Methiche Dhirde (मेथीचं धिरडं – Methi Besan Chilla) – Fenugreek Gram Flour Pan Cake
Dhirde is a Maharashtrian Chilla that has Besan and some veggies. It’s an easy, tasty and quick breakfast / snack dish. I make Methi Dhirde with some changes to standard recipe. With the addition of Wheat flour to the batter Chilla is not dry even after 3-4 hours. Dhirde tastes very yummy. This can be one of the options for Tiffin also. Try this out.
Ingredients (Makes 6-7 Dhirde) (1 cup = 250 ml)
Chopped Fenugreek (Methi) leaves 1 cup
Gram flour (Besan) 4 tablespoon
Rice Flour 2 tablespoon
Wheat flour 2 tablespoon
Green Chilly paste ½ teaspoon
Tamarind dry pulp ½ teaspoon or buttermilk 2 tablespoon or Curd 1 tablespoon
Turmeric Powder ½ teaspoon
Chopped/crushed garlic 6-7 cloves
Baking Soda a pinch
Salt to taste
Oil / Ghee / Butter for roasting
Instructions
1. In a bowl, Mix all ingredients except oil.
2. Add water and mix the batter to get consistency of dosa / Pan cake batter.
3. Heat a flat non stick Griddle. Pour ¼ cup of batter on the Gridle, and spread it evenly by using the fingers. Thickness of Dhirde should be like Paratha / Pan cake. Be careful not to touch the hot Griddle.
4. Cover it with a lid and cook on medium flame. After 2-3 minutes, remove the lid, put a few drops of oil/ghee on Dhirde and flip it over. The side that you can see will be light brown in colour.
5. Cook the other side till you get light brown spots on Dhirde.
6. Serve hot with Ghee / Butter and / or any Chutney / Sauce. It’s very yummy.
==================================================================================
मेथीचं धिरडं
आपण वेगवेगळ्या भाज्या वापरून धिरडी बनवतो. नेहमीच्या रेसिपी पेक्षा मी जरासं वेगळं धिरडं बनवते. ह्यात बेसन, तांदुळाच्या पिठाबरोबर थोडं गव्हाचं पीठ आणि किंचित बेकिंग सोडा घालते . त्यामुळे धिरडं गार झाल्यावर सुद्धा कोरडं आणि दडदडीत होत नाही. रेसिपी अगदी सोपी आणि पटकन होणारी आहे. टिफिन साठी सुद्धा हा चांगला पर्याय आहे.
साहित्य (६–७ धिरड्यांसाठी) (१ कप = २५० मिली )
चिरलेली मेथीची पानं १ कप
बेसन ४ टेबलस्पून
तांदुळाचं पीठ २ टेबलस्पून
गव्हाचं पीठ २ टेबलस्पून
ठेचलेली हिरवी मिरची अर्धा चमचा
चिंचेचा कोळ अर्धा चमचा / ताक २ टेबलस्पून / दही १ टेबलस्पून
हळद अर्धा चमचा
ठेचलेली / बारीक चिरलेली लसूण ६–७ पाकळ्या
बेकिंग सोडा चिमूटभर
मीठ चवीनुसार
तेल / तूप / लोणी धिरडी भाजण्यासाठी
कृती
१. एका बाउल मध्ये तेल / तूप / बटर वगळून सर्व साहित्य घ्या.
२. थोडं थोडं पाणी घालून डोश्याच्या पिठाएवढे पातळ पीठ भिजवा.
३. एक नॉन स्टिक सपाट तवा गरम करा.
४. तव्यावर २ डाव पीठ घालून डावाने किंवा हाताने एकसारखे पसरा – पराठ्याइतपत जाड पसरा.
५. झाकण ठेवून २–३ मिनिटं मध्यम आचेवर भाजून घ्या.
६. झाकण काढून धिरड्यावर थोडं तेल / तूप / बटर घाला. धिरडं पलटून दुसऱ्या बाजूने ही खरपूस भाजून घ्या.
७. चविष्ट, पौष्टिक मेथीचं धिरडं तयार आहे. गरमागरम धिरडं चटणी, सॉस किंवा लोण्याबरोबर खायला द्या.
Your comments / feedback will help improve the recipes