Dudhi Bhopala Soup ( दुधी भोपळ्याचं सूप) – Bottle Gourd (Lauki) Soup

Dudhi Bhopala Soup ( दुधी भोपळ्याचं सूप)

Dudhi Bhopala Soup ( दुधी भोपळ्याचं सूप) – Bottle Gourd (Lauki) Soup

दुधी भोपळ्याचं सूप मराठी

Dudhi Bhopala (Bottle Gourd / Lauki) is very nutritious. A soup using Bottle Gourd and Split Petite yellow lentil (Moong Daal) is very tasty and quite filling too. It’s a good option for those who like healthy soups. It’s an easy recipe with very few ingredients.

Ingredients (Serves 4) (1 cup = 250 ml)

Chopped Bottle Gourd 1 cup

Split Petite yellow lentil (Yellow Moong Daal) ¼ cup

Turmeric Powder a pinch

White/Black Pepper Powder as per taste

Salt / Black Salt to taste

Almonds 3-4 for garnishing

Instructions

1. Wash, chop Bottle Gourd into medium size pieces. I don’t peel Bottle Gourd if it’s tender. If it’s not, peel it before chopping.

2. Wash Moong Daal.

3. Add ¾ cup of water to Moong Daal and a pinch of turmeric. Pressure cook Bottle gourd pieces and Moong Daal together.

4. Upon cooling, blend both together in a smooth paste.

5. Transfer the mixture to a deep pan. Add water to adjust consistency. Boil the mixture for 3-4 minutes.

6. Add Salt / Black Salt and Black Pepper powder as per taste. Mix.

7. Delicious Nutritious Bottle Gourd Soup is ready.

8. Enjoy hot soup with Almond silvers (thin slices).

Note

1. If you like you can add tempering of Ghee (Clarified Butter) and Cumin seeds at the end.

2. You can also add Garlic pieces to this soup. Fry Garlic pieces in Ghee (Clarified Butter) or butter till light brown and add to the soup at the end.

Dudhi Bhopala Soup ( दुधी भोपळ्याचं सूप)
Dudhi Bhopala Soup ( दुधी भोपळ्याचं सूप)
     ==================================================================================

दुधी भोपळ्याचं सूप (Bottle Gourd/ लौकी )

दुधी भोपळा खूप पौष्टिक असतो. दुधी भोपळ्याचं मूग डाळ घालून सूप फार छान होतं. हे टेस्टी आणि पौष्टिक सूप बनवायला अगदी सोपं आहे. अगदी कमी जिन्नस वापरून हे सूप करता येतं. आणि जिन्नस ही नेहमी घरात असणारे आहेत. नव्याने काही आणावं लागत नाही. नक्की करून बघा. मी ह्या सुपात फोडणी घालत नाही. पण आवडत असेल तर शेवटी साजूक तूप, जिऱ्याची फोडणी घालू शकता. तसंच लसणीचे बारीक तुकडे तुपात तळून घालू शकता

साहित्य (४ जणांसाठी) (१ कप = २५० मिली)

दुधी भोपळ्याचे तुकडे १ कप

पिवळी मूग डाळ पाव कप

हळद १ चिमूट

मीठ / काळं मीठ चवीनुसार

काळी मिरी पावडर चवीनुसार

बदाम ४५ पातळ काप करून सजावटीसाठी

कृती

. दुधी भोपळा धुवून त्याचे मध्यम आकाराचे तुकडे करून घ्या. दुधी कोवळा असेल तर मी सालं न काढता तुकडे करते. कोवळा नसेल तर सालं काढून मग दुधीचे तुकडे करा.

. मूग डाळ धुवून त्यात पाऊण कप पाणी आणि चिमूटभर हळद घालामूग डाळ आणि दुधीचे तुकडे एकत्र प्रेशर कुकर मध्ये शिजवून घ्या.

. गार झाल्यावर दोन्ही मिक्सरमध्ये बारीक वाटून घ्या.

. मिश्रण एका पातेल्यात काढून गॅसवर ३४ मिनिटं उकळून घ्या.

. मिश्रणात मीठ / काळं मीठ आणि काळी मिरी पावडर घाला. ढवळून घ्या.

. चविष्ट आणि पौष्टिक दुधी भोपळ्याचं सूप बदामाचे काप घालून सर्व्ह करा.

टीप

. आवडत असेल तर सुपात साजूक तूप आणि जिऱ्याची फोडणी घालू शकता. सूप तयार झाल्यावर शेवटी फोडणी पातेल्यात घाला.

. आवडत असेल तर लसूण घालू शकता. लसणीचे बारीक तुकडे करून साजूक तुपात गुलाबी रंगावर तळून शेवटी पातेल्यात घाला.   

Dudhi Bhopala Soup ( दुधी भोपळ्याचं सूप)
Dudhi Bhopala Soup ( दुधी भोपळ्याचं सूप)

2 Comments

  1. सुधाजी, काल हे सूप करून पाहिले. शेवटी लसणाची फोडणी दिली. घरच्यांना खूप आवडले. छान रेसिपी दिलीत तुम्ही. धन्यवाद.

Your comments / feedback will help improve the recipes