Rava Panchamrut Cake (रव्याचा पंचामृत केक ) – Eggless Semolina Cake with Honey

Rava Panchamrut Cake (रव्याचा पंचामृत केक )

Rava Panchamrut Cake (रव्याचा पंचामृत केक ) – Eggless Semolina Cake with Honey

रव्याचा पंचामृत केक मराठी

Rava Cake (Semolina Cake) is a popular eggless cake in most parts of India. Even when there were no electric ovens, this cake was baked using a regular pan or a special pan that was used for roasting cake. This is a variation of standard Rava Cake where Honey is added in the batter. In Marathi, Panchamrut is offered to God that contains 5 ingredient – Milk, Curd, Ghee, Sugar and Honey. Since this cake has all these ingredients, it’s called Rava Panchamrut cake. Honey makes it super delicious and gives it a nice colour. This cake does not require rigorous beating. In case you do not have oven, you can also bake this cake in a pan with a lid.

Ingredients (Makes about 25 pieces) (1 cup = 250 ml)

Fine Semolina 1.5 cups

Sugar ½ cup

Honey ½ cup

Milk ¾ to 1 cup

Curd (Dahi / Yogurt) ¾ to 1 cup

Pure Ghee (Clarified Butter) 2 tablespoon + for greasing the tray

Baking powder ½ teaspoon

Baking soda ¼ teaspoon

Salt ¼ teaspoon

Cardamom Powder ¼ teaspoon

Instructions

1. Mix Semolina, Sugar, Honey, ¾ cup of Milk, ¾ cup of Curd, Ghee together in a bowl. Keep stirring the mixture with a spoon till sugar dissolves. Check the consistency of batter. If it’s too thick, add remaining Milk and / Curd to get the cake consistency batter.

2. Keep the mixture covered for 2 hours.

3. Mix in Baking Powder, Baking Soda, Salt and Cardamom powder.

4. Grease a baking tray.

5. Pour the mixture in baking tray. Gently Tap the baking tray on kitchen platform so that the mixture levels and air bubbles are removed.

6. Bake at 210 degree centigrade (pre-heated for 10 minutes) for 25-30 minutes till mixture is cooked.

7. On cooling cut in desired shape pieces and serve.

8. This cake can be stored for 2 days at room temperature. If you want to store longer, store in refrigerator.

Note

1. It will take 40-45 minutes to bake this cake in pre-heated Pan. Check the cake after 45 minutes by inserting a toothpick. If not done, bake further and check after every 8-10 minutes.

2. Amount of Milk and Curd required depends on coarseness of Semolina. If Semolina is too fine, you would ¾ cup each of Milk and Curd will be sufficient.

3. You can add dry fruits of your choice. But this cake is so delicious as it is; you really don’t need any dry fruits.

4. You can add Condensed Milk also. If you add ½ cup Condensed Milk, reduce Milk, Sugar and Honey measure to half.

Rava Panchamrut Cake (रव्याचा पंचामृत केक )
Rava Panchamrut Cake (रव्याचा पंचामृत केक )

==================================================================================

रव्याचा पंचामृत केक

रव्याचा केक भारतात बहुतेक सर्व ठिकाणी बनवला जातो. जेव्हा घरी इलेक्ट्रिक ओव्हन नव्हता तेव्हाही हा केक पातेल्यावर कोळसे ठेवून किंवा गॅसवर ठेवायच्या केक पात्रात बनवला जायचा. नेहमीच्या रव्याच्या केकमध्ये मध घातला की हा पंचामृत केक बनतो. पंचामृतातले पाच जिन्नस दूध, दही, तूप, साखर आणि मध ह्या केक मध्ये घालतात. म्हणून हा पंचामृत केक. मधामुळे केक आणखी स्वादिष्ट होतो आणि छान रंग सुद्धा येतो. ह्या केकचं मिश्रण फार फेटावं लागत नाही. त्यामुळे अगदी सोपा असा हा बिनअंड्याचा केक अतिशय स्वादिष्ट आणि पौष्टिक असतो. चहाबरोबर खायला किंवा मुलांना डब्यात द्यायला ही उत्तम पदार्थ आहे.

