Shengdanyachi Poli (शेंगदाण्याची पोळी) – Sweet Roti with a Filling of Peanuts and Jaggery

Shengdanyachi Poli (शेंगदाण्याची पोळी)

Shengdanyachi Poli (शेंगदाण्याची पोळी) – Sweet Roti with a Filling of Peanuts and Jaggery

शेंगदाण्याची पोळी मराठी

This is a Maharashtrian Specialty. A Delicious sweet roti with a filling of Roasted Peanuts and Jaggery. This recipe is easiler than Khavyachi Poli and Satori as the process of making Filling is very easy. This Roti is healthy as well as delicious. If you plan to attempt Gul Poli for the first time, try this Poli for practice.

Ingredients (Makes 7-8 Poli) (1 cup = 250 ml)

Roasted Peanuts 1 cup

Crushed Jaggery 1 cup

Salt ½ pinch (optional)

Cardamom Powder ¼ teaspoon

Wheat Flour 1 cup

Oil ½ teaspoon

Rice Flour for dusting

Salt 2 pinch

Instructions

Prepare Dough

1. Mix wheat flour, 2 pinch salt, ½ teaspoon oil. Using water bind a medium stiff dough.

Prepare Filling

1. Grind together Roasted peanuts and Jaggery into a fine powder. You can peel peanuts before grinding or use them along with peels. Both methods are fine. Powder will be little oily because of oil released from peanuts. Take the powder out in a plate.

5. Add ½ pinch salt (optional) and cardamom powder and bind together the filling. I add little salt in the filling. You can skip it if you don’t like it. This will be a medium consistency filling dough.

Peanuts and Jaggery filling (सारणाचा गोळा)

Make Shengdanyachi Poli

1. Take two 1 inch diameter round balls of dough, roll them individually, into 3 inch diameter circles (like Puri).

2. Take 2 inch diameter round ball of filling, flatten it and place between the 2 dough circles rolled in step 1.

Place the filling on one of the dough Puri (सारणाचा गोळा एका पुरीवर पसरवा)

3. Seal the edges, gently roll into a 7 – 8 inch diameter circular roti. Use rice flour for dusting,

4. Trim the edges.

5. Dry roast roti on medium flame on a hot griddle, till light brown on both sides.

Roast both sides on medium flame till light brown (पोळी दोन्ही बाजूनी मध्यम आचेवर खरपूस भाजून घ्या)
पोळी दोन्ही बाजूनी मध्यम आचेवर खरपूस भाजून घ्या

6. Cool to room temperature.

7. Serve this yummy Shengdanyachi Poli with home made ghee (clarified butter).

8. Shengdanyachi Poli lasts for 4-5 days at room temperature. Do not store it in refrigerator.

Shengdanyachi Poli (शेंगदाण्याची पोळी)
Shengdanyachi Poli (शेंगदाण्याची पोळी)

Note

1. Instead of wheat flour you can use Semolina and all purpose flour (half-half) for the cover.

====================================================================================

खमंग खुसखुशीत स्वादिष्ट शेंगदाण्याची पोळी

शेंगदाणे आणि गुळाचं सारण घालून केलेल्या ह्या पोळ्या म्हणजे महाराष्ट्रातील लोकप्रिय पदार्थ आहे. अतिशय पौष्टिक आणि स्वादिष्ट अशा ह्या पोळ्या करायला अगदी सोप्या आहेत. गूळ पोळ्या करण्याचा पहिलाच प्रयत्न करणाऱ्यांनी गूळपोळीचा सराव म्हणून ह्या पोळ्या केल्या तर फायदा होईल.

साहित्य (८ पोळ्यांसाठी) (१ कप = २५० मिली )

भाजलेले शेंगदाणे १ कप

चिरलेला गूळ १ कप

मीठ अर्धी चिमूट

वेलची पूड पाव चमचा

कणिक १ कप 

तेल अर्धा  चमचा

मीठ २ चिमूट 

तांदुळाचं पीठ पोळ्या करताना लावायला

कृती

बाहेरील आवरणासाठी

. कणिक, तेल, २ चिमूट मीठ घालून पीठ भिजवून घ्या. फार सैल नको आणि फार घट्ट ही नको.

सारणासाठी

. भाजलेले शेंगदाणे आणि गूळ मिक्सर मध्ये फिरवून बारीक करून घ्या. शेंगदाण्याची सालं नाही काढली तरी चालतात. जरा ओलसर मिश्रण होईल. मिश्रण ताटलीत काढून घ्या

. मिश्रणात अर्धी चिमूट मीठ (ऐच्छिक),  वेलची पूड घालून मिक्स करा. सारणाचा गोळा तयार होईल. ह्या पोळीच्या सारणात मी किंचित मीठ घालते. तुम्हाला आवडत नसेल तर घालू नका.

Peanuts and Jaggery filling (सारणाचा गोळा)

शेंगदाण्याच्या पोळीची कृती

. पिठाचे २ छोटे गोळे घेऊन २ पुऱ्या लाटून घ्या.

. पिठाच्या गोळ्याच्या दुप्पट सारणाचा गोळा घेऊन तो एका पुरीवर पसरवा. त्यावर दुसरी पुरी ठेवा आणि कडा बंद करा.

Place the filling on one of the dough Puri (सारणाचा गोळा एका पुरीवर पसरवा)

. हलक्या हाताने पोळी लाटून घ्या.

. कडा सुरीने / कातण्याने कापून काढून टाका.

. पोळी मध्यम आचेवर दोन्ही बाजूनी खरपूस भाजून घ्या.

Roast both sides on medium flame till light brown (पोळी दोन्ही बाजूनी मध्यम आचेवर खरपूस भाजून घ्या)
पोळी दोन्ही बाजूनी मध्यम आचेवर खरपूस भाजून घ्या

. खमंग खुसखुशीत शेंगदाण्याची पोळी साजूक तुपासोबत खायला द्या.

. शेंगदाण्याच्या पोळ्या फ्रिजमध्ये ठेवू नका. ५ दिवस टिकतात.

Shengdanyachi Poli (शेंगदाण्याची पोळी)
Shengdanyachi Poli (शेंगदाण्याची पोळी)

टीप

. आवरणासाठी कणकेऐवजी बारीक रवा आणि मैदा अर्धा अर्धा घालू शकता

 

Be the first to comment

Your comments / feedback will help improve the recipes