपी त डेसिकेटेड कोकोनट वापरू नका. पोहे चविष्ट होणार नाहीत.
Hi..tai…nice recipe..plz share recipes for toddlers… (2 or 3yrs chids)
Thank you Priyanka. I’ll try to share recipes that you want.\nSudha