
Makyacha Shira (मक्याचा शिरा) – Corn Savory Snack
Traditionally Makyacha Shira is made with grated Desi Corncobs. Desi corn is little hard; it’s possible to grate the corncobs properly. But now-a-days, only American sweet corn is available in Mumbai and it’s not easy to grate American corn. So I use a different method to make this Shira. This is a no onion, garlic snack / breakfast recipe.
Ingredients (Serves 3) (1 cup = 250 ml)
Sweet Corn (Makyache Dane) 2 cups
Green Chili paste 1 teaspoon
Sugar ¾ teaspoon
Lemon juice 1 teaspoon
Scraped Fresh Coconut 1 tablespoon
Coriander leaves Chopped 1 tablespoon
Oil 1 tablespoon + 1 teaspoon
Mustard Seeds ¼ teaspoon
Cumin Seeds ¼ teaspoon
Turmeric Powder ½ teaspoon
Asafoetida (Hing) 2 pinch
Salt to taste
Instructions
1. Wash sweet corn.
2. In a thick bottom pan heat 1 teaspoon of oil. Add corn and roast till you see light brown spots on corn. Allow it to cool.
3. After cooling the corn, grind coarse in a grinder.
4. Heat 1 tablespoon oil in a pan on medium flame.
5. Add mustard seeds, wait for sputter.
6. Add cumin seeds, wait sputter.
7. Add Turmeric Powder, Asafoetida and Green chili paste.
8. Add crushed corn and mix well.
9. Cover the pan and steam for 3 to 4 minutes.
10. Add sugar, salt, lemon juice, scraped coconut, chopped coriander leaves and mix. Cook on simmer for 2 minutes.
11. Delicious Makyacha Shira is ready. Serve hot with garnish of scraped fresh coconut and chopped coriander.


==================================================================================
मक्याचा शिरा – कांदा लसूण न घालता चविष्ट नाश्ता
पारंपरिक पद्धतीच्या मक्याच्या शिऱ्यात देशी मक्याची कणसं किसून घेतात. देशी कणसाचे दाणे एवढे रसाळ नसतात त्यामुळे ती कणसं किसता येतात. पण हल्ली मुंबईत देशी कणसं मिळतच नाहीत फक्त अमेरिकन कणसं मिळतात (American Sweet Corn) आणि ही कणसं किसता येत नाहीत. म्हणून मी एका वेगळ्या पद्धतीने हा शिरा करते. अगदी सोपा, कांदा लसूण न घालता केलेला हा शिरा खूप चविष्ट लागतो. सकाळच्या/ संध्याकाळच्या नाश्त्यासाठी अगदी छान पदार्थ आहे.
साहित्य (३ जणांसाठी) (१ कप = २५० मिली)
अमेरिकन स्वीट कॉर्न (मक्याचे दाणे) २ कप
ठेचलेली हिरवी मिरची १ टीस्पून
साखर पाऊण टीस्पून
लिंबाचा रस १ टीस्पून
ताजा खवलेला नारळ १ टेबलस्पून
बारीक चिरलेली कोथिंबीर १ टेबलस्पून
तेल १ टेबलस्पून + १ टीस्पून
मोहरी पाव टीस्पून
जिरं पाव टीस्पून
हळद अर्धा टीस्पून
हिंग २ चिमूट
मीठ चवीनुसार
कृती
१. एका कढईत १ टीस्पून तेल घालून मक्याचे दाणे घाला. मंद आचेवर दाणे सुके होईपर्यंत परतून घ्या.
२. दाणे गार झाल्यावर मिक्सरमध्ये घालून जाडसर वाटून घ्या.
३. कढईत १ टेबलस्पून तेल घालून मोहरी, जिरं, हळद, हिंगाची खमंग फोडणी करा.
४. फोडणीत ठेचलेली हिरवी मिरची घाला.
५. वाटलेले मक्याचे दाणे घाला. झाकण ठेवून ३–४ मिनिटं वाफ काढा.
६. आता मीठ, साखर, लिंबाचा रस, नारळ, कोथिंबीर घालून मिश्रण ढवळून घ्या. २ मिनिटं मंद आचेवर परतून घ्या.
७. मक्याचा चविष्ट शिरा तयार आहे. गरम गरम शिरा वर नारळ, कोथिंबीर पेरून खायला द्या.


Your comments / feedback will help improve the recipes