Tilache Kandi Laadoo (तिळाचे खमंग कंदी लाडू) – Sesame Seeds Soft Laddu
This is an easy recipe of Soft (नरम) Til Laadoos that anyone can eat. These are good for Elderly people as well as for children. In this recipe, all ingredients are ground together along with Jaggery and soft laddus are rolled. You don’t need to melt Jaggery for these laddus. These laddus look like Kandi Pedha (a famous Indian Sweet). Hence the name Kandi Laadoo. These laddus are made for Makar Sankranti (Kite Festival).
Ingredients (Makes 35-40 laddus) (1 cup = 250 ml)
White Sesame Seeds (Unpolished) 2 cup
Raw Groundnuts ¼ cup
Grated Dry Coconut (kopra) ¼ cup
Crushed Jaggery (Non chikki – non sticky) 1.75 to 2 cup (about)
Cardamom powder ¼ teaspoon
Ghee (Clarified Butter) 1 teapsoon (if required)
Instructions
1. Dry Roast sesame seeds on medium heat till light brown and keep aside.
2. Roast Groundnuts separately. Peel groundnuts after cooling.
3. Grate dry coconut and roast on medium heat till light brown.
4. Transfer Groundnuts to a Grinder and coarse grind it.
5. Add Sesame seeds, dry coconut and Jaggery to the grinder and grind into almost fine powder.
6. Take out the mixer to a plate. Roll small laddus. Mixer will be moist enough for rolling laddus. In case mixture is dry, add little Ghee (clarified butter) and roll laddus.
7. These laddus taste super delicious and can be stored for 3 weeks at room temperature.
===================================================================================
तिळाचे खमंग कंदी लाडू
ही तिळाच्या लाडवांची अतिशय सोपी रेसिपी आहे. खमंग नरम तिळाचे हे लाडू कंदी पेढ्यासारखे दिसतात म्हणून कंदी लाडू. ह्यात सगळे जिन्नस मिक्सरमध्ये बारीक करून लाडू बनवतात. गूळ गरम करावा लागत नाही त्यामुळे लाडू वळण्याची घाई गडबड नाही. आरामात लाडू वळता येतात. आणि नरम असल्यामुळे वृद्ध आप्तजनही आनंदाने हे लाडू खाऊ शकतात.
साहित्य (३५ – ४० लाडवांसाठी) (१ कप = २५० मिली )
साधे पांढरे तीळ (पॉलिश न केलेले) २ कप
भाजलेले शेंगदाणे पाव कप
किसलेलं सुकं खोबरं पाव कप
साधा गूळ (चिक्कीचा नाही) बारीक चिरून अंदाजे पावणेदोन – दोन कप
वेलची पूड पाव चमचा
तूप १ चमचा (लागलं तर)
कृती
१. तीळ मंद आचेवर खमंग भाजून घ्या. रंग जरा बदलला पाहिजे. ताटलीत काढून गार करा.
२. खोबरं मंद आचेवर गुलाबी रंगावर भाजून घ्या. ताटलीत काढून गार करा.
३. भाजलेले शेंगदाणे सोलून मिक्सर मध्ये जाडसर वाटून घ्या.
४. आता मिक्सरमध्ये शेंगदाण्याबरोबर तीळ, खोबरं आणि गूळ घाला आणि बारीक वाटून घ्या. मिश्रण जरा ओलसर होईल.
५. मिश्रण ताटलीत काढून लहान लहान लाडू वळा. जर मिश्रण सुकं झालं असेल तर त्यात थोडं तूप घालून मिक्स करा. आणि लाडू वळा.
६. तिळाचे खमंग कंदी लाडू तयार आहेत.
७. हे लाडू ३ आठवडे टिकतात.
Delicious healthy tasty ladoos recipe
Thank you Sangeeta.\nSudha