Moogdalichi Bhaji (मूगडाळीची भजी) – Split Yellow Lentil Fritters – No Onion Garlic Recipe
There are different recipes for making Moogdalichi Bhaji (Split Yellow Lentil Fritters). It is also called Mangodi / Mangoda in North India. This one is a Gujarati recipe. Having lived in Gujarati majority suburb since childhood, I’ve had these Bhajiyas frequently at a small food joint that used to sell only these Bhajiyas. The shop used to be open from 7 am to 11am only. Sounds weird now….. But that’s the way it was. He used to serve Bhajiyas in a paper cup along with Tamarind sweet chutney. Those Bhajiyas used to be awesome. This recipe makes Bhajiyas similar to that.
Ingredients (Serves 8) (1 cup = 250 ml)
Split Yellow Lentil with Husk / Chhilakewai Moong Daal 2.5 cups
Coriander Seeds 1 teaspoon
Black Pepper 1 teaspoon
Green Chilies 4-5
Salt to taste
Oil for frying Bhajiyas
Instructions
1. Wash and soak Lentil for 6 hours.
2. Drain water and grind it into a coarse paste without adding any water. Grind Chilies, Coriander Seeds and Black Pepper along with Lentil.
3. Add Salt and mix well.
4. Heat oil in Wok. Add 2 tablespoon of hot oil to mixture and mix well.
5. Drop a spoonful of mixture at a time into hot oil. Fill the Wok with Bhajias.
6. Fry on medium flame till Bhajias are light brown in colour.
7. Serve hot with your choice of chutney / sauce. These bhajias taste awesome with Tamarind Sweet chutney.
==================================================================================
मूगडाळीची भजी – खमंग खुसखुशीत भजी – कांदा लसूण न घालता
मूगडाळीची खुसखुशीत चविष्ट भजी कधीही खायला छान लागतात. पावसाळ्यात किंवा थंडीत गरमगरम भजी खायला तर आणखीनच मजा येते. मूगडाळीची भजी वेगवेगळ्या प्रकारे करतात. उत्तर भारतात याला मंगोडी / मंगोडा म्हणतात. ही गुजराती पद्धतीची रेसिपी आहे. लहानपणापासून गुजराती लोकवस्तीत राहिल्यामुळे असे चविष्ट पदार्थ खायची सवय लागलीय. मालाड पश्चिमेला एक भजीवाला होता तो फक्त ही भजी विकायचा. ते पण फक्त सकाळी ७ ते ११ पर्यंत. त्याचं एकच दुकान होतं – आमची कुठेही शाखा नाही ह्या चालीवर !! भजी खाण्यासाठी झुंबड उडायची. तो कागदी द्रोणात भजी द्यायचा आणि वर चिंचगूळाची आंबटगोड चटणी घालायचा. अहाहा !!! काय चव असायची त्या भज्यांना !!! तेव्हापासून ही भजी मी चिंचगुळाच्या चटणी सोबतच खाते. ही रेसिपी त्या भज्यांची आहे. कांदा लसूण न घालता, सालाची मुगाची डाळ वापरून केलेली ही भजी अगदी खुसखुशीत आणि चविष्ट होतात.
साहित्य (८ जणांसाठी) (१ कप = २५० मिली)
सालाची मुगाची डाळ अडीच कप
धने १ टीस्पून
काळी मिरी १ टीस्पून
हिरवी मिरची ४–५
मीठ चवीनुसार
तेल भजी तळायला
कृती
१. मुगाची डाळ धुवून पाणी घालून ६ तास भिजत ठेवा.
२. पाणी उपसून टाका. मिक्सरमध्ये डाळ, मिरच्या, धने आणि काळी मिरी जाडसर वाटून घ्या. वाटताना अजिबात पाणी घालू नका.
३. मिश्रण एका पातेल्यात काढून घ्या. मीठ घालून एकजीव करा.
४. भजी तळण्यासाठी कढईत तेल गरम करून घ्या.
५. २ टेबलस्पून कडकडीत तेल डाळीच्या मिश्रणात घालून एकत्र करा.
६. गॅस मंद करून हाताने / चमच्याने थोडं थोडं मिश्रण तेलात सोडा. आणि मध्यम आचेवर भजी लालसर रंगावर तळून घ्या.
७. गरमगरम भजी चिंचगुळाच्या चटणी सोबत सर्व्ह करा.
Mast ….mast
Thank you Makrand.
Sudha