Jwarichya Pithachi Ukad (ज्वारीच्या पिठाची उकड) – Sorgham / Jowar Flour Savory Porridge

Jwarichya Pithachi Ukad (ज्वारीच्या पिठाची उकड)

Jwarichya Pithachi Ukad (ज्वारीच्या पिठाची उकड) – Sorgham / Jowar Flour Savory Porridge

ज्वारीच्या पिठाची उकड मराठी

This is a variation of a traditional Maharashtrian snack from Konkan. The traditional one uses Rice Flour as the main ingredient. This one uses Jowar / Sorgham flour. Apparently this is popular in some parts of Maharashtra. But I did not know about it. I heard about it in a Marathi serial; and decided to make it. It uses very few ingredients and is easy to cook and very tasty snack. Traditionally this Ukad is served with a generous helping of Groundnut Oil. I also sprinkled Pickle Masala on top – similar to the way Gujarati Khichu is served.

I added Turmeric Powder to the tempering. But you can skip it, if you want white colour Ukad.

Ingredients (Serves 3) (1 cup = 250 ml)

Jowar / Sorgham Flour 4 tablespoons

Buttermilk 2 cups

Salt to taste

Chopped Coriander 1 tablespoon

For Tempering/ Tadka

Oil 1 tablespoon

Mustard seeds ¼ teaspoon

Cumin Seeds ¼ teaspoon

Turmeric Powder ½ teaspoon (Optional)

Asafoetida (Hing) ¼ teaspoon

Garlic 2-3 cloves chopped into pieces

Green Chili Paste ½ teaspoon

Instructions

1. In a bowl mix Jowar flour and buttermilk. Add salt and mix well to ensure there are no lumps. Consistency should be like Bhajia / Pan Cake batter. If required add water to batter.

2. Keep the batter for 15 minutes.

3. In a pan, heat oil. Add mustard seeds; Wait till splutter. Add Cumin Seeds; wait till splutter. Add Garlic pieces, saute till light brown.

4. Add Turmeric Powder, Asafoetida (Hing) and Green Chili Paste.

5. Pour the batter in the pan.

6. Cook on low flame stirring all the time, till mixture thickens (about 2 minutes).

7. Add ½ cup water, keep stirring.

8. Repeat steps 7 and 8, 2-3 times. Stop this when the mixture does not thicken further.

9. Cover the pan with lid and cook the batter.

10. Keep stirring every 2-3 minutes.

11. Cooked batter will have a nice glaze.

12. Add chopped coriander.

13. Serve hot.

14. Ukad tastes awesome if you add a spoonful of Groundnut oil while eating. As per nutritionists, eating raw filtered oil is good for health; so enjoy Ukad with oil. Also sprinkle some Pickle Masala on it.

Jwarichya Pithachi Ukad (ज्वारीच्या पिठाची उकड)
Jwarichya Pithachi Ukad (ज्वारीच्या पिठाची उकड)
         ==================================================================================

ज्वारीच्या पिठाची उकड

तांदळाची उकड हा कोकणातला पारंपारीक चविष्ट पदार्थ आहे. ज्वारीच्या पिठाची उकड मी कधी ऐकली नव्हती. गेल्या आठवड्यात स्वामिनी मालिकेच्या एका भागात ज्वारीच्या उकडीचा उल्लेख आला. अनायासे लोण्याचं ताक घरी होतंच. मग ही उकड करून बघितली. कृती तांदळाच्या उकडीसारखीच आहे. फक्त तांदुळाचं पीठ शिजताना जेव्हढं फुलतं तेव्हढं ज्वारीचं पीठ फुलत नाही त्यामुळे शिजताना पाणी कमी घालावं लागतं. आम्हाला तांदळाच्या उकडीपेक्षा छान लागली ही उकड

मी आधी लिहिल्याप्रमाणे उकड दोन प्रकारे बनवतात. घट्ट गोळा उकड आणि थोडी पातळ पिठल्यासारखी उकड. घट्ट गोळा उकड कमी पाणी घालून शिजवतात आणि कोमट असताना तेल लावून मळून मग खायला देतात. ती खात असताना तेलात बुडवून खातात पापडाच्या लाटीसारखीपातळ उकडीवर कच्चे गोडं तेल घालून खातातआमच्या घरी सर्वांना पातळ उकड आवडायची. आता नवरा आणि मुलाला उकड आवडत नाही. पण सासूबाईंना आवडते. मग लोण्याचं ताक केलं की दुपारच्या जेवणाला मी उकड बनवते आणि आम्ही दोघी मस्त ताव मारतो.

गुजराती लोक आपल्या उकडीसारखा खिचू नावाचा पदार्थ करताततो खाताना त्यावर गोडं तेल घालतात आणि लोणच्याचा मसाला भुरभुरवतात.   ज्वारीच्या पिठाच्या उकडीवर पण मी तेलाबरोबर लोणच्याचा मसाला घातला. खूप चविष्ट लागली उकड.

मी ह्यात थोडी हळद घातलीय. तुम्हाला पांढरी उकड हवी असेल तर हळद घालू नका

साहित्य (3 जणांसाठी) (१ कप = २५० मिली )

ज्वारीचं पीठ ४ टेबलस्पून

ताक २ कप (जरासं आंबट)

मीठ चवीनुसार

चिरलेली कोथिंबीर १ टेबलस्पून

फोडणीसाठी

तेल १ टेबलस्पून

मोहरी पाव चमचा

जिरं पाव चमचा

हळद अर्धा चमचा (ऐच्छिक )

हिंग पाव चमचा

ठेचलेली मिरची अर्धा चमचा

लसूण पाकळ्या चिरून

कृती

. ज्वारीच्या पिठात मीठ आणि ताक घालून एकजीव करा. गुठळी होऊ देऊ नका. भज्यांच्या पिठाएवढं पातळ पीठ करा. जरूर पडल्यास पाणी घाला१५ मिनिटं पीठ झाकून ठेवा.

. एका कढईत तेल गरम करून मोहरी, जिरं घालून खमंग फोडणी करा. लसूण घालून गुलाबी रंगावर परता. ठेचलेली मिरची घाला. हळद, हिंग घाला.

. भिजवलेलं ज्वारीचं  पीठ फोडणीत घाला. एकसारखं ढवळत राहा.

. मिश्रणाला उकळी आली की मिश्रण घट्ट व्हायला लागेल. गॅस बारीक करा

. अर्धा कप पाणी घालून ढवळत राहा. मिश्रण पुन्हा घट्ट होईल.

. अर्धा कप पाणी घालून ढवळत राहा. ही स्टेप परत परत करा. थोड्या वेळानं मिश्रण घट्ट व्हायचं थांबेल. तेव्हा आणखी पाणी घालू नका.

. झाकण ठेवून मंद आचेवर शिजवा. मध्ये मध्ये ढवळत राहा.

. मिश्रण शिजल्यावर तुकतुकीत दिसेल. तेव्हा कोथिंबीर घालून मिक्स करा आणि गॅस बंद करा.

. गरमागरम चविष्ट उकड वरती कच्चे गोडं तेल आणि लोणच्याचा मसाला घालून खायला द्या.

Jwarichya Pithachi Ukad (ज्वारीच्या पिठाची उकड)
Jwarichya Pithachi Ukad (ज्वारीच्या पिठाची उकड)
 

4 Comments

Your comments / feedback will help improve the recipes