Makyacha Shira (मक्याचा शिरा) – Corn Savory Snack – No Onion Garlic Recipe
Traditionally Makyacha Shira is made with grated Desi Corncobs. Desi corn is little hard; it’s possible to grate the corncobs properly. But now-a-days, only American sweet corn is available in Mumbai and it’s not easy to grate American corn. So I use little different method to make this Shira. This is a no onion, garlic snack / breakfast recipe.
Ingredients (Serves 3-4) (1 cup = 250 ml)
Sweet Corn (Makyache Dane) 2 cups
Split Chickpeas (Chana Dal) ½ cup
Green Chili paste 1 teaspoon
Sugar ¾ teaspoon
Lemon juice 1 teaspoon
Scraped Fresh Coconut 2 tablespoon
Coriander leaves Chopped 1 tablespoon
Oil 2 tablespoon
Mustard Seeds ¼ teaspoon
Cumin Seeds ¼ teaspoon
Turmeric Powder ½ teaspoon
Asafoetida (Hing) 2 pinch
Salt to taste
Instructions
1. Wash and Soak Split Chickpeas in water for 4-6 hours.
2. Wash sweet corns. Coarse grind Corns in a grinder.
3. Discard water from Chickpeas and Coarse grind without adding water.
4. Pressure Cook ground Chickpeas without adding any water to the mixture. After one whistle, cook on low flame for 5-6 minutes. Chickpeas will be cooked properly.
5. Heat 1 tablespoon oil in a pan on medium flame. Add mustard seeds, wait for sputter.
6. Add cumin seeds, wait sputter. Add Turmeric Powder, Asafoetida and Green chili paste.
7. Add crushed corn and mix well.
8. Loosen cooked Peas and add to the pan. Mix well.
9. Cover the pan and steam for 3 to 4 minutes.
10. Add sugar, salt, lemon juice, scraped coconut, chopped coriander leaves and mix. Cook on simmer for 2 minutes.
11. Delicious Makyacha Tikhat Shira is ready. Serve hot with garnish of scraped fresh coconut and chopped coriander.
Note
1. You can make this Shira without adding Chickpeas. But the texture of Shira will be soggy. To avoid this, reduce the water content of Sweet corn. In a thick bottom pan heat 1 teaspoon of oil. Add corn and roast till you see light brown spots on corn. Coarse grind it after cooling.
==================================================================================
मक्याचा शिरा – कांदा लसूण न घालता चविष्ट नाश्ता
पारंपरिक पद्धतीच्या मक्याच्या शिऱ्यात देशी मक्याची कणसं किसून घालतात. देशी कणसाचे दाणे एवढे रसाळ नसतात त्यामुळे ती कणसं किसता येतात. पण हल्ली मुंबईत देशी कणसं मिळतच नाहीत फक्त अमेरिकन कणसं मिळतात (American Sweet Corn) आणि ही कणसं किसता येत नाहीत. म्हणून मी एका वेगळ्या पद्धतीने हा शिरा करते. अगदी सोपा, कांदा लसूण न घालता केलेला हा शिरा खूप चविष्ट लागतो. सकाळच्या/ संध्याकाळच्या नाश्त्यासाठी अगदी छान पदार्थ आहे.
साहित्य (३–४ जणांसाठी) (१ कप = २५० मिली)
अमेरिकन स्वीट कॉर्न (मक्याचे दाणे) २ कप
चण्याची डाळ अर्धा कप
ठेचलेली हिरवी मिरची १ टीस्पून
साखर पाऊण टीस्पून
लिंबाचा रस १ टीस्पून
ताजा खवलेला नारळ २ टेबलस्पून
बारीक चिरलेली कोथिंबीर १ टेबलस्पून
तेल २ टेबलस्पून
मोहरी पाव टीस्पून
जिरं पाव टीस्पून
हळद अर्धा टीस्पून
हिंग २ चिमूट
मीठ चवीनुसार
कृती
१. चण्याची डाळ धुवून ४–६ तास पाण्यात भिजवून ठेवा.
२. मक्याचे दाणे मिक्सरमध्ये घालून जाडसर वाटून घ्या. डाळीतलं पाणी काढून टाका. डाळ पाणी न घालता मिक्सरमध्ये जाडसर वाटून घ्या.
३. वाटलेली डाळ प्रेशर कुकर मध्ये वाफवून घ्या. डाळीत पाणी घालू नका. कुकरची एक शिटी झाल्यावर गॅस बारीक करून ५–६ मिनिटं शिजवा. डाळ व्यवस्थित शिजेल.
४. कढईत १ टेबलस्पून तेल घालून मोहरी, जिरं, हळद, हिंगाची खमंग फोडणी करा. ठेचलेली हिरवी मिरची घाला.
५. वाटलेले मक्याचे दाणे घाला. शिजवलेली डाळ हाताने मोकळी करून कढईत घाला. नीट ढवळून घ्या. झाकण ठेवून ३–४ मिनिटं वाफ काढा.
६. आता मीठ, साखर, लिंबाचा रस, नारळ, कोथिंबीर घालून मिश्रण ढवळून घ्या. २ मिनिटं मंद आचेवर परतून घ्या.
७. मक्याचा चविष्ट शिरा तयार आहे. गरम गरम शिरा वर नारळ, कोथिंबीर पेरून खायला द्या.
टीप
१. हा शिरा तुम्ही चणाडाळ न घालता ही करू शकता. पण तो मोकळा होत नाही; जरा ओलसर होतो. त्याचा ओलसरपणा कमी करण्यासाठी मक्याचे दाणे थोडे सुके करण्यासाठी एका कढईत १ टीस्पून तेल घालून मक्याचे दाणे घाला. मंद आचेवर दाणे सुके होईपर्यंत परतून घ्या.गार झाल्यावर मिक्सरमध्ये जाडसर वाटून घ्या.
Your comments / feedback will help improve the recipes