Goda Masala (गोडा मसाला) – Maharashtrian Specialty Mixed Spice Powder

Goda Masala (गोडा मसाला)

Goda Masala (गोडा मसाला) – Maharashtrian Specialty Mixed Spice Powder

गोडा मसाला मराठी

This is a masala that is generally used by Maharashtrian Branhims for their cuisines. This is used in Bharali Vangi, Bharali Tondli, Masale Bhaat, Aamati, All subjis with Tamarind , Jaggery (Chingu Subjis- Chinch Gulachya Bhaajya) and different types of Usal. It gives a unique taste to these dishes. You can also mix it with Rice and Curd and eat as a part of meal. Another good use of it is for making Curd Poha. Mix ½ teaspoon of this Masala with Poha and curd; add some salt and eat this healthy and tasty snack any time of the day.

This is my mother’s recipe. Ever since I remember, we have been making Goda Masala using this recipe.

Ingredients (1 cup = 250 ml)

Ingredients of Goda Masala (गोड्या मसाल्याचं साहित्य)

Coriander Seeds ½ kg – 6 cups

Sesame Seeds ½ cup

Grated dry Coconut 1 cup

Dry red chilies ½ cup

Asafoetida (Hing) 4 teaspoon (better if you use crushed whole Asafoetida instead of ready powder)

Cumin Seeds ½ cup

Cloves 10 gms – 80-90 cloves

Cinnamon 10 gms – 16-20 one inch pieces

Fenugreek Seeds ½ teaspoon

Turmeric Powder 1 teaspoon

Bay Leaves 10-12

Nagkesar (Mesua Ferrea) 10 gms (Optional)

Oil 1-2 teaspoon for roasting

Instructions

1. Dry roast Cumin Seeds until light brown.

2. Dry roast Sesame Seeds, Dry Coconut separately till light brown.

Roasted ingredients – Cumin Seeds, Dry Coconut and Sesame Seeds (भाजलेलं जिरं, खोबरं आणि तीळ)

3. Dry roast Coriander Seeds, Bay Leaves together till Coriander Seeds are light brown and you get nice aroma of roasted seeds.

Roast Coriander Seeds and Bay Leaves (धने आणि तमालपत्र भाजून घ्या )

4. In a pan, heat 1-2 teaspoon of oil; add Cloves, Cinnamon, Nagkesar and Fenugreek Seeds; all the ingredients should be dipped in oil; roast till Fenugreek Seeds are dark brown. Add Red Chilies, Asafoetida and Turmeric Powder and saute till Asafoetida is fried.

Roasted Cloves, Cinnamon, Fenugreek Seeds, Red Chilies, Turmeric Powder and Asafoetida (तेलात भाजलेलं साहित्य – लवंग, दालचिनी, मेथी, लाल मिरच्या, हळद, हिंग)

5. Allow all ingredients to cool.

6. When they come to room temperature, grind these ingredients separately in grinder into a little coarse powder; mix together.

7. Let the Masala cool properly; store it in air tight container. This lasts for about a year without refrigeration.

Note

1. Roast all ingredients on low flame to get better aroma / taste.

2. You can use Black Sesame Seeds instead of White Sesame Seeds. Masala will be darker if you do so.

Goda Masala (गोडा मसाला)
Goda Masala (गोडा मसाला)

 

 

 

 

 

 

==================================================================================

गोडा मसाला

ही माझ्या आईची रेसिपी आहे. तिच्या हस्ताक्षरातलं प्रमाण लिहिलेलं कात्रण सुद्धा आहे. मला आठवतं तेव्हापासून आमच्याकडे हीच रेसिपी वापरून गोडा मसाला केला जातो. ताजा मसाला दहिभातासोबत, दहीपोह्यासोबत किंवा तेल घालून भाकरीसोबत खायला अप्रतिम लागतो. ब्राह्मणी पद्धतीच्या भाज्या भरली वांगी, भरली तोंडली, सर्व प्रकारच्या चिंच गुळाच्या भाज्या (चिंगु भाज्या) –  आमटी, मसाले भात, थालीपीठ  ह्यात हा मसाला घातला की आणखी काही मसाले घालावे लागत नाहीत. ताजा मसाला घालून लगेच आज भरली तोंडली केली. फारच चविष्ट झाली होती.

