Harbharyachi Usal ( हरभऱ्याची उसळ) – Green/Brown Gram Grains Subji – No Onion Garlic Subji
Usal is made from sprouted or soaked pulses. In Maharashtra, we make different types of Usal. Sprouted/ Soaked pulses are rich source of proteins and vitamins. So Usal is very healthy option for subji. Most Usals require very few ingredients. There is little difference in Usal recipes of different pulses. Some use Garlic, some use Ajwain (Carom Seeds), some use Goda Masala. But a common ingredient is Green Chilies / Red Chili Powder, Sugar / Jaggery, Fresh Scraped Coconut. Most of Usal recipes do not use Onions. Hence Usal recipes are easy. The only preparation required is to soak / sprout pules. Harbhara is Gram Grain (smaller than Chickpeas / Kabuli Chana / Chhole) – It’s also called Chana in some places. There are different types of Harbhara – Green, Brown and Small, Big. You can use any for this recipe. I’ve used small Brown Harbhara. This is a no Onion, Garlic preparation.
Ingredients (Serves 4) (1 cup = 250 ml)
Harbhara (Gram Grains) 1 cup
Fresh Scraped Coconut 1 tablespoon
Chili Powder ½ – ¾ teaspoon
Crushed Jaggery 1 tablespoon (or as per taste)
Chopped Coriander 1 teaspoon
Goda Masala ½ teaspoon
Ajwain (Carom Seeds) ½ teaspoon
Oil 1 teaspoon
Mustard Seeds ¼ teaspoon
Cumin Seeds ¼ teaspoon
Turmeric Powder ¼ teaspoon
Asafoetida a pinch
Salt to taste
Instructions
1. Wash and Soak Harbhara for 6-8 hours.
2. Drain water from Harbhara and remove any stones / hard grains.
3. Pressure cook Harbhara after adding water. Water level should cover grains and should be about ½ cm above grains level. After 1 whistle cook on simmer for 8-10 minutes. Harbhara takes little longer to cook than other pulses like Chavali beans.
4. Once cooked, Harbhara will be soft.
5. In a pan, heat oil.
6. Add mustard seeds, wait for sputter. Add Cumin Seeds, wait for splutter. Add Turmeric Powder and Asafoetida. Add Ajwain (Carom Seeds).
7. Add cooked Harbhara along with stock.
8. Add Salt, Crushed Jaggery, Chili Powder, Coconut, Coriander and Goda Masala. Mix and cook for 10 minutes on simmer. Add water if Usal is too dry. There should be little gravy in the Usal.
9. Serve hot with Roti or Rice. It’s very tasty.
==================================================================================
हरभऱ्याची उसळ – कांदा लसूण न घालता
महाराष्ट्रीयन उसळ खूप लोकप्रिय आहेत. वेगवेगळी कडधान्य वापरून बनवलेल्या उसळी चविष्ट तसेच पौष्टिक असतात. वेगवेगळ्या उसळींच्या पाककृतींमध्ये थोडा फरक असतो. काही उसळींमधे लसूण असते, काहींमध्ये ओवा, काहींमध्ये गोडा मसाला. ब्राह्मणी पद्धतीच्या बहुतेक उसळींमधे कांदा नसतो. सगळ्या उसळींमधे हिरवी मिरची / लाल तिखट, ताजा नारळ आणि साखर / गूळ एवढं असतंच. त्यामुळे उसळी करायला अगदी सोप्या असतात. फक्त कडधान्य भिजवून / मोड काढून घ्यावं लागतं. ही हरभऱ्याची उसळ कांदा लसूण न वापरता फक्त गोडा मसाला, ओवा, लाल तिखट, गूळ आणि नारळ कोथिंबीर घालून बनवलेली आहे. खूप टेस्टी लागते ही उसळ. हरभऱ्याचे हिरवे, तपकिरी लहान आणि मोठे असे प्रकार असतात. काही ठिकाणी हरभऱ्याला चणे म्हणतात . ह्या रेसिपी साठी मी लहान तपकिरी हरभरे वापरले आहेत. पण तुम्ही कुठलाही प्रकार वापरू शकता.
साहित्य (४ जणांसाठी ) (१ कप = २५० मिली )
हरभरे १ कप
ताजा खवलेला नारळ १ टेबलस्पून
लाल तिखट अर्धा चमचा (चवीनुसार कमी / जास्त करा )
चिरलेला गूळ १ टेबलस्पून (चवीनुसार कमी / जास्त करा )
गोडा मसाला अर्धा चमचा
ओवा अर्धा चमचा
चिरलेली कोंथिबीर १ चमचा
तेल १ चमचा
मोहरी पाव चमचा
जिरं पाव चमचा
हळद पाव चमचा
हिंग चिमूटभर
मीठ चवीनुसार
कृती
१. हरभरे धुवून पाण्यात ६–८ तास भिजवून ठेवा.
२. हरभऱ्याचे पाणी काढून हरभरे निवडून घ्या.
३. पातेल्यात हरभरे घेऊन त्यात पाणी घाला – हरभरे बुडून वर अर्धा सेमी पाणी येउ दे. प्रेशर कुकर मध्ये हरभरे शिजवून घ्या. १ शिटी झाली की बारीक गॅस वर ८–१० मिनिटं कुकर ठेवा. हरभरे शिजायला जरा वेळ लागतो.
४. एका पातेल्यात तेल गरम करून मोहरी, जिरं, हळद, हिंग, ओवा घालून फोडणी करा.
५. त्यात शिजलेले हरभरे पाण्यासकट घाला.
६. त्यात गोडा मसाला, गूळ, लाल तिखट, मीठ, नारळ, कोथिंबीर घालून ढवळून घ्या आणि १० मिनिटं मध्यम आचेवर शिजवा.
७. उसळ सुकी झाली असेल तर थोडं पाणी घाला. ह्या उसळीला फार रस नसतो.
८. चविष्ट आणि पौष्टिक हरभऱ्याची उसळ तयार आहे. गरमागरम उसळ पोळी / भाकरी / भाताबरोबर खायला द्या.
Your comments / feedback will help improve the recipes