ओव्हन नसेल तर हा केक कढई मध्ये / पातेल्यात ही बनवू शकता

साहित्य (अंदाजे २५ तुकडे बनतात) (१ कप = २५० मिली )

बारीक रवा दीड कप

साखर अर्धा कप

मध अर्धा कप

दूध पाऊण ते १ कप

दही पाऊण ते १ कप 

साजूक तूप २ टेबलस्पून + बेकिंग ट्रे ला लावण्यासाठी

मीठ पाव टीस्पून

बेकिंग सोडा पाव टीस्पून

बेकिंग पावडर अर्धा टीस्पून

वेलची पावडर पाव टीस्पून

कृती

. एका वाडग्यात रवा, पाऊण कप दूध, साखर, मध, पाऊण कप दही, केशर, तूप   मिक्स करून साखर विरघळेपर्यंत ढवळा. मिश्रण फार घट्ट असेल तर उरलेले दूध / दही घाला आणि मिक्स करा. २ तास झाकून ठेवा.

. मिश्रणात बेकिंग सोडा, बेकिंग पावडर, मीठ आणि वेलची पावडर घालून ढवळून घ्या.

. केक च्या ट्रे ला तूप लावून त्यात मिश्रण घाला. ट्रे ओट्यावर हलकेच आपटून घ्या म्हणजे पिठात हवेचे बुडबुडे असतील तर निघून जातील.

. ओव्हन २१० डिग्री सेन्टिग्रेड वर १० मिनिटं प्रीहीट करून केक २५३० मिनिटं भाजून घ्या. केक चा वरचा थर हलका गुलाबी झाला तर केक खमंग लागतोटूथपीक घालून चेक करा.

. केक थंड झाला की आवडीच्या आकाराचे तुकडे कापून खायला द्या.

. हा केक फ्रिज बाहेर २ दिवस राहतो. जास्त दिवस ठेवायचा असेल तर फ्रिज मध्ये ठेवा

टीप

. कढई मध्ये / पातेल्यात केक भाजायचा असेल तर प्री हीटेड कढई मध्ये / पातेल्यात ४०४५ मिनिटं केक भाजा. ४० मिनिटानंतर चेक करा. केक भाजला नसेल तर आणखी थोडा वेळ भाजा आणि प्रत्येक १० मिनिटांनी चेक करा.  

. रवा जास्त बारीक असेल तर पाऊण कप दूध आणि पाऊण कप दही पुरेल. रवा जरा जाडसर असेल तर उरलेलं दूध / दही घालापीठ जास्त पातळ झालं तर केक चांगला फुगत नाही

. हवं असेल तर सुका मेवा घालू शकता. पण हा केक असाच एवढा स्वादिष्ट लागतो की सुक्या मेव्याची जरूर नाही.

. ह्या केक मध्ये कंडेन्स्ड मिल्क ही घालू शकता. जर अर्धा कप कंडेन्स्ड मिल्क असेल तर दूध, साखर आणि मधाचं प्रमाण अर्ध करा

Rava Panchamrut Cake (रव्याचा पंचामृत केक )
Rava Panchamrut Cake (रव्याचा पंचामृत केक )

8 Comments

  1. मी पण करून बघितला खूप छान झाला फकत्त 20 मिंतातच झाला गॅस वर कुकर मध्ये छोटे भांडे ठेऊन केला कुकर 10 mint prihit करून घेतला

  2. नमस्कार.मला तुमच्या पद्धतीने पंचामृत केक करायचा आहे. माझ्या मायक्रोवेव्ह ओव्हन मध्ये High, Medium high, Medium, Medium low, Low असे modes आहेत. तर हा केक करताना मी कोणत्या mode वर मिश्रण ठेवू ते कृपया सांगावे. धन्यवाद.

    • मायक्रोवेव्ह हाय मोड वर ठेवा. टायमर ७-८ मिनिटं. नंतर हवं असेल तर आणखी १-२ मिनिटं करा. 
      Sudha

  3. मी हा केक काल केला होता ओव्हन मध्ये. खूपच छान झाला होता. मनःपूर्वक धन्यवाद इतकी छान रेसिपी शेअर केल्याबद्दल

Leave a Reply to रसिका नेर्लेकर Cancel reply