Tomato Upma (टोमॅटो उपमा) – Semolina Tomato Porridge
This is a popular breakfast / snack dish in India. It’s an easy recipe that makes yummy Upma. This is a No Onion Garlic recipe. But you can add Onions and any other veggies that you like.
Ingredients (Serves 4)
Semolina Coarse 1 cup
Tomatoes 2 medium finely chopped
Green Chillies 3-4 or Green Chilly Paste ½ teaspoon
Sugar 1.5 – 2 teaspoon (adjust as per taste)
Scrapped Fresh coconut 1 tablespoon
Chopped coriander 1 tablespoon
Cashew Nuts 8-10 chopped into medium size pieces
Pure Ghee (Clarified Butter) 1.5 tablespoon
Cumin Seeds ¼ teaspoon
Split Black Gram (Urad Dal) 1 teaspoon
Asafoetida a pinch
Curry Leaves 8-10
Salt to taste
Instructions
1. In a pan, dry roast Semolina on low heat till the color changes to light pink and you get nice aroma of roasted semolina. Roasting Semolina is very important step in this recipe. If it’s not roasted well, Upma will be sticky. Transfer Semolina to a plate.
2. In a pan, heat 1 tablespoon of Pure Ghee on medium flame. Add cumin seeds, wait for splutter.
3. Add Split black gram (urad dal) and fry till light brown. Add Cashew Nuts and fry till light brown.
4. Add Asafoedita, green chillies (slit lengthwise) / green chilly paste and curry leaves.
5. Add chopped tomatoes and Sauté for 2-3 minutes.
6. Add a pinch of salt; mix. Cook covered till tomatoes are soft.
7. Add 3 cups of water to the pan.
8. Add Salt and sugar. Let the water to boil.
9. Add roasted Semolina and mix. If Semolina is well roasted, there won’t be any lumps formed. Cook covered for 3-4 minutes.
10. If Upma is dry, sprinkle some water and cook covered for 2 minutes.
11. Add fresh coconut and coriander. Mix.
12. Add Pure Ghee. Mix Gently.
13. Yummy Tomato Upma is ready. Serve hot after garnishing with coconut and coriander.
Note
1. Amount of water required to cook Semolina depends on the coarseness of Semolina. Coarse Semolina needs more water to cook. But if you add more water than required, then Upma will be soggy. So it’s better to add little less water in the beginning and then add more if required.
2. You can add onions and any other veggies like fresh Green Peas / Carrots / Beans. Finely chop Onions, Carrots and beans. Add them to the pan in step 5 above. Cook covered till veggies are cooked. Follow the remaining steps of the recipe.
==================================================================================
टोमॅटो उपमा
हा एक लोकप्रिय भारतीय पदार्थ आहे. अगदी सोपा, पटकन होणारा, चविष्ट आणि पौष्टिक पदार्थ ब्रेकफास्ट / नाश्त्यासाठी उत्तम पर्याय आहे. ह्यात मी कांदा घालत नाही. पण तुम्हाला आवडत असेल तर कांदा आणि आवडत्या भाज्या घालू शकता.
साहित्य ( ४ जणांसाठी )
जाडा रवा १ कप
टोमॅटो २ मध्यम बारीक चिरून
हिरव्या मिरच्या ३–४ / ठेचलेली हिरवी मिरची अर्धा चमचा
ताजा खवलेला नारळ १ टेबलस्पून
चिरलेली कोथिंबीर १ टेबलस्पून
काजू ८–१० मध्यम आकाराचे तुकडे
साखर दीड–दोन चमचा (चवीनुसार कमी / जास्त करा)
साजूक तूप दीड टेबलस्पून
जिरं पाव चमचा
हिंग चिमूटभर
कढीपत्ता ८–१० पानं
उडीद डाळ १ चमचा
मीठ चवीनुसार
कृती
१. एका कढईत रवा मंद आचेवर खमंग भाजून घ्या. उपमा करताना रवा नीट भाजणं खूप महत्त्वाचं आहे. रवा कमी भाजल तर उपमा चिकट होतो आणि गुठळ्या होतात. भाजलेला रवा एका ताटलीत काढून घ्या.
२. आता कढईत १ टेबलस्पून साजूक तूप गरम करून जिरं घाला. जिरं तडतडलं की उडीद डाळ घालून हलका ब्राउन रंग येईपर्यंत परता. काजूचे तुकडे घालून हलका ब्राउन रंग येईपर्यंत परता.
३. हिंग, हिरव्या मिरच्या, कढीपत्ता घाला.
४. टोमॅटो घाला आणि २–३ मिनिटं परता. चिमूटभर मीठ घाला. झाकण ठेवून २ मिनिटं मंद आचेवर टोमॅटो नरम होईपर्यंत शिजवा.
५. ३ कप पाणी घाला. मीठ, साखर घाला. पाण्याला उकळी आणा.
६. गॅस बारीक करून भाजलेला रवा पाण्यात घाला. मिक्स करा. झाकण ठेवून शिजवा.
७. उपमा सुका वाटत असेल तर थोडं पाणी शिंपडून वाफ काढा.
८. नारळ, कोथिंबीर घालून मिक्स करा.
९. साजूक तूप घालून हलक्या हाताने मिक्स करा. चविष्ट उपमा तयार आहे.
१०. गरमागरम उपमा नारळ, कोथिंबीर पेरून खायला द्या.
टिप्स
१. उपम्याला किती पाणी लागेल ते रवा किती जाड आहे यावर अवलंबून असतं. जाड रव्यासाठी पाणी जास्त लागतं. पण पाणी जास्त झालं तर उपमा चिकट होतो. म्हणून सुरुवातीला कमी पाणी घालून नंतर लागेल तसं पाणी शिंपडावं.
२. तुमच्या आवडीच्या भाज्या आणि कांदा ही घालू शकता – मटार, गाजर, फरसबी. भाज्या बारीक चिरून स्टेप ४ मध्ये फोडणीत घाला आणि शिजल्यावर पुढची कृती करा.
Your comments / feedback will help improve the recipes