Mango and Whipped Cream (मँगो आणि व्हीप्ड क्रिम) – Made from Low Fat Cream
Strawberry and Cream is very popular in Europe. You would seen spectators relishing this during Wimbledon matches. In Maharashtra, it’s available in places like Mahabaleshwar. You can add any juicy fruit to whipped cream but it tastes best with Strawberry, Mango and Chickoo (Sapota). Making fluffy whipped Cream is the only important step in this recipe. This whipped cream is made using Amul Low Fat Cream. In hot weather like Mumbai, cream melts while beating. There is a technique to make fluffy whipped cream. If you have electric beater, it will be easy to whip the cream else making it in traditional way will be too much of hard work.
Ingredients (Serves 2-3)
Amul Low Fat Cream 200 gms
Powdered Sugar 2-3 tablespoon (adjust as per taste)
Ripe Mangoes 2
Ice from 2 ice trays (25-30 cubes)
2 bowls – one big and one small – use a metal small bowl
Instructions
1. Keep the cream pack in fridge for 5-6 hours.
2. Peel Mangoes and chop into small pieces.
3. In the small bowl, Transfer the thick cream from the pack. Do not take the milk, use it for something else.
4. In the big bowl, add ice cubes. Place the small bowl in the big bowl on the ice. This is Ice Bath Technique.
5. Using Electric beater beat the cream until it doubles in volume. If you don’t have electric beater, use a fork.
6. Add powdered sugar. Keep beating till cream is fluffy. It takes about 10 minutes using electric beater. It will take much linger if you beat manually. Keep checking if there is enough ice in the bowl. If ice melts, add more ice.
7. While serving, add whipped cream and Mango layers in a bowl and serve chilled.
==================================================================================
मँगो आणि व्हीप्ड क्रिम – लो फॅट क्रिम वापरून
स्ट्रॉबेरी आणि व्हीप्ड क्रिम हा प्रकार युरोप मध्ये अतिशय लोकप्रिय आहे. विम्बल्डन च्या टेनिस सामन्यांमध्ये बऱ्याच प्रेक्षकांना हे खाताना बघितलं असेल. आपल्याकडे महाबळेश्वर ला मिळतो हा प्रकार. कोणतंही ताजे रसाळ फळ घालून ही हा प्रकार छान लागतो. पण सगळ्यात स्वादिष्ट लागतं स्ट्रॉबेरी, आंबा किंवा चिकू घालून!! ह्यात महत्वाची गोष्ट म्हणजे व्हीप्ड क्रिम बनवणं. अमूल चं लो फॅट क्रिम घेऊन हे व्हीप्ड क्रिम बनवलं आहे. आपल्याकडच्या गरम हवेत हे क्रिम घट्ट होत नाही. पण क्रिम छान घट्ट आणि fluffy करण्याचं एक तंत्र आहे. तुमच्याकडे इलेक्ट्रिक बिटर असेल तर काम सोपं होतं. नाहीतर क्रिम फेटून हात दुखायला लागतात.
साहित्य (२–३ जणांसाठी)
अमूल चं लो फॅट क्रिम २०० ग्राम
पिठीसाखर २–३ टेबलस्पून (चवीनुसार कमी / जास्त करा)
पिकलेले आंबे २
बर्फ २ ट्रे (२५–३० क्युब्स )
दोन वाडगे १ मोठा, १ छोटा – छोटा वाडगा स्टील चा घ्या
कृती
१. क्रिम चं पॅक फ्रिजमध्ये ५–६ तास ठेवून चांगलं थंड करा.
२. पिकलेले आंबे सोलून बारीक तुकडे करून घ्या.
३. छोट्या वाडग्यात क्रिम च्या पॅक मधलं घट्ट क्रिम काढून घ्या. खाली दूध उरेल ते ह्यात घालू नका. ते भाजीत घाला किंवा दुसरा काही उपयोग करा.
४. मोठ्या वाडग्यात बर्फ घाला. छोटा वाडगा मोठ्या वाडग्यात ठेवा म्हणजे तो बर्फाच्या थरावर राहील – (Ice Bath Technique).
५. इलेक्ट्रिक बिटर ने क्रिम फेटा. इलेक्ट्रिक बिटर नसेल तर काटा / चमच्याने फेटा. क्रिम दुप्पट होईपर्यंत फेटा.
६. आता क्रिम मध्ये पिठीसाखर घाला. परत क्रिम फेटा. साधारण १० मिनिटं इलेक्ट्रिक बिटर ने फेटले की क्रिम अगदी fluffy होईल. हाताने फेटायला खूप वेळ लागेल. क्रिम फेटताना बर्फाच्या वाडग्यातला बर्फ वितळला असेल तर त्यात अजून बर्फ घाला. क्रिम अगदी थंडगार असायला हवं.
७. सर्व्ह करताना क्रिम आणि आंब्याच्या तुकडे एकावर एक थर देऊन सर्व्ह करा. अतिशय स्वादिष्ट लागतं.
Your comments / feedback will help improve the recipes