Tomato Batata Rassa (टोमॅटो बटाटा रस्सा) – Tomato Potato Subji
When there was no fresh vegetable available, my mother used to make this subji. But it tastes so yummy that I specially plan to make it. In the month of Savan, many friends are worried about which subji to make without using Onion and Garlic. I never have that problem as most of my subjis are without Onion and Garlic. I believe, that original taste of subji gets overshadowed with Onion and Garlic. Anyway, that’s my belief.
Tomato Batata Rassa is a quick and tasty gravy Subji with Potato and Tomatoes. It needs very few ingredients. It’s an easy recipe that does not use Onion, Garlic.
Ingredients (Serves 3)
Potatoes medium size 4
Tomatoes medium size 2
Roasted Peanut Powder 2 tablespoon
Red Chili Powder ½ teaspoon
Crushed Jaggery 1-2 teaspoon (adjust as per taste)
Scraped fresh coconut 1 Tablespoon
Chopped coriander 1 Teaspoon
Salt to taste
For Tempering / Tadka
Oil 1 teaspoon
Mustard seeds ¼ teaspoon
Cumin Seeds ¼ teaspoon
Turmeric Powder ½ teaspoon
Asafoetida a pinch
Instructions
1. Wash and chop potatoes as medium size pieces (I don’t peel potatoes; if you want, you can peel and chop).
2. Wash and chop tomatoes as medium size pieces.
3. In a pan, heat oil.
4. Add mustard seeds, wait for splutter; add cumin seeds, wait for splutter; add Asafoetida
5. Add potatoes, Turmeric Powder, saute and cook covered for 2 minutes without adding water; remove the lid, saute and cook covered for another 2 minutes without adding water.
6. Add water to cover about half the potatoes.
7. Cook covered for 3-4 minutes.
8. Add tomatoes, mix.
9. Add Roasted peanut powder, chili powder, Salt, Jaggery and Scraped fresh coconut; mix well
10. Cook covered till potatoes are soft. Adjust water as per required gravy.
11. Add chopped coriander and serve hot.
12. This subji has nice orange colour, is little sour and has nutty taste because of peanut powder; Enjoy with Roti, Bhakari or rice.
========================================================================================
टोमॅटो बटाटा रस्सा – कांदा लसूण नाही; वाटण नाही
जेव्हा भाज्या आणायला वेळ मिळायचा नाही किंवा पाऊस / काही कारणामुळे ताज्या भाज्या मिळायच्या नाहीत तेव्हा आई हमखास ही भाजी करायची. ही एवढी चविष्ट लागते की मी मुद्दाम ठरवून ही भाजी करते.
टोमॅटो बटाटा रस्सा हा एक झटपट होणारा अगदी सोपा रस्सा आहे. कांदा लसूण नाही; वाटण नाही. फक्त थोडं दाण्याचं कूट आणि खवलेला ओला नारळ असेल की हा रस्सा होतो. छान आंबटगोड आणि चविष्ट लागतो हा रस्सा.
साहित्य (३ जणांसाठी)
बटाटे मध्यम ४
टोमॅटो मध्यम २
लाल तिखट अर्धा टीस्पून
भाजलेल्या शेंगदाण्याचं कूट १ टेबलस्पून
चिरलेला गूळ १–२ टीस्पून (चवीनुसार कमी /जास्त करा )
खवलेला नारळ १ टेबलस्पून
चिरलेली कोथिंबीर १ टीस्पून
मीठ चवीनुसार
फोडणीसाठी
तेल १ टीस्पून
मोहरी पाव टीस्पून
जिरं पाव टीस्पून
हिंग १ चिमूट
हळद अर्धा टीस्पून
कृती
१. बटाटे धुवून मध्यम आकाराच्या फोडी करा. मी बटाट्याची सालं काढत नाही. तुम्हाला हवे असेल तर बटाटे सोलून फोडी करा.
२. टोमॅटो धुवून मध्यम आकाराच्या फोडी करा.
३. एका कढईत तेल गरम करून मोहरी, जिरं, हिंगाची फोडणी करा.
४. त्यात बटाट्याच्या फोडी घाला. हळद घाला आणि ढवळा.
५. २ मिनिटं झाकण ठेवून पाणी न घालता बारीक गॅसवर शिजवा. परत एकदा ढवळून २ मिनिटं झाकण ठेवून पाणी न घालता बारीक गॅसवर शिजवा.
६. बटाट्याच्या फोडी अर्ध्या बुडतील एवढं पाणी घाला आणि ३–४ मिनिटं बारीक गॅसवर झाकण ठेवून शिजवा.
७. आता टोमॅटोच्या फोडी घाला.
८. लाल तिखट, गूळ, शेंगदाण्याचं कूट, मीठ आणि नारळ घालून ढवळा.
९. बटाटे नरम होईपर्यंत शिजवा. जेवढा रस हवा असेल तसं पाणी घाला / आटवा.
१०. चिरलेली कोथिंबीर घाला. एकदा ढवळून गॅस बंद करा.
११. टोमॅटो बटाट्याचा चविष्ट रस्सा तयार आहे. पोळी / भाकरी / भातासोबत सर्व्ह करा. दही भातासोबत हा रस्सा फारच छान लागतो.
Your comments / feedback will help improve the recipes