Kasuri Methi Chhole (कसुरी मेथी छोले) – Chickpeas with Dried Fenugreek Leaves – No Onion Garlic Recipe
Popular recipe of Chhole (Chickpeas) is with Onion, Garlic and Tomato. But this recipe does not use any of these. Still it makes tasty Chhole. It saves the chopping and cooking time. It uses Kasuri Methi (Dried Fenugreek Leaves), Coriander Powder, Cumin Powder, Black Pepper Powder and Mango Powder. While Pressure cooking Chhole, I add Cloves, Bay Leaf, Cinnamon and Cardamom. This way you get nice aroma of spices in the subji. Try this out.
Ingredients (Serves 4) (1 cup = 250 ml)
Raw Kabuli Chana / Chhole (Chickpeas) 1 cup
Coriander Powder 4 teaspoon
Cumin Powder 2 teaspoon
Kasuri Methi (Dried Fenugreek Leaves) 1/3 cup
Black Pepper Powder ¾ teaspoon
Mango Powder ½ teaspoon
Kashmiri Chili Powder 1 teaspoon
Sugar ¾ teaspoon (adjust as per taste)
Cloves 3
Cinnamon 1 inch stick
Cardamom 2
Bay Leaf 1
Chopped Coriander leaves 2 teaspoon
Salt to taste
Pure Ghee (Clarified Butter) 2 teaspoon
Cumin Seeds (Jeera) ¼ teaspoon
Asafoetida (Hing) a pinch
Turmeric Powder ½ teaspoon
Instructions
1. Soak Chhole for 8 hours.
2. Add Cloves, Bay Leaf , Cardamom and Cinnamon to Chhole. Add water to level 2 inches above Chhole level. Pressure cook till soft. After one whistle, pressure cook on simmer for 15 minutes.
3. In a pan, heat Ghee. Add Cumin Seeds, wait for splutter. Add Turmeric Powder and Asafoetida.
4. Add Coriander Powder. Add ¼ cup water and saute for 2-3 minutes.
5. Add Cumin Powder, Black Pepper Powder, ¼ cup water and saute for 2-3 minutes.
6. Add Kashmiri Chili Powder, Sugar, ¼ cup water and saute for 2-3 minutes.
7. Add Kasuri Methi and Mango Powder. Saute for 2-3 minutes.
8. Remove Cloves, Bay leaf, Cardamom and Cinnamon from cooked Chhole and add Chhole to the Pan along with the stock.
9. Add Salt. Cook on low flame till you get right consistency of the gravy. This gravy should be thick.
10. Add chopped coriander and serve hot with Indian bread (Roti, Paratha) Or Rice. It’s super tasty.
==================================================================================
कसुरी मेथी छोले – कांदा लसूण न घालता
छोले म्हटलं की आपल्याला कांदा, लसूण घातलेले छोले आठवतात. बऱ्याच ठिकाणी असेच छोले मिळतात. पण उत्तर भारतात नैवेद्याच्या ताटासाठी छोले करतात त्यात कांदा लसूण घालत नाहीत. ही तशी रेसिपी आहे. ह्यात कांदा, लसूण, टोमॅटो नाही. कसुरी मेथी, धने पावडर, जिरे पावडर, मिरी पावडर, आमचूर आणि काश्मिरी लाल तिखट घालून केलेले हे छोले अतिशय चविष्ट लागतात. आणि पटकन होतात. मी छोले शिजवताना त्यात लवंग, दालचिनी, हिरवी वेलची आणि तमालपत्र घातलं. त्यामुळे मसाल्याचा छान सुगंध येतो छोल्यांना. नक्की करून बघा असे चविष्ट छोले.
साहित्य (४ जणांसाठी) (१ कप = २५० मिली)
काबुली चणे १ कप
धने पावडर ४ चमचे
जिरे पावडर २ चमचे
कसुरी मेथी १/३ कप
काळी मिरी पावडर पाऊण चमचा
आमचूर अर्धा चमचा
काश्मिरी लाल तिखट १ चमचा
साखर पाऊण चमचा (चवीप्रमाणे कमी/जास्त करा)
लवंगा ३
तमालपत्र १
दालचिनी १ इंचाचा तुकडा
हिरवी वेलची २
चिरलेली कोथिंबीर २ चमचे
मीठ चवीनुसार
साजूक तूप २ टेबलस्पून
जिरं पाव चमचा
हळद अर्धा चमचा
हिंग चिमूटभर
कृती
१. काबुली चणे धुवून ८ तास पाण्यात भिजवून ठेवा.
२. चण्यांच्या पातळीच्या २ इंच वर येईल एवढं पाणी घालून त्यात लवंग, दालचिनी, तमालपत्र आणि वेलची घाला. प्रेशर कुकर मध्ये चणे छान शिजवून घ्या. मी कूकरची एक शिटी झाल्यावर १५ मिनिटं मंद आचेवर कुकर ठेवून शिजवते.
३. एका कढईत साजूक तूप घालून जिरं, हळद आणि हिंगाची फोडणी करा.
४. धने पावडर घालून पाव कप पाणी घाला आणि २-३ मिनिटं परता.
५. जिरे पावडर, मिरी पावडर घालून पाव कप पाणी घाला आणि २-३ मिनिटं परता. .
६. काश्मिरी लाल तिखट, साखर घालून घालून पाव कप पाणी घाला आणि २-३ मिनिटं परता.
७. कसुरी मेथी आणि आमचूर घालून २-३ मिनिटं परता. .
८. शिजलेल्या चण्यांतील लवंग, दालचिनी, वेलची आणि तमालपत्र काढून टाका आणि चणे पाण्यासकट कढईत घाला.
९. मीठ घालून मंद आचेवर शिजवा. पाणी घालून रस्सा जेवढा दाट हवा असेल तसे शिजवा. ह्या भाजीचा रस्सा दाट असतो.
१०. कोथिंबीर घालून गरम गरम छोले पोळी, पराठा / भाताबरोबर सर्व्ह करा. फारच चविष्ट लागतात.
Your comments / feedback will help improve the recipes