Makyache Modak ( मक्याचे मोदक ) – Sweet Corn Steamed Dumplings

Makyache Modak ( मक्याचे मोदक )

Makyache Modak ( मक्याचे मोदक ) – Sweet Corn Steamed Dumplings

मक्याचे मोदक मराठी

This is my innovative recipe where I’ve used CornMeal and Rice flour for outer covering of Modak and Sweet Corn for the filling. These are steamed dumplings like Ukadiche Modak – A Maharashtrian Specialty. Corn lovers will definitely love this delicious variation of Modak with double coloured covering without addition of any artificial colour.

Ingredients (for 10-12 Modak) (1 Cup = 250ml)

Sweet Corn 1.5 cup

Sugar ¼ cup

Crushed Jaggery 1 tablespoon

Grated Dry Coconut 2 tablespoon

CornMeal (Maize flour) ½ cup

Rice flour ½ cup (use modak flour that is made using aromatic rice)

Corn Starch 1 tablespoon

Ghee (Clarified Butter) 2 teaspoon

Salt 2 pinch

Cardamom powder 2-3 pinch

Oil ½ teaspoon

Instructions

For filling

1. Boil Sweet Corn. Upon cooling, drain water and grind corn into a fine paste.

Sweet corn Paste (बारीक वाटलेले स्वीट कॉर्न)

2. In a pan, heat Ghee. Add Sweet corn paste and saute on low flame till mixture starts becoming dry.

Sweet Corn Paste being Sauteed (वाटलेले स्वीट कॉर्न परता)

3. Add Sugar and Jaggery. Mix well and keep cooking. Add a pinch of salt.

Add Sugar and Jaggery (साखर आणि गूळ घाला)

4. When the mixture dries further, add grated dry coconut. Keep cooking.

Add Grated Dry Coconut (खोबऱ्याचा कीस घाला )

5. When the mixture starts leaving the edges of the pan, take it out on a plate and leave it to cool.

Mixture starts leaving edges of the pan (मिश्रण कडा सोडायला लागलं)
Spread the filling in a plate (सारण ताटलीत पसरून ठेवा)

6. Add Cardamom powder and mix. Filling is ready.

For Cover

1. Heat ¼ cup + 1 tablespoon of water in a pan. Add pinch of salt and ½ teaspoon butter/ghee.

2. Let water boil.

3. Pour in rice flour and mix.

4. Cook covered for 2 minutes and switch off the gas. Keep the pan covered.

5. Heat ¼ cup + 1 tablespoon of water in a pan. Add pinch of salt and ½ teaspoon butter/ghee.

6. Let water boil.

7. Pour in CornMeal and mix.

8. Cook covered for 2 minutes and switch off the gas. Add Corn starch, Mix. Keep the pan covered.

9. After 10 minutes, take out rice and cornmeal dough in plates and knead well separately to get soft dough balls – one yellow and one white. Use water if required. Use little oil if the dough is sticky.

To make Modak

1. Keep the dough covered all the time.

2. Take 1 inch balls of both types of dough. Roll them together into a dough ball. Flatten the dough using fingers into a thin bowl. You can also roll the dough into a puri if you find that easier. You will get a two coloured Puri / dough bowl.

Double coloured dough bowl (मोदकाची दुरंगी पारी)

3. Hold this dough bowl or puri in your hand; place 1 teaspoon of filling in the centre. Pinch the edges 8-9 times. Now gather the edges together and seal it. Remove any excess dough on the top. Keep Modak covered with wet cloth while you make enough numbers depending on size of your steamer.

Makyache Modak Ready for Steaming ( मक्याचे मोदक वाफवण्यासाठी तयार )

4.Fill water in the steamer. Spread a wet cloth on the perforated plate. Dip the base of each Modak in cold water and place it on the perforated plate. Steam them for 20-25 minutes.

5. Serve hot with home made ghee. They taste yummy.

Makyache Modak ( मक्याचे मोदक )
Makyache Modak ( मक्याचे मोदक )

 

 

 

 

 

 

 

 

 

 

==================================================================================

मक्याचे मोदक माझी इनोव्हेटिव्ह रेसिपी

उकडीचे मोदक आपण नेहमीच करतो. मी एक नवीन प्रकारचे मोदक केले. अमेरिकन स्वीट कॉर्न, साखर, गूळ आणि सुकं खोबरं घालून गोड सारण केलं. पारीसाठी मक्याचं पीठ (आपण मक्याच्या भाकरीसाठी वापरतो ते), कॉर्न स्टार्च (पांढरे कॉर्नफ्लोअर) आणि तांदुळाचे पीठ वापरलं. दोन्हीची वेगवेगळी उकड काढून प्रत्येक मोदकासाठी पिवळी आणि पांढरी उकड घेऊन पारी केली. त्यात कॉर्नचे सारण भरून मोदक केले आणि वाफवून घेतले. छान दुरंगी मोदक झाले काहीही कृत्रिम रंग न घालता. मोदक खूप स्वादिष्ट झाले. स्वीट कॉर्न आवडणाऱ्या लोकांना नक्कीच आवडेल हा नवीन पदार्थ.

