Olya Valachi Usal (ओल्या वालाची – पावटा – उसळ) – Fresh Field Beans Subji
ओल्या वालाची – पावटा- उसळ मराठी
This is an easy, non spicy, quick and tasty recipe of Fresh Val (field beans). In winter Val Pods (valachya shenga) are available in market. These beans are little bitter. So Jaggery is added to reduce the bitterness. This is no onion, garlic recipe.
Ingredients (Serves 4)
Valachya Shenga (Field Beans Pods) 1 kilogram
Green Chilly Paste ½ teaspoon
Jaggery 1 tablespoon (adjust as per taste)
Scraped Fresh Coconut 2 tablespoon
Chopped Coriander 1 tablespoon
Salt to taste
For Tempering
Oil 1 teaspoon
Mustard Seeds ¼ teaspoon
Cumin Seeds (Jeera) ¼ teaspoon
Turmeric Powder ¼ teaspoon
Asafoetida a pinch
Instructions
1. Remove Valache Daane (beans) from Valachya Shenga (pods) and wash them.
2. Heat oil in a pan on medium flame.
3. Add mustard seeds, wait for splutter; add Cumin Seeds, wait for sputter.
4. Add Turmeric Powder, Asafoetida and Green Chilly Paste.
5. Add beans, sauté for 2-3 minutes and cook covered for 3-4 minutes without adding water.
6. Add hot water enough to cover ¾ of the beans; bring it to boil. Turn flame to low and cook covered till beans are soft. Add water if required.
7. Add Jaggery, Scraped Coconut, Chopped Coriander and salt.
8. Cook to 2-3 minutes. Adjust consistency by adding water if required. This Usal does not have much gravy.
9. Serve hot with Roti (Indian Bread) / Rice.
===================================================================================
ओल्या वालाची (पावटा) उसळ
हिवाळ्यात वालाच्या (पावट्याच्या) शेंगा मिळतात. त्या दाण्यांची उसळ फार छान होते. हे दाणे चवीला जरा कडवट असतात. गूळ घालून त्याचा कडवटपणा कमी करतात. हिरवी मिरची, नारळ, कोथिंबीर आणि फोडणी. बस एवढंच. आणखी काही मसाला नसतो. अगदी सोपी रेसिपी आहे. कांदा लसूण न घालता केलेली ही ब्राह्मणी चवदार उसळ नक्की करून बघा.
कोणत्याही भाजीचा उग्र वास / उग्र चव कमी करण्यासाठी एक टीप – माझी आई असं करायची – भाजी फोडणीत घातल्यावर २-३ मिनिटं पाणी न घालता परतायची. आणि पाणी न घालता एक वाफ काढायची. नंतर गरम पाणी घालून शिजवायची. असं केल्याने भाजीचा उग्र वास / उग्र चव कमी होऊन भाजी चवदार होते.
साहित्य (४ जणांसाठी)
वालाच्या (पावट्याच्या) शेंगा १ किलो
ठेचलेली हिरवी मिरची अर्धा चमचा
गूळ १ टेबलस्पून (चवीप्रमाणे कमी / जास्त करा)
ताजा खवलेला नारळ २ टेबलस्पून
चिरलेली कोथिंबीर १ टेबलस्पून
मीठ चवीनुसार
फोडणीसाठी
तेल १ चमचा
मोहरी पाव चमचा
जिरं पाव चमचा
हळद पाव चमचा
हिंग १ चिमूट
कृती
१. वालाच्या शेंगांचे दाणे काढून धुवून घ्या.
२. एका पातेल्यात तेल गरम करून मोहरी, जिरं, हळद आणि हिंगाची फोडणी करा.
३. फोडणीत ठेचलेल्या हिरव्या मिरच्या घाला.
४. वालाचे दाणे घालून २–३ मिनिटं परतून घ्या.
५. झाकण ठेवून पाणी न घालता ३–४ मिनिटं वाफ काढा.
६. दाणे पाऊण बुडतील एवढं गरम पाणी घाला. मंद आचेवर झाकण ठेवून दाणे शिजवून घ्या. जसा रस हवा असेल त्याप्रमाणे पाणी घाला.
७. दाणे शिजल्यावर त्यात गूळ, नारळ, कोथिंबीर आणि मीठ घालून एक उकळी आणा.
८. चवदार उसळ तयार आहे. गरमागरम उसळ पोळी / भातासोबत खायला द्या.
Your comments / feedback will help improve the recipes