ह्या मसाल्यात नेहमी घरात असणारे जिन्नस लागतात. फक्त नागकेशर सहसा घरात नसतं. पण ते नाही घातलं तरी चालतं. मसाल्याचा स्वाद जिन्नस खमंग भाजण्याने येतो. त्यामुळे जिन्नस भाजताना अगदी मंद आचेवर खमंग भाजून घ्या. त्यात घाई गडबड नकोपांढऱ्या तिळाऐवजी काळे तीळ घातले तर मसाला गडद रंगाचा होतो. बाकी चवीत फरक पडत नाही. जिन्नस मोजण्यासाठी मापाचा कप घेतला आहे २५० मिलीचा. वेगळा कप घेतलात तर माप चुकेल.

साहित्य (१ कप = २५० मिली)

Ingredients of Goda Masala (गोड्या मसाल्याचं साहित्य)

धने अर्धा किलो (६ कप )

तीळ अर्धा कप

किसलेलं सुकं खोबरं १ कप

सुक्या लाल मिरच्या अर्धा कप

हिंग ४ टीस्पून (खडा हिंग बारीक करून घातला तर स्वाद छान येतो )

जिरं अर्धा कप

लवंग १० ग्राम – ८०९० लवंगा

दालचिनी १० ग्राम १६२० एक इंचाचे तुकडे

मेथी दाणे अर्धा टीस्पून

हळद १ टीस्पून

तमालपत्र १०१२

नागकेशर १० ग्राम (ऐच्छिक)

तेल १२ टीस्पून जिन्नस भाजण्यासाठी

कृती

. जिरं, तीळ आणि सुकं खोबरं मंद आचेवर वेगवेगळं खमंग भाजून घ्या.

Roasted ingredients – Cumin Seeds, Dry Coconut and Sesame Seeds (भाजलेलं जिरं, खोबरं आणि तीळ)

. धने आणि तमालपत्र एकत्र मंद आचेवर खमंग भाजून घ्या.

Roast Coriander Seeds and Bay Leaves (धने आणि तमालपत्र भाजून घ्या )

. एका कढईत तेल गरम करून त्यात लवंग, दालचिनी, नागकेशर आणि मेथीदाणे घाला. हे सर्व तेलात बुडेल एवढं तेल हवं. मेथी दाणे काळपट होतील तोपर्यंत परतून घ्या. लाल मिरच्या, हळद आणि हिंग घाला. हिंग चांगला तळला जाईपर्यंत परता. गॅस बंद करा.

Roasted Cloves, Cinnamon, Fenugreek Seeds, Red Chilies, Turmeric Powder and Asafoetida (तेलात भाजलेलं साहित्य – लवंग, दालचिनी, मेथी, लाल मिरच्या, हळद, हिंग)

. भाजलेलं सर्व साहित्य गार झालं की मिक्सरमध्ये वेगवेगळं बारीक वाटून घ्या. आणि एकत्र करा.

. खमंग गोडा मसाला तयार आहे. मसाला पूर्ण गार झाला की घट्ट झाकणाच्या बरणीत काढून ठेवा. वर्षभर चांगला राहतो.

Goda Masala (गोडा मसाला)
Goda Masala (गोडा मसाला)

6 Comments

  1. Perfect ..waiting for this recipe for ages 🙂
    My grandma was from south goa and I used to love ‘aamti’ made by her using this masala … was missing this recipe.

  2. Hello tai mi tumcha sarv recipe follow karte..pan kashi nantar save karun pahta yet nshi,search kasa karaycha tumcha recipe? Plz guide ,,tumhi utube var ka nahi ?

    • ब्लॉगवर सर्च बटन आहे. तिथे नाव घालून एंटर की दाबायची. म्हणजे त्या नावाच्या रेसिपीज दिसतात. 
      Sudha

  3. वेगवेगळे वाटायचे म्हणजे प्रत्येक जिन्नस वेगळा की जे एकत्र भाजले ते तसेच एकत्र वाटू शकतो

Your comments / feedback will help improve the recipes