साहित्य (१०१२ मोदकांसाठी) (१ कप = २५० मिली)

अमेरिकन स्वीट कॉर्न दीड कप

साखर पाव कप

चिरलेला गूळ १ टेबलस्पून

किसलेलं सुकं खोबरं २ टेबलस्पून

मक्याचं पीठ अर्धा कप (आपण मक्याच्या भाकरीसाठी वापरतो ते)

कॉर्न स्टार्च (पांढरं कॉर्नफ्लोअर) १ टेबलस्पून

मोदकाचं / तांदुळाचं पीठ अर्धा कप

तूप २ टीस्पून

वेलची पूड २३ चिमूट

मीठ २ चिमूट

तेल अर्धा टीस्पून


कृती

. स्वीट कॉर्न शिजवून घ्या. पाणी काढून टाका आणि कॉर्न मिक्सरमध्ये बारीक वाटून घ्या.

Sweet corn Paste (बारीक वाटलेले स्वीट कॉर्न)

. एका कढईत १ चमचा तूप घालून त्यात वाटलेले कॉर्न घाला. मंद आचेवर परतत राहा.

Sweet Corn Paste being Sauteed (वाटलेले स्वीट कॉर्न परता)

. मिश्रण घट्ट व्हायला लागलं की त्यात साखर आणि गूळ घालून शिजवा. मिश्रण घट्ट व्हायला लागलं की त्यात सुकं खोबरं घाला, मीठ घाला आणि शिजवत राहा.

Add Sugar and Jaggery (साखर आणि गूळ घाला)
Add Grated Dry Coconut (खोबऱ्याचा कीस घाला )

. मिश्रण कढईच्या कडा सोडू लागलं की गॅस बंद करा. वेलची पूड घालून एकजीव करा आणि ताटलीत पसरून मिश्रण गार करून घ्या. सारण तयार आहे.

Mixture starts leaving edges of the pan (मिश्रण कडा सोडायला लागलं)
Spread the filling in a plate (सारण ताटलीत पसरून ठेवा)

. आता आपल्याला तांदुळाची आणि मक्याची वेगवेगळी उकड काढायची आहे. तांदुळाच्या उकडीसाठी एका पातेल्यात पाव कप +१ टेबलस्पून पाणी घ्या

. पाण्यात किंचित  मीठ आणि अर्धा टीस्पून साजूक तूप घालून पाणी उकळा.

. पाणी उकळलं की त्यात तांदुळाचं पीठ घालून लगेच झाकण ठेवून २ मिनिटं वाफवा. गॅस बंद करून पीठ झाकून ठेवा.

. मक्याच्या पिठाच्या उकडीसाठी एका पातेल्यात पाव कप +१ टेबलस्पून पाणी घ्या

. पाण्यात किंचित  मीठ आणि अर्धा टीस्पून साजूक तूप घालून पाणी उकळा.

१०. पाणी उकळलं की त्यात मक्याचं  पीठ घालून लगेच झाकण ठेवून २ मिनिटं वाफवा. गॅस बंद करून त्यात कॉर्नस्टार्च घालून मिश्रण एकजीव करा आणि पीठ झाकून ठेवा.

११. १० मिनिटांनी उकड गरम असतानाच दोन्ही पिठं वेगवेगळी छान मळून घ्या. एक पांढरा आणि एक पिवळा असे दोन उकडीचे गोळे तयार होतील

१२. दोन्ही उकडीचे छोटे गोळे घेऊन त्याचा एक गोळा बनवा. आणि हाताची बोटं वापरून त्याची पारी बनवा जेवढी पातळ बनवता येईल तेवढी. छान दुरंगी पारी तयार होईल

Double coloured dough bowl (मोदकाची दुरंगी पारी)

१३.पारीत १ चमचा सारण घाला. पारीला हलक्या हाताने कळ्या काढाजेव्हढ्या येतील तेव्हढ्या. कळ्या एकत्र करून मोदकाला सुबक नाक काढा.

Makyache Modak Ready for Steaming ( मक्याचे मोदक वाफवण्यासाठी तयार )

१४. तयार मोदक ओल्या फडक्याखाली ठेवा म्हणजे सुकणार नाही.

१५. मोदक पात्रात / पातेल्यात पाणी उकळा. मोदक वाफवायच्या ताटलीत पातळ कपडा ओला करून पसरवा.

१६. प्रत्येक मोदकाचा बेस (बूड) पाण्यात बुडवून ताटलीत ठेवा.

१७. पाणी उकळलं की ताटली मोदक पात्रात / पातेल्यात ठेवून वाफवून घ्या. मध्यम आचेवर २०२५ मिनिटं लागतात.

१८. मक्याचे स्वादिष्ट मोदक साजूक तुपासोबत खायला द्या.

Makyache Modak ( मक्याचे मोदक )
Makyache Modak ( मक्याचे मोदक )

2 Comments

  1. अप्रतिम! खूपच छान दिसत आहेत. कळ्या पण सुंदर पडल्या आहेत. नाविन्यपूर्ण मोदक!

Leave a Reply to sudha Cancel reply