Puran (पुरण)– Maharashtrian Sweet using Split Chickpeas

Puran (पुरण)

Puran (पुरण)– Maharashtrian Sweet using Split Chickpeas

पुरण मराठी

Puran is the easiest sweet you can make. This is the filling of Maharashtrian Puran Poli. But this filling itself is a sweet dish, generally made as Prashad on auspicious occasion. I remember, my mother used to make this on Fridays in Shravan (Savan) month. It only requires 2 main ingredients Bengal Gram / Split Chickpeas (Chana Dal) and Jaggery.

Ingredients (Serves 4) (1 cup = 250ml)

Bengal Gram/ Split Chickpeas (Chana Dal) 1 cup

Jaggary crushed 1 to 1.25 cups (depending on the sweetness required)

Cardamom Powder ¼ teaspoon

Turmeric Powder ¼ teaspoon

Oil 2 drops

Salt to taste

Instructions

1. Wash Bengal Gram (Chana Dal).

2. Add 2.5 cups water, Turmeric Powder and 2 drops of oil and pressure cook till Dal is soft. (Cook on low flame for about 15 minutes after 1 whistle.)

3. In a thick bottom pan, mix cooked Dal, Jaggery and salt. Cook on low flame till mixture is almost dry. Add Cardamom powder and mix. Switch off the gas.

4. Delicious Puran is ready. Have it hot with a generous helping of pure ghee. It tastes awesome. Alternatively have it with Chapati. This can be a good option when you are bored of eating subji.

Note

1. Colour of Puran depends on the colour of Jaggery. I use chemical-free Jaggery that is brownish in colour – hence the colour of Puran is dark.

Puran (पुरण)
Puran (पुरण)
        ===================================================================================

पुरण

महाराष्ट्रात सणासुदीला पुरणा वरणाचा स्वयंपाक असतोच. पुरण हे अतिशय सोपे पक्वान्न आहेचणा डाळ आणि गूळ हे मुख्य जिन्नस वापरून पुरण बनवतात. पुरणपोळीसाठी बनवलं जाणारं पुरण थोडं जास्त गोड आणि सुकं असतं. हे पुरण असंच किंवा पोळीबरोबर खातात. पण पुरण खाताना वरून सढळ हाताने साजूक तूप घातलेच पाहिजे. अतिशय स्वादिष्ट असा हा पदार्थ आमच्याकडे बरेचदा बनतो पोळीबरोबर खाण्यासाठी भाजी ऐवजी.

साहित्य (४ जणांसाठी) (१ कप = २५० मिली )

चणा डाळ १ कप

चिरलेला गूळ एक सव्वा कप (जसं गोड हवं असेल तसं प्रमाण)

हळद पाव चमचा

तेल २ थेम्ब

वेलची पूड पाव चमचा

मीठ चवीनुसार

कृती

. चणा डाळ धुवून त्यात अडीच कप पाणी, हळद आणि तेल घाला. प्रेशर कुकर मध्ये शिजवून घ्या. एक शिटी झाल्यावर १५ मिनिटं बारीक गॅस वर कुकर ठेवला तर डाळ शिजते.

. एका कढईत शिजलेली डाळ, गूळ आणि मीठ घालून मंद गॅसवर शिजू द्या. गूळ वितळल्यावर मिश्रण पातळ होईल. तसंच शिजवत रहा आणि मध्ये मध्ये ढवळत रहा. मिश्रण घट्ट होईल.

. मिश्रण घट्ट झाल्यावर गॅस बंद करापुरण तयार आहे.

. गरम गरम पुरण साजूक तूप घालून खायला द्या किंवा पोळीबरोबर खायला द्या.

टीप

. पुरणाचा रंग गुळाच्या रंगावर अवलंबून आहे. मी सेंद्रीय गूळ वापरते त्यामुळे पुरण तपकिरी रंगाचं होतं

Puran (पुरण)
Puran (पुरण)

Be the first to comment

Your comments / feedback will help improve the recipes